पोस्ट्स

आटपाडी चे आमदार अनिल बाबर यांचा आकस्मिक निधन; मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली शोकभावना

इमेज
जनलोक वार्ता न्यूज नेटवर्क  पुणे दि. ३१, आटपाडी विधानसभेचे आमदार अनिल बाबर यांचे आकस्मिक निधन झाले आहे. वयाच्या ७४ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ते निमोनिया या आजाराशी झुंज देत होते. मात्र आज त्यांना मृत्यू झाला.  दरम्यान आ. बाबर यांच्या निधनानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शोकभावना व्यक्त केली आहे.  अनिल बाबर यांच्या निधनाने आपण खऱ्या अर्थाने शिवसेनेचा समाजकार्याचा वसा चालवणारा एक अतिशय प्रभावी असा लोकप्रतिनिधी गमावला आहे, अशा शब्दात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या शोकभावना व्यक्त केल्या आहेत. आ. बाबर यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्याच्या सूचनाही मुख्यमंत्र्यांनी प्रशासनाला दिल्या आहेत.   खानापूर आटपाडी मतदारसंघांमध्ये आ. बाबर यांनी शिवसेनेचे केलेले कार्य कधीही न विसरण्याजोगे आहे. सांगली जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त भागामध्ये पाणी आणण्यासाठी सिंचनासाठी त्यांनी  अथक प्रयत्न केले. कृष्णा खोऱ्यातील पाणी आणि टेंभू योजना कार्यान्वित व्हावी म्हणून ते सतत झगडत होते. बेघरांना घरे मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणे, रक्तदान शिबिरांचे आयोजन ...

प्रजासत्ताक दिन निमित्त वक्रतुंड फिटनेस क्लब आयोजीत मॅरेथॉन स्पर्धा संपन्न

इमेज
जनलोक वार्ता न्यूज नेटवर्क   प्रतिनिधी --हरि बोंबले प्रजासत्ताक दिन निमित्त वक्रतुंड फिटनेस क्लब आयोजीत मॅरेथॉन स्पर्धा संपन्न झाला. या स्पर्धेत व्यायाम शाळेतील सर्व पुरुष व महिला एकूण दोनशे सभासंदानी सहभाग घेतला विजेत्या स्पर्धकांला रेंजर सायकल बक्षीस ठेवण्यात आले होते . पुरुष गटात प्रथम क्रंमाक प्रकाश दत्तात्रय बोंबले यांनी पटकावलातर महिला गटात सोनाली संदिप गाडे यांनी मिळविला तर सहभागी सर्व स्पर्धकांना ट्रॉफी व सन्मानचिह्न देण्यात आले. स्पर्धेचे उद्घाटन बाळासाहेब सांडभोर यांनी केले तर स्पर्धा आयोजन वक्रतुड फिटनेसचे सर्वेसर्वा विकासशेठ वाघमारे यांनी केला. कार्यक्रमाचे सूत्रसचलन कैलास दुधाळे यांनी केले तर आभार संपत गारगोटे यांनी केले.

पुण्यातील वेळअमावस्या स्नेह भोजनास आमदार सचिन कल्याणशेट्टी, सुनिभाऊ कांबळे व माजी गृहराज्यमंत्री सिद्धाराम म्हेत्रे यांची उपस्तिथी ; बसवेश्वर मित्र मंडळ व अक्कलकोट तालुका रहिवासी मित्र मंडळ पुणे यांचा सलग 17 वर्षाचा विक्रम

इमेज
  जनलोक वार्ता न्यूज नेटवर्क पुणे (प्रतिनिधी) - बसवेश्वर मित्र मंडळ व अक्कलकोट तालुका रहिवासी मित्र मंडळ पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने संपन्न झाला. गेल्या १७ वर्षापासून पुण्यातील अक्कलकोट चे रहिवासी साठी वेळ अमावस्याचा  कार्यक्रम नित्य नियमाने दर वर्षी केला जात आहे विद्यमान आमदार सचिन  कल्याणशेट्टी, माजी आमदार सिद्धाराम म्हेत्रे  आणि पुणे कॅन्टोमेंट चे आमदार मा. सुनिलभाऊ कांबळे यावेळी एकाच मंचावर उपस्थित होते. राजकारणात कितीही वैचारिक मतभेद असले तरी आपल्या गावाकडच्या लोकांना भेटण्यासाठी हे मतभेद विसरून एकत्र येवून आपली उपस्थिती दर्शवली व एकत्र च या स्नेहभोजनाचा आस्वाद घेतला. यावेळी हजोरो च्या संख्येने अक्कलकोट तालुक्यातील वेगवेगळ्या क्षेत्रातील मान्यवर ह्या कार्यक्रमाला उपस्थित होते. विशेष म्हणजे महिला मंडळीनी देखील मोठ्या प्रमाणात उपस्थिती दर्शवली तसेच यावेळी जवळ जवळ ४००० लोकांनी जेवणाचा आस्वाद घेतला.  हा कार्यक्रम अतिशय व्यवस्थित व नियोजनबद्द केल्याबद्दल मा. आमदार सचिन दादा कल्याणशेट्टी यांच्याकडून आयोजकवरती कौतुकाचा वर्षाव झाला.कार्यक्रम दरम्यान साप्ताहिक गा...

शिवरायांच्या मावळ्यांनी जगाच्या कानाकोपऱ्यात जाऊन आपल्या कर्तुत्वाचा झेंडा फडकवला पाहिजे - संपत गारगोटे* प्रतिनिधी--लतिफ शेख राजगुरुनगर: छत्रपती शिवाजी राजांचा आदर्श घेऊन येथिल प्रत्येक तरुणाने यश मिळवून जगाच्या कानाकोपऱ्यात आपल्या कर्तृत्वाचा झेंडा फडकवायला हवा तसेच इतिहास केवळ भुतकाळात मन रमण्यासाठी नसून प्रत्येकाने कर्तृत्व गाजवावे असे आव्हान संपत गारगोटे यांनी केले ते तिन्हेवाडी येथे साहेबरावजी बुट्टेपाटील महाविद्यालयाच्या विशेष राष्ट्रीय सेवा योजनेच्या विशेष हिवाळी शिबिरात बोलत होते. छत्रपती शिवाजी महाराजांना मार्गदर्शक म्हणून माॅसाहेब जिजाऊंनी राजांच्या मनात आत्मविश्वास निर्माण केला म्हणुन तर राजांनी शून्यातून स्वराज्य निर्माण केले . आदिलशहा , इग्रज , मोगलांशी व इतर सत्ताधिशाशी संघर्ष करून राजांनी आपल्या कर्तुत्वाचा झेंडा जगाच्या इतिहासात आजारामर केला आणि त्यांच्याच वारसदारांनी आज वेगवेगळी कौशल्य आत्मसात करून आपल्या कर्तुत्वाचा झेंडा सुद्धा जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचवावा कारण छत्रपती शिवाजी राजांना अभिप्रेत असणारे काळाची पावले ओळखुन स्वराजाचा मावळा व्हावा असे आव्हान संपत गारगोटे यांनी केले . येथे प्रत्येक मावळ्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांसारखे निरव्यसनी व्हावं, छत्रपती शिवाजी राजांसारखे कार्यकर्तृत्व करावं ,राजांची दूरदृष्टी आत्मसात करावी आणि यश मिळवावे असे मार्गदर्शन व्याख्याते संपत गारगोटे यांनी विद्यार्थ्यांना केले. छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार, त्यांचा दृष्टिकोन, त्यांचे नीती नियम हे प्रत्येक राष्ट्रीय सेवा योजनेतील स्वयसेवकांनी आत्मसाद करावे आणि खूप मोठे कार्य करावे असे आव्हान गारगोटे यांनी केले. यावेळेस कार्यक्रमाच्या निमित्ताने प्रमुख पाहुणे म्हणून तिन्हेवाडीच्या लोकनियुक्त सरपंच प्रतीक्षाताई पाचारणे तर या वेळी या कार्यक्रमाच्या अध्यक्षा म्हणुन राजगुरुनगर सहकारी बँकेच्या संचालिका अश्विनीताई पाचारणे तसेच यावेळी या कार्यक्रमास ग्रापंचायत सदस्य प्रियंकाताई पाचारणे, रिपब्लिकन कष्टकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष हरीशभाई देखणे, कामगार नेते राज्जाकभाई शेख,सामाजिक कार्यकर्ते हेमंत विरकर, संवाद फाउंडेशन संस्थापक अध्यक्ष निलेशजी ढवळे, महाविद्यालयाचे प्राचार्य जरे सर ,कार्यक्रमाचे कार्यक्रमाधिकारी पत्रकार गणेश आहेरकर सर,खेड तालुका कृषी अधिकारी नंदु वानी साहेब व अनेक मान्यवर उपस्थित होते.

इमेज
  जनलोक वार्ता न्यूज नेटवर्क प्रतिनिधी / लतिफ शेख, राजगुरुनगर: छत्रपती शिवाजी राजांचा आदर्श घेऊन  येथिल प्रत्येक तरुणाने  यश मिळवून जगाच्या कानाकोपऱ्यात आपल्या कर्तृत्वाचा झेंडा फडकवायला हवा  तसेच  इतिहास केवळ भुतकाळात मन रमण्यासाठी नसून  प्रत्येकाने कर्तृत्व गाजवावे असे आव्हान संपत गारगोटे  यांनी केले ते तिन्हेवाडी येथे साहेबरावजी बुट्टेपाटील  महाविद्यालयाच्या विशेष राष्ट्रीय सेवा योजनेच्या विशेष हिवाळी शिबिरात बोलत होते. छत्रपती शिवाजी महाराजांना  मार्गदर्शक म्हणून माॅसाहेब जिजाऊंनी राजांच्या मनात आत्मविश्वास निर्माण केला म्हणुन तर  राजांनी शून्यातून स्वराज्य निर्माण केले . आदिलशहा , इग्रज , मोगलांशी व इतर सत्ताधिशाशी  संघर्ष करून राजांनी आपल्या कर्तुत्वाचा झेंडा जगाच्या इतिहासात आजारामर केला आणि त्यांच्याच वारसदारांनी आज वेगवेगळी कौशल्य आत्मसात करून आपल्या कर्तुत्वाचा झेंडा सुद्धा जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचवावा कारण छत्रपती शिवाजी राजांना अभिप्रेत असणारे काळाची पावले ओळखुन  स्वराजाचा मावळा व्हावा असे आव्हान संपत गारगोटे यांन...

राज्यात ६ हजार ७२ शेततळी पूर्ण ; १ कोटी ६० लाख रुपये अनुदान वाटप

  जनलोक वार्ता न्यूज नेटवर्क                मुंबई दि.२३ : छत्रपती शिवाजी महाराज कृषी योजनेअंतर्गत ‘मागेल त्याला शेततळे’ यामध्ये राज्यातील २३ हजार ५२४ शेततळ्यांना तालुकास्तरावर तालुका कृषी अधिकारी यांनी पूर्व संमती दिली असून त्यामधील  ६ हजार ७२ शेततळी पूर्ण करण्यात आली आहेत. यासाठी ४१ कोटी ६० लाख रुपये अनुदान लाभार्थी शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यामध्ये जमा करण्यात आले असल्याची माहिती कृषी विभागाने दिली आहे.             छत्रपती शिवाजी महाराज कृषी योजना राज्यातील शेतकऱ्यांना उद्भवणाऱ्या अडचणींतून येणारे नैराश्य दूर करण्याच्या अनुषंगाने कृषी विभागामार्फत महाडीबीटी पोर्टलद्वारे मिळणारे विविध घटकांचे लाभ मागणी केल्यावर तातडीने उपलब्ध करुन देण्यात येतात. यामध्येच ‘मागेल त्याला शेततळे’ या घटकांतर्गत राज्यात ६ हजार ७२ शेततळी पूर्ण करण्यात आली आहेत. कोकण विभागात १४९ ,  नाशिक विभागात १ हजार ७० ,  पुणे विभागात २ हजार ९०७ ,  कोल्हापूर विभागात ७०८ ,  छत्रपत...

वाल्हेकरवाडी येथे शिवभक्त प्रतिष्ठान आयोजित श्रीराम प्रतिमा पुजन व दिपोत्सव कार्यक्रम उत्साहात

इमेज
जनलोक वार्ता न्यूज नेटवर्क निगडी, दि. २२ , (प्रतिनिधी / दयानंद गौडगांव) : अयोध्या येथे पार पडलेल्या श्रीरामलल्ला यांच्या प्राणप्रतिष्ठापनेच्या निमित्ताने वाल्हेकरवाडी येथे शिवभक्त प्रतिष्ठान यांच्या वतीने भव्य श्रीराम प्रतिमा पूजन तसेच दिपोत्सवाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. सकाळी ११.०० वाजता काॅलनीतील महिलांना प्रथम पूजेचा मान देण्यात आला, त्यानंतर संध्याकाळी महिलांसाठी मनोरंजनात्मक  संगीत खुर्चीचे आयोजन करण्यात आले होते. रात्री ठिक ८:३० वाजता प्रसिद्ध उद्योजक आदेश नवले यांच्या हस्ते दिपोत्सव कार्यक्रम पार पडला. त्यानंतर श्रीराम प्रतिमेचा महाआरती करण्यात आली. आरती नंतर सर्व रामभक्तांनी प्रसादाचा लाभ घेतला. या कार्यक्रमासाठी उद्योजक आदेश नवले तसेच ज्ञानेश्वर वाल्हेकर यांचा सहकार्य तसेच आशिर्वाद व्यासपीठाला लाभला. यावेळी प्रतिष्ठानचे , शिवा फुलारी, नागेश सुतार, मल्लीनाथ कोरे, यल्लप्पा सुतार, तुकाराम अर्जुन, गोपी अर्जुन, बाशा मुल्ला, गंगाधर पुजारी, प्रभू फुलारी , खंडेराय बेलंगी यांच्या समावेत इतर कार्यकर्ते तसेच शेकडो भाविक उपस्थित होते.

श्री क्षेत्र गुळाणी येथे श्री राम मंदीर प्राण प्रतिष्ठा सोहळ्याच्या निमित्त पालखी सोहळा व भव्य मिरवणूक संपन्न

इमेज
  जनलोक वार्ता न्यूज नेटवर्क  प्रतिनिधी /  दत्ता भगत खेड :  तालुक्यातील श्री संत सटवाजी  बाबा येथील गुळाणी  गावांमध्ये श्रीराम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या निमित्ताने गावामध्ये पालखी सोहळा व भव्य दिव्य अशी भक्तिमय वातावरणात जय श्रीराम अशा जल्लघोशात मिरवणूक संपन्न झाली. पालखी सोहळ्याची मिरवणूक संपूर्ण गावभर भगवे झेंडे व हरिनामाच्या गजरामध्ये उत्साही वातावरणात संपन्न झाली . गुळाणी गावातील सर्व संस्थांचे पदाधिकारी व ग्रामस्थ व महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता. सर्वात शेवटी मारुती मंदिरामध्ये प्रभू श्रीरामाची आरती करून प्रसाद वाटप करून पालखी सोहळ्याचे समारोप करण्यात आला.