पोस्ट्स

सर्व प्रकारच्या वाहनांसाठी २५ ऑगस्टपासून वरंधा घाट खुला

 जनलोक वार्ता न्यूज नेटवर्क   पुणे, दि. 23:  स्थानिक लोकप्रतिनिधींनी केलेल्या सूचना तसेच उप विभागीय अधिकारी भोर यांचा अहवाल विचारात घेऊन भोर-महाड या मार्गावरील जिल्ह्याच्या हद्दीतील वरंधा घाट २५ ऑगस्ट पासून सर्व प्रकारच्या वाहनांसाठी वाहतुकीस खुला करण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी निर्गमित केले आहे. भारतीय हवामान खाते यांनी अतिवृष्टीबाबत वेळोवेळी दिलेल्या लाल आणि नारंगी इशाऱ्याच्या पार्श्वभूमीवर सुरक्षिततेच्यादृष्टीने भोर-महाड  मार्गावरील जिल्ह्याच्या हद्दीतील वरंधा घाट ३० सप्टेंबरपर्यंत  बंद करण्यात आला होता. वाहनांची वाहतूक बंद करुन इतर वेळी हलक्या वाहनांची वाहतुक सुरु ठेवण्यात आली होती. आता भारतीय हवामान खात्याकडून अतिवृष्टीबाबत कोणत्याही प्रकारचे इशारे देण्यात आले नसल्यामुळे वरंधा घाट वाहतुकीसाठी खुला करण्याबाबत सुधारित अधिसूचना निर्गमित करण्यात आली असल्याचेही आदेशात नमूद करण्यात आले आहे.

निसर्ग सेवा फाउंडेशन तर्फे अक्कलकोट शहरात स्वच्छता मोहीम

इमेज
जनलोक वार्ता न्यूज नेटवर्क  अक्कलकोट दि .२१, अक्कलकोट येथे निसर्ग सेवा फाउंडेशनच्या माध्यमातून स्वच्छता मोहीम राबविण्यात आला. बस डेपो परिसरा लगत असलेल्या फुटपाथ वरील संपूर्ण काटेरी झाडे झुडपे काढण्यात आली. यामुळे फुटपाथ मोकळी होऊन श्री तिर्थ क्षेत्र नगरीचे झालेले विद्रोपीकरण दूर करण्यात आले . तसेच मादचारी मार्गावर अस्वच्छता, सर्वत्र दुर्गंधी यामुळे नागरिकांना व स्वामी भक्तांना येता जाता त्रास होत होता. हीच बाब लक्षात घेऊन सदर परिसर स्वच्छ करण्यात आले. यामुळे फुटपाथ वर ज्येष्ठ नागरिकांना व महिलांना बालकांना चालत जाण्यास निश्चितच मदत होणार आहे. या प्रसंगी सर्व स्वयंसेवक मोठ्ठ्या प्रमाणात उपस्थित होते.                           यानंतर ग्रामदैवत श्री मल्लिकार्जुन मंदिर परिसर स्वच्छ करण्यात आले. सद्या हिंदूंचा पवित्र समजला जाणारा श्रावण महिना असल्याने मंदिरात विविध धार्मिक सांस्कृतिक कार्यक्रम चालू आहेत. भाविकांना स्वच्छ,सुंदर व प्रसन्न वातावरण राहावे त्या दृष्टीने स्वच्छता मोहीम हाती घेण्यात आले होते. निसर्ग सेवा फाउ...

पुणे शहरात रविवारी 'माझी माती माझा देश' उपक्रमाची सांगता

जनलोक वार्ता न्यूज नेटवर्क  पुणे, दि. १९: पुणे महापालिकेच्यावतीने 'माझी माती माझा देश' अभियानाची सांगता राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या उपस्थितीत विविध उपक्रमांच्या आयोजनाने २० ऑगस्ट रोजी दुपारी १ वाजता होणार आहे, अशी माहिती पुणे महापालिकेकडून देण्यात आली आहे.  केंद्र शासन व राज्याच्या पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागाच्या सूचनेनुसार पुणे महापालिकेच्यावतीने 'माझी माती माझा देश' हे अभियान पुणे शहरात मोठ्या उत्साहाने राबवण्यात आले. या अभियानाच्या समारोपाच्या अनुषंगाने  हुतात्मा बालवीर शिरीषकुमार विद्यालय शिवाजीनगर पोलीस वसाहती जवळ शिलाफलकाचे अनावरण व स्वातंत्र्यसैनिक आणि शहिदांच्या कुटुंबियांचा सन्मान करण्यात येणार आहे, असे महापालिकेतर्फे कळविण्यात आले आहे.

चिंचवड येथे 'दिव्यांग कल्याण विभाग दिव्यांगाच्या दारी' कार्यक्रमाचे २२ ऑगस्ट रोजी आयोजन

  जनलोक वार्ता न्यूज नेटवर्क  पुणे, दि. १९: 'दिव्यांग कल्याण विभाग दिव्यांगाच्या दारी'  या अभियानाअंतर्गत जिल्ह्यातील दिव्यांग बांधवांना विविध योजनांचा लाभ देण्यासाठी अभियानाचे अध्यक्ष आणि राज्यस्तरीय समितीचे मुख्य मार्गदर्शक   ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू यांच्या उपस्थितीत मंगळवार २२ ऑगस्ट रोजी सकाळी ११ वाजता चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.  यावेळी विविध विभागांच्या योजनांचे माहिती देणारे स्टॉल येथे लावण्यात येणार आहे. यामध्ये दिव्यांगाची नाव नोंदणी, मार्गदर्शन, योजनांच्या लाभाची प्रक्रिया पद्धती आदीबाबत संवादही साधण्यात येणार आहे. पुणे  व पिंपरी चिंचवड शहर तसेच जिल्हातील अधिकाधिक दिव्यांग बांधवांनी सहभागी होऊन या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी केले आहे.

सहा महिन्यात ईरशाळवाडीचे कायमस्वरूपी पुनर्वसन करणार ; मुख्यमंत्र्यांची ग्वाही

इमेज
जनलोक वार्ता न्यूज नेटवर्क  मुंबई, दि. १५ : इर्शाळवाडी दुर्घटनाग्रस्तांसाठी तात्पुरत्या उभारलेल्या निवारा व्यवस्थेची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज पाहणी केली. महिनाभराच्या आत दुसऱ्यांदा मुख्यमंत्री इर्शाळवाडीवासियांचे अश्रू पुसण्यासाठी आले. त्यांनी वडीलकीच्या नात्याने सर्वांना धीर दिला..शासन भक्कमपणे पाठीशी असल्याची ग्वाही दिली. कायमस्वरूपी निवासाची व्यवस्था सहा महिन्यात होईल असा विश्वास स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी मुख्यमंत्र्यांनी  डौलाने फडकणाऱ्या तिरंग्याच्या साक्षीने यावेळी दिला...  दिवसभरातील स्वातंत्र्य दिनानिमित्तचे कार्यक्रम आटोपून मुख्यमंत्री श्री. शिंदे यांचे  सायंकाळी चारच्या सुमारास इर्शाळवाडीवासियांच्या तात्पुरत्या निवासाची सोय केलेल्या ठिकाणी आगमन झाले. मुख्यमंत्र्यांनी निवास व्यवस्थेची पाहणी केली. त्यांनी काही धरांमध्ये जाऊन तेथील सुविधेची पाहणी करताना त्यामध्ये राहणाऱ्या नागरिकांशी संवाद साधला.  गेल्या महिन्यात २० जुलैला इर्शाळवाडी दुर्घटना झाली होती. त्यातून बचावलेल्या नागरिकांच्या निवासाची सोय मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी दिलेल्या निर्देशानु...

स्वातंत्र्य दिनानिमित्त मुख्यमंत्र्यांच्या हस्ते मंत्रालयात ध्वजारोहण ; आपला महाराष्ट्र सर्वच क्षेत्रात पहिल्या क्रमांकावर- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा विश्वास

इमेज
जनलोक वार्ता न्यूज नेटवर्क             मुंबई, दि 15 : महाराष्ट्र आज विदेशी थेट गुंतवणुकीत देशात प्रथम क्रमांकावर आहे. यामुळे रोजगार देखील मोठ्या प्रमाणात वाढणार आहेत. राज्य कृषि, शिक्षण, ऊर्जा, पायाभूत सुविधा, आरोग्य  आणि पर्यटन अशा सर्व क्षेत्रात देशात क्रमांक एकवर राहील हा आमचा विश्वास आहे. त्यासाठी आपण सर्वजण शपथबध्द होऊया आणि प्रयत्नशील राहूया, असे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.             भारतीय स्वातंत्र्याच्या 76 व्या वर्धापन दिनानिमित्ताने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते मंत्रालय प्रांगणात ध्वजारोहण झाले. त्यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश देवेंद्र कुमार उपाध्याय, मुख्य सचिव मनोज सौनिक, अपर मुख्य सचिव सुजाता सौनिक, राजशिष्टाचार विभागाच्या अपर मुख्य सचिव मनीषा म्हैसकर,माहिती व जनसंपर्क महासंचालक जयश्री भोज, भारतीय सेनेच्या तिन्ही दलाचे मुंबई येथील प्रमुख अधिकारी यांच्यासह वरिष्ठ पोलीस अधिकारी,मंत्रालयातील अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.       ...

बाप रे....! सिध्देश्वर एक्स्प्रेस मध्ये महिलेच्या पर्समधून तब्बल इतक्या किंमतीचे दागिने चोरट्यांनी केला लंपास

जनलोक वार्ता न्यूज नेटवर्क   मुंबई दि. १५, सिध्देश्वर एक्स्प्रेस ने प्रवास करणाऱ्या महिलेच्या पर्समधून अज्ञात चोरट्याने सुमारे २ लाख ३३ हजारांचे दागिने लंपास केल्याची घटना घडली आहे. दि.९  ऑगस्ट रोजी ही घटना घडली आहे. याबाबत संगीता राजाराम ठाकूर (रा. सोलापूर) यांनी लोहमार्ग पोलिसांत फिर्याद दाखल केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार, फिर्यादी महिला आपल्या पतीसह दि. ९ आॅगस्ट रोजी कल्याण ते मुंबई बोगी नं. ए ०३ सीट क्र १९, २१ वरुन प्रवास करत हाेते. फिर्यादीस मोहोळ येथे जाग आली असता, फिर्यादीने डोक्याखाली घेतलेली पर्स दिसून आली नाही. त्यांनी लागलीच पतीला उठवून पर्सचा शोध घेत पर्समध्ये ठेवलेल्या मोबाइलवर फोन केला असता मोबाइलचा आवाज आला. त्यानुसार शोध घेतला असता बर्थखाली पर्स सापडली. पर्समधील मोबाइल मिळाला. मात्र त्यामध्ये ठेवलेले १ लाख ६४ हजार ४९९ रुपयांचे २५.६६० ग्रॅम मंगळसूत्र, ३१ हजार ४८५ रुपयांची ५.३० ग्रॅम वजनाची सोन्याची चेन व ३७ हजार ६५४ रुपयांची ६ ग्रॅम वजनाचे कानातील झुमके असा एकूण २ लाख ३३ हजार ५३८ रूपयांचा ऐवज चोरट्याने चोरून नेला होता.