पोस्ट्स

अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना ७३ कोटी ६० लाख रुपये नुकसान भरपाई

जनलोक वार्ता न्यूज नेटवर्क  पुणे, दि. ३१: पुणे जिल्ह्यात गतवर्षी सप्टेंबर व ऑक्टोबरमध्ये नैसर्गिक आपत्ती व अतिवृष्टीमुळे शेतीपिके व फळपिकांचे नुकसान झाले होते. त्यामध्ये ३३  टक्के किंवा त्यापेक्षा अधिक नुकसान झालेल्या ८५ हजार ४४५ शेतकऱ्यांना ७३ कोटी ६० लाख ३८ हजार रुपये नुकसान भरपाई ऑनलाईन पद्धतीने करण्याची कार्यवाही सुरू असून सुमारे ८० टक्के काम पूर्ण झाले आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी हिम्मत खराडे यांनी दिली आहे. माहे सप्टेंबर ते माहे ऑक्टोबर २०२२  मध्ये नैसर्गिक आपत्ती व अतिवृष्टीमुळे बाधित गावे, शेतकरी, बाधित क्षेत्र व नुकसान भरपाई पुढीलप्रमाणे. भोर तालुका - बाधित गावे ७८, शेतकरी ५२३, बाधित क्षेत्र १६५.६६ हेक्टर, नुकसान भरपाई - २३ लाख १० हजार. वेल्हा तालुका- बाधित गावे २, शेतकरी ११,  क्षेत्र १.२१  हेक्टर,  नुकसान भरपाई-  ३९ हजार रुपये, मावळ - बाधित गावे ७, शेतकरी ११४, क्षेत्र २४  हेक्टर,  नुकसान भरपाई- ३ लाख २६ हजार. हवेली- बाधित गावे १०४, शेतकरी ७ हजार ४९०, क्षेत्र ३१४६.१९ हेक्टर, नुकसान भरपाई- ८ कोटी ३३ लाख २ हजार, खेड- बाधित गा...

अपर कामगार आयुक्तालयाच्या कार्यालयाचे स्थलांतर

जनलोक वार्ता न्यूज नेटवर्क  पुणे दि.३१: अपर कामगार आयुक्त, पुणे विभाग आणि कामगार उप आयुक्त पुणे जिल्हा या शिवाजीनगर, पुणे येथील कार्यालयाचे स्थलांतर शक्ती चेंबर्स, स. नं. ७७/१, दुसरा, तिसरा व चौथा मजला, संगमवाडी, पुणे-४११००३ येथे करण्यात आले आहे, अशी माहिती अपर कामगार आयुक्त शैलेंद्र ब. पोळ यांनी दिली आहे.  अपर कामगार आयुक्त व कामगार उप आयुक्त या दोन्ही कार्यालयाचे कामकाज १ एप्रिल पासून नवीन पत्त्यावर नियमितपणे सुरु होणार असल्याचेही  त्यांनी कळवले आहे. 

‘उत्पादक ते ग्राहक थेट विक्री’ योजनेंतर्गत ‘आंबा महोत्सव’ १ एप्रिलपासून

  जनलोक वार्ता न्यूज नेटवर्क  पुणे दि.३१: महाराष्ट्र राज्य कृषि पणन मंडळ, पुणे व पुणे जिल्हा परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने ‘उत्पादक ते ग्राहक थेट विक्री’ योजनेंतर्गत ‘आंबा महोत्सव २०२३’ चे गुलटेकडी मार्केटयार्ड येथे पीएमटी बस डेपो शेजारील जिल्हा परिषदेच्या मोकळ्या जागेत १ एप्रिलपासून आयोजन करण्यात येणार आहे.   कृषि पणन मंडळामार्फत दरवर्षी ‘उत्पादक ते ग्राहक थेट विक्री’अंतर्गत गु*लटेकडी मार्केटयार्ड येथे आंबा महोत्सवाचे आयोजन २००२ पासून करण्यात येत आहे. विक्री व्यवस्थेमधील मध्यस्थांची संख्या कमी करून शेतकऱ्यांना योग्य बाजारभाव व ग्राहकांना रास्त दरात चांगल्या गुणवत्तेचा आंबा मिळावा या उद्देशाने या महोत्सवाचे आयोजन करण्यात येते. यावर्षी महोत्सवामध्ये रत्नागिरी, सिंधुदुर्ग व रायगड जिल्ह्यातील तसेच राज्यातील केशर आंबा उत्पादकांबरोबरच जिल्हा परिषदेकडील ग्रामिण विकास यंत्रणा विभागाकडील काही महिला बचत गटांचाही सामावेश असणार आहे. आंबा उत्पादकांची नोंदणी प्रक्रिया पणन मंडळाच्या विभागीय कार्यालयाकडे करण्यात येते. छाननीनंतर उत्पादकांना महोत्सवात स्टॉल उपलब्ध करून देण्यात येता...

पक्क्या अनुज्ञप्तीसाठी मासिक दौऱ्याचे आयोजन

  जनलोक वार्ता न्यूज नेटवर्क   पुणे, दि. ३१: एप्रिल २०२३ मध्ये पक्की अनुज्ञप्ती मिळण्याच्यादृष्टीने पिंपरी-चिंचवड उपप्रादेशिक परिवहन कार्यालयातर्फे खेड, मंचर, जुन्नर, वडगाव मावळ आणि लोणावळा येथे मासिक दौऱ्याचे आयोजन करण्यात आले आहे. पक्क्या अनुज्ञप्तीच्या चाचणीसाठी ५ आणि ६ एप्रिल रोजी खेड, १० आणि ११ एप्रिल रोजी मंचर, १७ आणि १८ एप्रिल रोजी जुन्नर, २४ आणि २५ एप्रिल रोजी वडगाव मावळ आणि २७ एप्रिल रोजी लोणावळा येथे मासिक दौऱ्याचे आयोजन करण्यात आले आहे.

पत्रकारांच्या रेल्वे सवलतीचा प्रश्न आठ दिवसांत निकाली काढूरेल्वेमंत्री रावसाहेब दानवे यांचे आश्वासन

इमेज
जनलोक वार्ता न्यूज नेटवर्क  दिल्ली (प्रतिनिधी) : मागील दोन वर्षांपासून राज्य आणि देशातील अधिस्वीकृतीधारक असलेल्या पत्रकारांची रेल्वेमध्ये मिळणारी अर्धा टक्के सवलत काहीही कारण नसताना रेल्वे विभागाने बंद केली. ही बंद केलेली सवलत तातडीने सुरू करावी, यासाठी ‘व्हॉइस ऑफ मीडिया’चे राष्ट्रीय शिष्टमंडळाने केंद्रीय राज्य रेल्वेमंत्री रावसाहेब दानवे यांची भेट घेतली. दानवे यांनी या प्रश्नासंदर्भात येत्या आठ दिवसांत निर्णय घेऊ, अशी माहिती केंद्रीय शिष्टमंडळाला दिली. कोविडच्या काळामध्ये रेल्वेने अनेक प्रवासी सवलती बंद केल्या. महाराष्ट्र राज्यामधील साडेतीन हजार आणि देशामधील अडीच लाखांवून अधिक पत्रकार अधिस्वीकृती धारक आहेत. ते अधिस्वीकृती असणाऱ्या पत्रकारांच्या अर्धेतिकीट योजनेचे लाभधारक आहेत. त्यांनाही याचा फटका बसला, त्यांची सवलत बंद करण्यात आली. घरापासून दूर जाऊन रिपोर्टिंग करणे, शहरांमधल्या असलेल्या पत्रकारांना आपल्या आई-वडिलांना भेटण्यासाठी गावी जाणे, मुलांच्या शिक्षणा संदर्भामध्ये भेटी घेण्यासाठी ये- जा करणे, आजारासंदर्भामध्ये प्रवास करणे, या सगळ्या प्रवासाच्या मूलभूत गरजा सोडवण्यासाठी अधिस्...

पुणे जिल्हा क्रीडा अधिकारी महादेव कसगावडे यांच्या हस्ते क्रीडा शिक्षक प्रशिक्षण शिबीराचे उद्घाटन

इमेज
  जनलोक वार्ता न्यूज नेटवर्क  प्रतिनिधी / लतिफ शेख  बारामती दि.३०,   पुणे जिल्ह्यातील तेरा तालुके, पुणे शहर व पुणे विभाग येथील सर्व माध्यमिक व इंग्रजी माध्यमिक विद्यालयातील क्रीडा शिक्षकांना खेळाचे अद्ययावत ज्ञान मिळवण्यासाठी बारामती येथे प्रशिक्षण वर्गाचे आयोजन करण्यात आले आहे.  या प्रशिक्षण वर्गाचे उद्‌घाटन जिल्हा क्रीडा अधिकारी महादेव कसगावडे यांच्या हस्ते संपन्न झाला. बारामती क्रीडा संकुल येथे 27 मार्च ते तीन एप्रिल पर्यंतया शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे  उद्‌घाटन प्रंसगी राज्यस्तरिय क्रीडा मार्गदर्शक महेश चावले, व मास्टर ट्रेनर म्हणून काम करणारे अशोक देवकर , किरण झुंरगे, विश्वनाथ पाटोळे , लतिफ शेख , जालिंदर आवारी , व इंदापूरचे शरद झोळ , तसेच पुणे जिल्ह्यातील विविध प्रशालेतील क्रीडा शिक्षक उपस्थित होते . प्रशिक्षण वर्गामध्ये सकाळी सहा वाजल्यापासून प्रथम योगा व झुंबा यांनी सुरुवात होऊन नेट बोल, थ्रो बॉल , कबड्डी , लॉग टेनिस , मैदानी खेळ, हॉलीबॉल, तलवारबाजी , अशा विविध खेळाचे अद्ययावत ज्ञान क्रीडा शिक्षकांना देण्यात  येणार आहे. महाराष्ट्र शासना...

कृषि उत्पन्न बाजार समितीवर निवडून आल्यास एका वर्षात जात वैधता प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक

जनलोक वार्ता न्यूज नेटवर्क पुणे दि. ३०: कृषि उत्पन्न बाजार समिती निवडणूकीत राखीव प्रवर्गातील व्यक्तीला नामनिर्देशन पत्रासोबत स्वतः प्रमाणित केलेले जातीचे प्रमाणपत्र सादर करता येणार आहे, मात्र निवडून येणाऱ्या  अशा सदस्यास एका वर्षात जात वैधता प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक राहणार आहे. महाराष्ट्र राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाच्या आदेशात नमूद केल्याप्रमाणे राखीव प्रवर्गातील व्यक्तींनी जात पडताळणी समितीकडे जात वैधता प्रमाणपत्र मिळण्यासाठीचा अर्ज करावा व अर्जासोबत निवडणूक निर्णय अधिकारी यांनी निर्गमीत केलेला नमुना १५ अ मधील प्रमाणपत्र सादर करावे. राखीव प्रवर्गातील व्यक्तीने निवडून आल्याच्या दिनांकापासून बारा महिन्यांच्या आत जात वैधता प्रमाणपत्र सादर करील याबाबतचे विहित नमुन्यातील हमीपत्र सादर करावे.  निवडून आल्याच्या दिनांकानंतर बारा महिन्याच्या आत जात वैधता प्रमाणपत्र सादर न केल्यास अशा उमेदवाराची  निवड भूतलक्षी प्रभावाने रद्द होईल आणि ती व्यक्ती सदस्य राहण्यास अपात्र ठरेल. न्यायालयाच्या आदेशानुसार राज्यातील निवडणूकीस पात्र कृषि उत्पन्न बाजार समितीच्या निवडणूक प्रक्रिया २७ म...