पोस्ट्स

फेब्रुवारी, २०२३ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

अखेर अंगणवाडी सेविकांच्या मागणीला यश ; पगारवाढीसह पेन्शनचा ही लाभ मिळणार ; राज्य सरकारचा मोठा निर्णय

जनलोक वार्ता न्यूज नेटवर्क   मुंबई दि.२८,  राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा आज दुसरा दिवस आहे. या अधिवेशनादरम्यान आज सरकारने काही महत्वाचे निर्णय घेतले. तर अंगणवाडी सेविकांनाही दिलासा देण्याचा निर्णय आज सरकारने घेतला. अंगणवाडी सेविकांच्या अनेक मागण्या गेल्या काही दिवसांपासून प्रलंबित आहेत. यासाठी अनेकवेळा अंगणवाडी सेविकांनी आंदोलनही केले. तर मागील तीन दिवसांपासून राज्यातील 16 जिल्ह्यांतील अंगणवाडी सेविका आणि मदतनीस संपावर आहेत. या पार्श्वभूमीवरच सरकारने अंगणवाडी सेविकांबरोबर झालेल्या बैठकीनंतर अंगणवाडी सेविकांच्या मानधनात १५०० रुपयांची वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे अंगणवाडी सेविकांना मोठा दिलासा मिळाला आहे. सरकारसोबत झालेल्या बैठकीमध्ये अंगणवाडी सेविकांना दिड हजार रुपये मानधन वाढवून मिळणार असल्याचे जाहीर करण्यात आले. तसेच अजूनही त्यांच्या काही मागण्यांबाबत सरकार सकारात्मक असल्याचे सांगण्यात आले. दरम्यान, कर्मचारी आणि सरकार यांच्या सहभागाने पेन्शन देखील सुरु करण्याबाबत सरकार सकारात्मक असल्याचे सांगण्यात आले. तसेच मानधन आणि शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा देण्याची मागणीही अंगणवाडी

अतिवृष्टीबाधित शेतकऱ्यांना 31 मार्चपूर्वी नुकसान भरपाई देणार- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

  जनलोक वार्ता न्यूज नेटवर्क              मुंबई, दि. 28 : महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यात अतिवृष्टी, सततच्या पावसामुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. अतिवृष्टीच्या नुकसान भरपाईपोटी 755 कोटी रुपयांचे वाटप झाले आहे. ज्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळाली नाही, त्या शेतकऱ्यांना 31 मार्चपूर्वी अतिवृष्टीची नुकसान भरपाई मिळेल, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत सांगितले.             याबाबत सदस्य प्रकाश सोळंके यांनी प्रश्न उपस्थित केला होता. त्यावर उत्तर देताना मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले, अतिवृष्टीच्या नुकसान भरपाईसाठी 3 हजार 300 कोटींची अतिरिक्त मागणी आहे. यामध्ये तांत्रिक समितीद्वारे वैधता तपासण्यात येईल. शेतकऱ्यांना विविध नैसर्गिक आपत्तीच्या मदतीसाठी दिल्या जाणाऱ्या 6 हजार 800 कोटींपैकी 6 हजार कोटींचे वाटप झाले आहे. नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर 50 हजार रुपये अनुदान देण्यात येत आहे. आतापर्यंत अनुदानापोटी 4 हजार 700 कोटी वितरित करण्यात आले असून जवळपास 12 लाख शेतकऱ्यांना याचा लाभ झाला आहे, असे मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी सांगितले.

वाल्हेकरवाडीत शिवभक्त प्रतिष्ठान आयोजित शिवजयंती उत्साहात

इमेज
  जनलोक वार्ता न्यूज नेटवर्क प्रतिनिधी / दयानंद गौडगांव   निगडी दि.१९ , अखंड हिंदुस्थानाचे आराध्य दैवत, हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती श्री शिवाजी महाराज यांची जयंती वाल्हेकरवाडीत मोठ्या थाटात साजरा करण्यात आला. शिवभक्त प्रतिष्ठान चे सर्व कार्यकर्ते हे सोलापूर जिल्ह्यातील सीमावर्ती भागातील (कन्नड भाषिक) आहेत. तरीदेखील एवढ्या मोठ्या थाटात शिवजयंती साजरा करुन साऱ्यांच लक्ष वेधून घेतले आहे.               या शिवजयंतीला राजकीय, सामाजिक आणि व्यवसायिक क्षेत्रातील मान्यवरांनी उपस्थिती लावली. यामध्ये भारतीय जनता पक्षाचे नेते शेखर चिंचवडे ,  आदेश नवले, ज्ञानेश्वर वाल्हेकर आदी उपस्थित होते.                या शिवजयंती उत्सवा दरम्यान शालेय विद्यार्थ्यांच्या नृत्य सादर करून प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यात आले. यानंतर महाप्रसादाचे देखील वाटप करण्यात आले. हा उत्सव यशस्वी होण्यासाठी शिवभक्त प्रतिष्ठान चे संस्थापक- नागेश सुतार, अध्यक्ष- मल्लीनाथ सुतार, उपाध्यक्ष -मल्लिनाथ कोरे , सचिव- बाशाभाई मुल्ला, शिवा फुलारी, गोपी अर्जून, गंगाधर गुरव, धनराज पुजारी आदिंनी परिश्रम घेतले. 

आदर्श शिक्षक शांताराम बाबुराव खेसे यांचे दुःखद निधन ; रयत शिक्षण संस्थेत शोककळा

इमेज
  जनलोक वार्ता न्यूज नेटवर्क  प्रतिनिधी  / उत्तम खेसे   राजगुरूनगर दि.२६,  शांताराम खेसे हे रयत शिक्षण संस्था या मोठया संस्थेत वाघेळे ता . शिरूर या संस्थेत ज्ञानदानाचे पवित्र कार्य करीत होते . स्वतः बीएस्सी बी पी एड् असून क्रिडा , गणित , विज्ञान या विषयाचे अध्यापन करीत होते . त्यांच्या मार्ग दर्शनातून अनेक विद्यार्थी खेळात जिल्हा , राज्य पातळीपर्यत घडले . अवघड गणित, विज्ञान विषयाचा दरवर्षी १०० % निकाल एस.एस. सी . बोर्ड  या वर्गाचा लावत असे . त्यांना जिल्हाआदर्श गुणवंत शिक्षक पुरस्कार प्रदान झाला होता . २१ फेब्रुवारी २०२३ रोजी दुपारी राजगुरूनगर पॅथॅलॉजी लॅब मध्ये शुगर, युरीन टेस्ट करण्यासाठी गेले असता , युरीन घेण्यासाठी बाथरूम मध्ये गेले तेथेच त्यांना भोवळ येऊन खाली कोसळले . त्यानंतर हॉस्पिटल मध्ये नेले चेंकिग केले असता त्यांची प्राणज्योत मालविली होती . एक नावाप्रमाणे शांत, संयमी , हुशार शिक्षक हरपला . शैक्षणिक क्षेत्रातील चौकोनी चिरा, आदर्श नेतृत्व, कर्तृत्व काळाच्या पडद्याआड गेल त्यामुळे राजगुरूनगर शहरात दावडी गावात हळहळ व्यक्त होत आहे . त्यांच्या पाठीमागे पत्नी, दोन मुली , एक भाऊ , द

कसबा पेठ मतदारसंघ पोटनिवडणूकीसाठी मतदान साहित्याचे वितरण

इमेज
जनलोक वार्ता न्यूज नेटवर्क  पुणे, दि.२५:  कसबा पेठ विधानसभा पोटनिवडणुकीसाठी निवडणूक यंत्रणा सज्ज झाली असून निवडणूक निर्णय अधिकारी स्नेहा किसवे देवकाते आणि उपजिल्हाधिकारी संजय तेली यांच्या मार्गदर्शनाखाली गणेश कला क्रीडा मंच, स्वारगेट येथे मतदान साहित्याचे वितरण करण्यात आले. कसबा पेठ विधानसभा मतदार संघात रविवार २६ फेब्रुवारी रोजी मतदान होणार आहे. या मतदार संघामध्ये एकूण २ लाख ७५ हजार ६७९ मतदार असून २७० मतदान केंद्रावर मतदान होणार आहे. २६ फेब्रुवारीच्या मतदान प्रक्रियेसाठी १ हजार २५० अधिकारी-कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत. प्रत्येकी १० याप्रमाणे २७ टेबलवर मतदान साहित्याचे वाटप करण्यात आले.  साहित्य वितरणापूर्वी कर्मचाऱ्यांना विहीत नमुन्यातील माहिती भरताना घ्यावयाची काळजी, ईव्हीएम यंत्रातील तांत्रिक अडचणी कशा दूर कराव्यात, साहित्य स्वीकारताना व जमा करताना घ्यावयाची काळजी याबाबत मागदर्शन करण्यात आले. अनुपस्थित कर्मचाऱ्यांच्या बदली काम करण्यासाठी २७ पथके राखीव ठेवण्यात आली आहेत. मतदानादिवशी पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला असून यंत्रणा सज्ज झाली आहे. ६०० पोलीस कर्मचारी व ८३ अधिकारी यांची निय

चिंचवड विधानसभा मतदारसंघ पोटनिवडणूकीसाठी मतदान साहित्याचे वाटप

इमेज
  जनलोक वार्ता न्यूज नेटवर्क   पुणे दि. २५: चिंचवड विधानसभा मतदारसंघ पोटनिवडणूकीसाठी २६ फेब्रुवारी रोजी सकाळी ७ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत मतदान होणार असून निवडणूक निरीक्षक एस. सत्यनारायण आणि निवडणूक निर्णय अधिकारी सचिन ढोले यांच्या उपस्थितीत मतदान कर्मचाऱ्यांना मतदान साहित्याचे वाटप करण्यात आले. थेरगाव येथील स्व.शंकर आण्णा गावडे कामगार भवन येथे सकाळी मतदानाच्या अनुषंगाने निवडणूक विभागामार्फत निवडणूक विषयक कामकाजासाठी नेमण्यात आलेल्या सेक्टर अधिकारी, मतदान केंद्राध्यक्ष, मतदान अधिकारी तसेच सहायक अशा सुमारे ३ हजार प्रशिक्षणार्थींना पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे उप आयुक्त विठ्ठल जोशी यांनी तिसऱ्या टप्प्यातील प्रशिक्षण दिले. प्रशिक्षण सत्रामध्ये मतदानाच्या दिवशी प्रत्यक्ष करावयाच्या कामकाजाबाबत तसेच साहित्य वितरणापूर्वी कर्मचाऱ्यांना विहीत नमुन्यातील माहिती भरताना घ्यावयाची काळजी, ईव्हीएम यंत्रातील तांत्रिक अडचणी कशा दूर कराव्यात, साहित्य स्वीकारताना व जमा करताना काय काळजी घ्यावी याबाबत सविस्तर प्रशिक्षण देण्यात आले.  प्रशिक्षणानंतर मतदान केंद्रावर आवश्यक असलेल्या निवडणूक साहित्याचे केंद्रनि

औरंगाबादचे नाव ‘छत्रपती संभाजीनगर’, उस्मानाबादचे नाव ‘धाराशिव’ ; राज्य सरकारच्या निर्णयाला केंद्र सरकारची मंजुरी

  जनलोक वार्ता न्यूज नेटवर्क              मुंबई, दि. 24 : औरंगाबाद शहराचे नाव ‘छत्रपती संभाजीनगर’आणि उस्मानाबाद शहराचे नाव ‘धाराशिव’ करण्याच्या  राज्य शासनाच्या प्रस्तावास केंद्र सरकारची मंजुरी मिळाली आहे.              औरंगाबाद" या शहराचे नाव बदलून ते "छत्रपती संभाजीनगर" असे करण्याच्या प्रस्तावास भारत सरकारच्या गृह मंत्रालय यांचे पत्र दिनांक २४ फेब्रुवारी, २०२३ अन्वये दिलेल्या अनुमतीनुसार महाराष्ट्र शासन या अधिसूचनेद्वारे असा आदेश देत आहे की, " औरंगाबाद ", तालुका व जिल्हा औरंगाबाद, महाराष्ट्र राज्य या शहराचे नाव बदलून ते “ छत्रपती संभाजीनगर ", तालुका व जिल्हा औरंगाबाद, महाराष्ट्र राज्य असे करण्यात यावे अशी अधिसूचना सामान्य प्रशासन विभागाने जारी केली आहे.             उस्मानाबाद" या शहराचे नाव बदलून ते “धाराशिव" असे करण्याच्या भारत सरकारच्या गृह मंत्रालय यांचे पत्र दिनांक 7 फेब्रुवारी, 2023 अन्वये दिलेल्या  महाराष्ट्र शासन या अधिसूचनेद्वारे, “उस्मानाबाद", तालुका व जिल्हा उस्मानाबाद, महाराष्ट्र राज्य नाव बदलून ते " धाराशिव ” तालुका व जिल्ह

आढले खुर्द येथे कविवर्य विठ्ठल दळवी यांच्या कार्याचा गौरव

इमेज
जनलोक वार्ता न्यूज नेटवर्क  तळेगाव दाभाडे (प्रतिनिधी) : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त मावळ तालुक्यातील आढले येथे कोथुर्णे गावचे सुपुत्र विठ्ठल दळवी यांना त्यांच्या कार्याची दखल घेत गौरविण्यात आला.  त्यांनी अभंग व पोवाडे च्या रुपात महाराष्ट्राची परंपरा व अस्मिता  जपत संत विचारांतून समाजाला एक वेगळी दिशा देणारे पुरोगामी विचारांचा वसा व वारसा जपणारे संत विचारांशिवाय समाजाला पर्याय नाही यासाठी पुन्हा संत व शिव विचारांची समाजाला गरज आहे,  जेव्हा जेव्हा पृथ्वीवर संकट येईल तेव्हा तेव्हा भारतीय पुरातन संस्कृतीचा आधार घ्यावा लागेल. तेव्हाच मानव पृथ्वीवर सुखाने जगेल व जो ग्रंथांचा अभ्यास करेल  तोच पृथ्वीवर तरेल व संतांचा महिमा किती महान आहे याची प्रचिती आणून दिली.  यावेळी ऋषिकेश येवले किसन जगदाळे समीर राक्षे व  समस्त ग्रामस्थांच्या वतीने दळवी यांचा सत्कार करण्यात आला.

चिंचवड मतदारसंघात सुमारे चौदा लाखाची रोकड घेतली ताब्यात

  जनलोक वार्ता न्यूज नेटवर्क  पुणे,दि.२४:- चिंचवड विधानसभा मतदारसंघ पोटनिवडणूकीसाठी नेमण्यात आलेल्या स्थिर  संनियंत्रण पथकाने (स्टॅटिक सर्व्हेलंस टीम) आज दुपारी दळवीनगरमधील भाजीमंडई परिसरात एका वाहनात आढळून आलेली सुमारे १४ लाख रुपयांची रोख रक्कम ताब्यात घेतली. निवडणूक निर्णय अधिकारी सचिन ढोले आणि आचारसंहिता कक्षाचे प्रमुख आबासाहेब ढवळे यांच्या मार्गदर्शनाखाली  एसएसटी  पथकाने ही कामगिरी केली आहे. या पथकाद्वारे निवडणूक कालावधीमध्ये बेकायदेशीर वस्तू, मद्य ताडी इत्यादींची वाहतूक, रोख रकमेची वाहतूक, शस्रास्त्रे अशा बाबींवर देखरेख ठेवण्यात येते. निवडणूक आयोगाच्या नियमानुसार तात्काळ याबाबत आयकर विभागास कळविण्यात आले. त्यानंतर आयकर  विभागाचे पथक घटनास्थळी दाखल झाले. पुढील कारवाईसाठी संबंधित व्यक्ती, वाहन  आणि आढळून आलेली रोख रक्कम पंचनामा करुन आयकर  विभागाकडे सुपूर्द करण्यात आली आहे. एसएसटी पथकाद्वारे  चिंचवड विधानसभा मतदारसंघात विविध भागात वाहनांची तपासणी करण्यात येत असून २४ तास हे पथक कार्यरत आहे. या पथकाद्वारे धडक कारवाई करण्यात येत असून आचारसंहिताभंगाबाबत कोणताही अनुचित प्रकार घडू नये, याद

कसबा पेठ मतदारसंघात आतापर्यंत २८ लाख रुपये भरारी पथकाकडून ताब्यात ; कायदा व सुव्यवस्थेसाठी पोलीस बंदोबस्तात वाढ

जनलोक वार्ता न्यूज नेटवर्क  पुणे, दि.२४: कसबा पेठ विधानसभा मतदारसंघात निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यापासून प्रशासनाने १३ हजार ५४२ वाहनांची तपासणी केली असून नाके तपासणी व भरारी पथकांच्या तपासणीत एकूण पाच घटनांमध्ये २८ लाख १८ हजार ५०० इतकी रक्कम ताब्यात घेण्यात आली आहे. ही रक्कम शासकीय कोषागारात जमा करण्यात आली आहे भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार कसबा पेठ विधानसभा पोट निवडणूकीच्या प्रचारास शुक्रवार सायंकाळी ६ वाजेपासून प्रतिबंध आहेत.  पोलीस बंदोबस्तातही वाढ करण्यात आली असून नाके तपासणी आणखी कडक करण्याचे नियोजन प्रशासनामार्फत करण्यात आले आहे. प्रचार समाप्ती नंतर कुठेही अनुचित प्रकार घडू नये तसेच कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस प्रशासनाला सूचना देण्यात आल्या आहेत, असे कसबा पेठ विधानसभा मतदार संघाच्या निवडणूक निर्णय अधिकारी स्नेहा किसवे-देवकाते यांनी कळविले आहे.

पोटनिवडणूक मतदानादिवशी अधिकारी, कामगारांना भरपगारी सुट्टी द्यावी ; औद्योगिक आस्थापनांना उद्योग विभागाचे निर्देश

  जनलोक वार्ता न्यूज नेटवर्क  पुणे, दि.२४: २१५-कसबा पेठ व २०५- चिंचवड या दोन विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणूकीअंतर्गत रविवार २६ फेब्रुवारी २०२३ रोजी मतदान होणार आहे. निवडणूकीमध्ये उद्योग, ऊर्जा व कामगार विभागांतर्गत येणाऱ्या सर्व उद्योग समूह, महामंडळे, कंपन्या व संस्थांमध्ये, औद्योगिक उपक्रम किंवा इतर आस्थापनामध्ये काम करणारे कामगार, अधिकारी, कर्मचारी यांना मतदानाचा हक्क् बजावता यावा यासाठी रविवार  २६ फेब्रुवारी २०२३ रोजी भरपगारी सुट्टी अथवा २ तासाची सवलत देण्याबाबत परिपत्रक शासनाने जारी केले आहे.  लोकप्रतिनिधीत्व कायदा, १९५१ मधील कलम १३५(ब) नुसार मतदानाच्या दिवशी सर्वसाधारणपणे मतदारांना त्यांचा मतदानाचा हक्क बजावता यावा यासाठी भरपगारी सुट्टी देण्यात येते किंवा काही ठिकाणी कामाच्या तासात योग्य ती सवलत देण्यात येते. मात्र गेल्या काही निवडणूकांमध्ये संस्था/आस्थापना भरपगारी सुट्टी किंवा सवलत देत नसल्याचे आढळून आले असून अनेक मतदारांना त्यांच्या मतदानापासून वंचित रहावे लागते, जे लोकशाहीसाठी अत्यंत घातक आहे. त्यामुळे उद्योग, ऊर्जा व कामगार विभागाने हे परिपत्रक जारी केले आहे. *कामानिमित्त मत

संत गाडगेबाबा जयंती निमित्त ग्रामीण भागात स्वच्छतेसंबंधीत कामांचा शुभारंभ

इमेज
जनलोक वार्ता न्यूज नेटवर्क  पुणे, दि. 24: संत गाडगेबाबा जयंती निमित्त काल गुरुवारी  जिल्ह्यात स्वच्छ भारत मिशन ग्रामीण अंतर्गत वैयक्तिक शौचालय, सार्वजनिक शौचालय बांधकाम, घनकचरा व्यवस्थापन प्रक्रिया प्रकल्प आदी विविध विकास कामांचे लोकार्पण तसेच शुभारंभ गावस्तरावर करण्यात आला, अशी माहिती जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी दिली. जिल्ह्यात स्वच्छ भारत मिशन (ग्रा) टप्पा-2 ची गतीने अंमलबजावणी सुरु असून या अंतर्गत गावस्तरावर वैयक्तिक शौचालय बांधकाम, सार्वजनिक शौचालय बांधकाम, घनकचरा व्यवस्थापन प्रक्रिया प्रकल्प, सांडपाणी व्यवस्थापन प्रक्रिया प्रकल्प आदी राबवून गावात शाश्वत स्वच्छता ठेऊन गावे ‘हागणदारीमुक्त अधिक’ (ओडीएफ+) घोषित करण्यात येत आहे.  2022- 23 मध्ये जिल्ह्यातील गावांत स्वच्छ भारत मिशन अंतर्गत गावे ‘ओडीएफ+’ घोषित करण्याचे नियोजन करण्यात आले होते. त्यानुसार 2022-23 मध्ये जिल्ह्यात 1 हजार 125 वैयक्तिक शौचालय बांधकाम करून ते वापरात आणण्यात आलेले आहेत. तसेच 65 वैयक्तिक शौचालय बांधकामाचा शुभारंभ करण्यात आला आहे. मंजूर करण्यात आलेल्या 253 सार्वजनिक शौचालय युनिट पैकी बांध

निवडणूक प्रशासन आणि तरुणांकडून मतदानाचे आवाहन

इमेज
जनलोक वार्ता न्यूज नेटवर्क  पुणे, दि. २४: कसबा पेठ विधानसभा मतदार संघाच्या पोट निवडणुकीच्या अनुषंगाने अपर मुख्य सचिव व मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांच्या उपस्थितीत मतदार जनजागृतीसाठी रॅलीचे आयोजन करण्यात  आले. मतदारसंघातील विविध भागात भेट देऊन मतदार राजाला मतदानाचे आवाहन करण्यात आले.    यावेळी निवडणूक निरीक्षक निरज सेमवाल,  जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. राजेश देशमुख, उपजिल्हाधिकारी अजय पवार, वर्शिप अर्थ फाऊंडेशनचे संस्थापक पराग मते, मुख्य कार्यकारी अधिकारी तेजस गुजराथी  उपस्थित होते. लोकशाही प्रक्रियेत मतदारांचा सहभाग महत्वाचा असल्याने निवडणूक आयोगाने सर्वसमावेशक मतदानावर भर दिला आहे. २६ फेब्रुवारी रोजी मतदारांनी मतदानाचा अमूल्य हक्क अवश्य बजवावा. मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी जास्तीत जास्त मतदारांनी आपला सहभाग द्यावा आणि मतदानाचा संदेश घरोघरी पोहोचवावा, असे आवाहन मुख्य निवडणूक अधिकारी श्री. देशपांडे यांनी केले. *लोकशाहीच्या उत्सवात तरुणाईचा सहभाग* सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या राष्ट्रीय सेवा योजने आणि स.प. महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी मतदार जागृ

मावळ येथे आपत्ती मित्र प्रशिक्षणाचे आयोजन

जनलोक वार्ता न्यूज नेटवर्क  पुणे दि.24: राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण नवी दिल्ली, राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण मुंबई आणि जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण जिल्हाधिकारी कार्यालय पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने मावळ येथे आपत्ती मित्र प्रशिक्षण कार्यक्रम 2022-23 चे आयोजन करण्यात आले आहे.  जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख आणि निवासी उपजिल्हाधिकारी हिम्मत खराडे यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित या प्रशिक्षणाला चांगला प्रतिसाद मिळाला असून मावळ आणि मुळशी तालुक्यातील शिवदुर्ग मित्र लोणावळा, वन्यजीव रक्षक मावळ, मुळशी आपत्ती व्यवस्थापन पथक, गिरी प्रेमी संस्था या आपत्कालीन संस्थेचे स्वयंसेवक आणि सर्पमित्र असे एकूण 87 तरुण ह्या प्रशिक्षण कार्यक्रमात सहभागी झाले आहेत.  बारा दिवसाच्या या प्रशिक्षणात आपत्ती व आपत्ती चे प्रकार, आणीबाणी, प्रथमोपचार, धोके ओळखणे, आपत्कालीन चक्र, भूकंप, पूर, चक्रीवादळ, वीज पडणे, कृत्रिम श्वासोच्छवास, आग व आगीचे प्रकार, व्हर्टीकल रेस्क्यू इत्यादी गोष्टींचे प्रात्यक्षिकांसह प्रशिक्षण देण्यात येत आहे. जिल्ह्यामध्ये कुठल्याही प्रकारची आपत्ती ओढवल्यास हे प्रशिक्षणार्थी

आचारसंहितेचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करण्याचा निवडणुक निर्णय अधिकाऱ्यांचा इशारा

  जनलोक वार्ता न्यूज नेटवर्क  पुणे,दि.२३:- चिंचवड विधानसभा मतदारसंघ पोटनिवडणूकीसाठी  २६ फेब्रुवारी  रोजी मतदान होणार आहे. प्रचाराचा कालावधी  २४ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ६ वाजता संपणार आहे. या कालावधीनंतर प्रचाराच्या बाबतीत निवडणूक आयोगाने लागू केलेल्या मार्गदर्शक सूचनांची काटेकोर अंमलबजावणी केली जाणार असून आदर्श आचारसंहितेचे उल्लंघन करणाऱ्या व्यक्ती, संघटना  तसेच राजकीय पक्षांवर कडक कारवाई केली जाईल, असे निवडणुक निर्णय अधिकारी सचिन ढोले यांनी कळविले आहे.    मतदान बंद होण्याच्या ४८ तास अगोदर सुरु असलेला प्रचाराचा कालावधी संपल्यानंतर, मतदारसंघाबाहेरून आलेले आणि त्या मतदारसंघाचे मतदार नसलेले राजकीय नेते इत्यादींनी त्या मतदार संघात उपस्थित राहू नये. अशा नेत्यांनी प्रचाराचा कालावधी समाप्त होताच तो मतदार संघ सोडावा. उमेदवार किंवा त्यांचे निवडणूक प्रतिनिधी यांना ही बाब लागू होणार नाही. केवळ निवडणुकीच्या कालावधीत राज्याचा प्रभारी असलेल्या पदाधिकाऱ्यांच्या बाबतीत अशा निर्बंधाचा आग्रह धरला जात नाही. असा पदाधिकारी राज्य मुख्यालयातील आपले राहण्याचे ठिकाण घोषित करील आणि प्रस्तुत कालावधीतील त्याची य

उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार -२०२२ करिता प्रवेशिकांना ८ मार्चपर्यंत मुदतवाढ

जनलोक वार्ता न्यूज नेटवर्क    पुणे, दि. २३: उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार-२०२२ करीता  १ जानेवारी २०२२ ते ३१ डिसेंबर, २०२२ पर्यंतच्या कालावधीत प्रसिद्ध झालेल्या लेखन/छायाचित्रे/वृत्तकथा यांच्या प्रवेशिका ३१ जानेवारी २०२३ पर्यंत मागविण्यात आल्या होत्या, तथापि, प्रवेशिका पाठविण्यास ८ मार्च २०२३ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. माहिती व जनसंपर्क महासंचालनालयामार्फत उत्कृष्ट पत्रकारिता, उत्कृष्ट लेखन, उत्कृष्ट दूरचित्रवाणी वृत्तकथा, उत्कृष्ट छायाचित्रकार, समाज माध्यम आणि स्वच्छता अभियानाबाबत केलेल्या जनजागृतीपर लेखनासाठी पुरस्कार देण्यात येतात.  उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार २०२२ चे माहितीपत्रक/अर्जाचे नमुने महासंचालनालयाच्या https://dgipr.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. तसेच राज्यातील विविध भागातील स्पर्धकांना संबंधित जिल्हा माहिती कार्यालयाकडून तर मुंबई शहर व मुंबई उपनगर जिल्ह्यातील इच्छुकांना, माहिती व जनसंपर्क महासंचालनालय, तळमजला, हुतात्मा राजगुरु चौक, मादाम कामा मार्ग, मंत्रालय, मुंबई-३२ येथून विहित नमुन्यातील अर्ज प्राप्त करुन घेता येईल.

कसबा पेठ मतदारसंघात मतदान प्रक्रियेविषयी मार्गदर्शन

इमेज
जनलोक वार्ता न्यूज नेटवर्क  पुणे,दि.२२: कसबा पेठ विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी मतदान केंद्रप्रमुखांमार्फत मतदार मार्गदर्शिका आणि मतदार चिठ्ठ्यांचे वाटप करून मतदारांना मतदानाचा हक्क बजाविण्याचे आवाहन करण्यात येत आहे. मतदारसंघातील २७० मतदान केंद्रातील अधिकारी आणि कर्मचारी या उपक्रमात सहभागी झाले आहे. मतदारांना मार्गदर्शिकेच्या माध्यमातून मतदान कसे करावे याबाबत मार्गदर्शन करण्यात येत आहे. त्यांना मतदार यादीतील नाव, क्रमांक आणि मतदान केंद्र याविषयीदेखील माहिती देण्यात येत आहे. यासाठी मतदान केंद्र अधिकारी घरोघरी भेट देत असून नागरिकांचाही या उपक्रमाला चांगला प्रतिसाद मिळतो आहे. आतापर्यंत ६९ हजार मतदार चिठ्ठ्यांचे वाटप करण्यात आले असून एकूण अडीच लाखाहून अधिक मतदारांपर्यंत निवडणूक कर्मचारी पोहोचणार आहेत. नागरिकांचा  मतदान प्रक्रियेत सहभाग वाढविण्याचा हा निवडणूक प्रशासनाचा प्रयत्न आहे. याला जनजागृती उपक्रमांचीही जोड देण्यात आली असून मतदारसंघातील विविध भागात उपक्रम आयोजित करण्यात येत आहेत.  मतदारांना माहिती देण्यासाठी निवडणूक आयोगाने मार्गदर्शिका तयार केली आहे. यात मतदार यादीतील नाव शोध

निवडणूक कर्मचाऱ्यांना ईव्हीएमचे प्रशिक्षण

इमेज
जनलोक वार्ता न्यूज नेटवर्क   पुणे,दि..२३:-चिंचवड विधानसभा मतदारसंघ पोटनिवडणूकीसाठी मतदान कामकाजासाठी  मतदान केंद्राध्यक्षांसह इतर कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात आली असून या कर्मचाऱ्यांना ईव्हीएम यंत्र हाताळणीचे प्रात्यक्षिकासह प्रशिक्षण निवडणुक विभागामार्फत  निवडणुक निर्णय अधिकारी कार्यालय थेरगाव येथे देण्यात येत आहे.   मतदान प्रक्रीयेवेळी मशीन सीलबंद करण्यासाठी आवश्यक तांत्रिक बाबींचे प्रशिक्षणदेखील या ठिकाणी दिले जात आहे. मतदारांनादेखील ईव्हीएम यंत्रावर मताधिकार बजावण्यासाठी माहितीपर मार्गदर्शन करण्यात येत आहे. शुक्रवार २४ फेब्रुवारी रोजी सकाळी  ११ ते सायंकाळी  ५ वाजेपर्यंत  प्रशिक्षण सुरु राहणार आहे. या उपक्रमाची पाहणी निवडणूक निरिक्षक एस. सत्यनारायण यांनी केली. या उपक्रमाला  नागरिकांचा  चांगला  प्रतिसाद मिळाला.  अशिक्षित, वयोवृद्ध, नवोदित मतदारांना ईव्हीएम यंत्राद्वारे मताधिकार बजावताना  कोणत्याही अडचणी येऊ नये, यादृष्टीने त्यांना माहिती दिली जात आहे.  नागरिकांनी सकाळी  ११ ते सायंकाळी  ५ या वेळेत या सुविधेचा लाभ घ्यावा असे आवाहन निवडणूक निर्णय अधिकारी सचिन ढोले यांनी केले आहे. *निवडण