पोस्ट्स

अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाला रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (A) उपाध्यक्ष पुणे जिल्हा व खेड तालुका युवक अध्यक्षांचा पाठिंबा

इमेज
  जनलोक वार्ता न्यूज नेटवर्क  प्रतिनिधी :दत्ता भगत  खेड दि.११, एकात्मिक बालविकास सेवा योजनेत वर्षेनुवर्षे काम करणारे अंगणवाडी कर्मचा-यांनी त्यांच्या वेतनात वाढ देण्यात तसेच सुप्रिम कोर्टाचा निर्णयनुसार ग्रॅच्युईटीची रक्कम व पेन्शन देणे योजनेच्या कामासाठी मोबाईल देणे, लाभार्थ्यांच्या दरात वाढ करणे या व इतर त्यांचे प्रश्न व मागण्या मान्य करावे व थकित टी.ए.डी.ए. व आहाराचे थकित पैसे देण्यात यावे. या मागणीसाठी देशाच्या घटनेने त्यांना दिलेले अधिकारानुसार त्यांनी दि. ४.१२.२०२३ पासुन त्यांनी संपावर गेल्या आहे. संपावर जाण्याचा त्याचा कायदेशीर अधिकार आहे. त्यांच्या मागण्या शासनाने व आपले कार्यालय मान्य करीत नाही, तर संपावर असलेल्या महिलांना कामावरून कमी करण्याची नोटिस दिले आहे. परिणामी तालुक्यातील सर्व अंगणवाडी कर्मचा-यांमध्ये मोठा असंतोष पसरलेला आहे. आम्हाला बेकायदेशीर नोटिस देऊन आम्हाला न्याय न देण्याचा आपल्या प्रकल्प कार्यालयाकडून केलेल्या कारवाईचा निषेध करण्यासाठी व धमकी, व नोकरीतून कमी करण्याच्या नोटिसची होळी करण्याकरीता व शासन प्रशासनाने अंगणवाडी कर्मचा- यांच्या मागण्या त्वरी...

राजगुरुनगर शहरांमध्ये निरामय नेत्रालय तृतीय वर्धापन दिन उत्साही वातावरणात संपन्न

इमेज
जनलोक वार्ता न्यूज नेटवर्क  प्रतिनिधी दत्ता भगत  खेड दि.११, राजगुरूनगर येथे सर्वोत्तम नेत्रसेवा पुरवित असतानाच समाजातील विविध घटकांच्या सर्वांगीण आरोग्याकरिता आत्मियतेने झटणाऱ्या निरामय नेत्रालयाचा तृतीय वर्धापन दिवस नुकताच साजरा केला गेला. त्या निमित्ताने गिर्यारोहण विषयक दोन व्याख्यानांचं आयोजन करण्यात आलं होतं. शिवछत्रपती राज्य साहसी हा सर्वोच्च क्रीडा पुरस्कार प्राप्तएव्हरेस्टवीर  जितेंद्र गवारे Maha Adventure Council (MAC) ह्या साहसी क्रीडाप्रकारांशी संलग्न असणाऱ्या राज्यपातळीवरील संस्थेचे डायरेक्टर श्री ओंकार ओक या व्याख्यात्यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. दि. ७ जानेवारी २०२४ रोजी ओकेजन बॅंक्वेट येथे साजरा झालेल्या या कार्यक्रमास गिर्यारोहणप्रेमी व निरामयच्या रूग्णांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. किल्ले कसे पाहावेत या विषयावर मार्गदर्शन करताना  ओंकार ओक यांनी किल्ल्यांच्या विविधतेचे अनेक पैलू श्रोत्यांना उलगडून दाखविले.  जितेंद्र गवारे आपल्या एव्हरेस्ट मोहिमेचा अनुभव विषद करताना श्रोते भारावून गेले होते. निरामय नेत्रालयाच्या भविष्यातील वाटचालीबद्दल बोलतान...

अटकावून ठेवलेली वाहने सोडवून नेण्याचे आवाहन

जनलोक वार्ता न्यूज नेटवर्क  पुणे दि.११: प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या वायुवेग पथकाने थकीत कर वसुलीसाठी तसेच मोटार वाहन कायद्यातील अन्य गुन्ह्यांतर्गत कार्यालयाच्या आवारात अटकवून ठेवलेली वाहने मोटार वाहन कर व दंड भरून पुढील ७ दिवसांत सोडवून नेण्याचे आवाहन प्रादेशिक परिवहन कार्यालय, पिंपरी चिंचवड यांनी केले आहे. प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या आवारातील अशी वाहने मालक, चालक यांच्या जबाबदारीवर अटकावून ठेवलेली आहेत. ही वाहने सोडवून नेण्यासाठी वाहन मालकांनी परिवहन कार्यालयात वाहन कर, दंड भरलेला नाही अथवा वाहने नेण्यासाठी संपर्क केलेला नाही.  प्रादेशिक परिवहन कार्यालयाने मोटार वाहन थकीत कराच्या वसुलीसाठी अटकावून ठेवलेल्या वाहनांच्या जाहीर लिलावाची प्रक्रियादेखील सुरु केलेली आहे. त्यापैकी ४ वाहनांच्या मालकांना कार्यालयाने पाठविलेल्या नोटीस वाहन मालक नोंदणीकृत पत्त्यावर आढळून न आल्याने त्यांना पोच झालेल्या नाहीत. अशा वाहनांची यादी परिवहन कार्यालयाच्या सूचना फलकावर प्रदर्शित केलेली आहे. मोटार वाहन कायद्यातील तरतुदीनुसार वाहन मालकांनी नोंदणी प्रमाणपत्रावर पत्ता बदलाची नोंद पत्ता बदल झाल्...

पवनामाई पुन्हा फेसाळली ; प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे पवना नदीची दुर्दशा

इमेज
जनलोक वार्ता न्यूज नेटवर्क  निगडी दि.११, गेल्या अनेक दिवसांपासून सतत पवना नदीपात्रात रसायनयुक्त पाणी सोडले जातात. थेरगांव येथील केजुबाई बोटिंग क्लब च्या परिसरातील हा दृश्य आहे. याआधी सुध्दा अनेक वेळा पवना नदीपात्रात दूषित पाण्यामुळे कित्येक सामाजिक संस्थाने आवाज उठवला होता. तसेच अनेक वेळा माध्यमांतून प्रतिक्रिया व्यक्त करण्यात आल्या होत्या. तरीदेखील प्रशासन या नद्या दूषित करणाऱ्यांवर कारवाई का करत नाही, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.  केजुबाई बोटिंग क्लबला दररोज शेकडो पर्यटक भेट देत असतात. अशा पर्यटन स्थळांच्या परिसरात स्वच्छता असण्याकडे प्रशासनाचे लक्ष असणे आवश्यक आहे. हा प्रकार असाच चालू राहीला तर येण्याऱ्या काळात पवना नदीची केमिकल नदीत रुपांतर होईल अशी भिती नागरिक व्यक्त करीत आहेत.

विश्वविक्रम प्रस्थापित करणाऱ्या उधोजकाने अजित पवारांच्या उपस्थित केला राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये प्रवेश

इमेज
जनलोक वार्ता न्यूज नेटवर्क  पुणे दि .१०, टॅलेंट कॉर्प सोल्युशन चे डायरेक्टर आणि कौशल्य विकास क्षेत्रात विश्व विक्रम प्रस्थापित करणारे युवा उधोजक डॉ. महेबूब सय्यद यांनी आपल्या शेकडो सहकाऱ्यांसह महाराष्ट्राचे उप मुख्यमंत्री अजित दादा पवार यांच्या उपस्थितीत मोशी येथे भव्य कार्यक्रमात पक्ष प्रवेश केला. डॉ. महेबूब सय्यद यांनी सामाजिक क्षेत्रात विविध उपक्रम राभवून रोजगार, कौशल्य विकास, शैक्षणिक, शेती क्षेत्रात भरीव योगदान दिले आहेत. रोजगार क्षेत्रात टॅलेंट कॉर्प सोल्युशनच्या माध्यमातून 15 हजार पेक्षा अधिक तरुणांना रोजगार उपलब्ध करून वेगळी ओळख निर्माण केली, तसेच नवं उधोजकांना मार्गदर्शन व व्यवसायिक संधी उपलब्ध करून दिली. डॉ. महेबूब सय्यद हे अनेक सामाजिक संघटनाच्या राष्ट्रीय आणि राज्य कार्यकरणीवर महत्वाची जबाबदारी पार पाडत आहेत. त्यांच्या या कामगिरीचे कौतुक राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय स्थरावर अनेक दिगग्ज संस्थेतर्फे करण्यात आली आहे. त्यांच्या कार्याची दखल घेत उप मुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते राष्ट्रवादी काँग्रेस रोजगार व स्वयं रोजगार विभागाच्या प्रदेश सरचिटणीस पदी नियुक्ती करण्यात आ...

अखिल महाराष्ट्र विश्वकर्मा सुतार समाज महासंघ आयोजित भव्य राज्यस्तरीय वधू वर पालक परिचय मेळावा

इमेज
जनलोक वार्ता न्यूज नेटवर्क  खेड ( प्रतिनिधी संतोष गाडेकर ) : अखिल महाराष्ट्र विश्वकर्मा सुतार समाज महासंघाच्या वतीने आयोजित भव्य वधुवर पालक परिचय मेळावा गणेश कला क्रीडा मंच नेहरू स्टेडियम स्वारगेट पुणे येथे दिनांक १६ जानेवारी  २०२४ वार मंगळवार रोजी सकाळी ८ ते सायंकाळी ६ वाजेपर्यत होत असून हे वर्षे १९ वे आहे. अशी माहिती मिळाली. अखिल महाराष्ट्र विश्वकर्मा सुतार समाज महासंघाची स्थापना संस्थापक अध्यक्ष ज्ञानेश्वर भालेराव यांनी केली असुन गेली १९ वर्षे अविरत पणे सामाजिक कार्य करत असुन याही वर्षी  प्रदेशध्याक्ष हनुमंतराव पांचाळ यांच्या मार्गदर्शनाखाली वधुवर पालक परिचय मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. मेळाव्याचे औचित्य साधून समाज एकत्रीत यावं हेच ध्येय ठेवून सामाजिक, मेडिकल, शैक्षणिक व सांस्कृतिक तसेच समाज उपयोगी असे अनेक उपक्रम होत असतात.  ह्या वर्षी  ४०००-४५०० हजार मेळाव्यास समाज बांधव उपस्थित रहाणार आहेत. आपण  सह परिवार या राज्य स्तरीय वधु वर पालक परिचय मेळाव्यात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन संस्थे तर्फे करण्यात आले आहे.  पुणे शहर महिला अध्यक्ष ...

पोलादपूरातून १६ वर्षीय तरूणी बेपत्ता ; शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल

पोलादपूर (प्रतिनिधी - योगेश रांजणे) , पोलादपूरातून एक 16वर्षीय तरुणी बेपत्ता झाल्याची घटना घडली आहे.पोलादपूर शहरातील अनंन नगर येथून कुमारी कस्तुरी महेश शाहा वय १६ वर्षे ४ महिने ही मंगळवार दिनांक 09 जानेवारी रोजी सायंकाळी चार वाजल्या पासून बेपत्ता असल्याची फिर्याद देण्यात आली आहे. कस्तिरीची आई रुपाली महेश शाहा यांनी पोलादपूर पोलिस ठाण्यात पोलादपूर पोलिस ठाण्यात अज्ञात व्यक्ती विरोधात भारतीय दंड विधान कलम 363प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास पोलादपूर पोलिस ठाण्यात सहायक पोलिस निरीक्षक युवराज मस्कर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उप नरीक्षक अर्वी भोसले करीत आहेत.