पोस्ट्स

दुचाकी मालिकेतील आकर्षक क्रमांक तीनपट शुल्क भरुन चारचाकींसाठी राखून ठेवता येणार

  जनलोक वार्ता न्यूज नेटवर्क  पुणे, दि. १३ : पुणे प्रादेशिक परिवहन कार्यालय येथे लवकरच दुचाकी वाहनांसाठी नवीन मालिका सुरु करण्यात येत आहे. या मालिकेतील आकर्षक नोंदणी क्रमांक तीनपट शुल्क भरून खासगी चारचाकी वाहनांसाठी राखून ठेवण्यासाठी तसेच उर्वरित क्रमांकाबाबत दुचाकींसाठी आगाऊ अर्ज स्वीकारण्याची व लिलाव कार्यपद्धतीची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. नव्याने सुरु होणाऱ्या दुचाकी मालिकेतील आकर्षक तसेच पसंतीचे क्रमांक चारचाकींसाठी हवे असलेल्या वाहन मालकांनी विहित तीनपट शुल्कासह १६ ऑक्टोबर रोजी सकाळी १०.३० ते दुपारी २.३० वाजेपर्यंत विहित नमुन्यात अर्ज करावा. एकाच क्रमांकाकरीता एकापेक्षा जास्त अर्ज आल्यास त्याची यादी कार्यालयाच्या सूचना फलकावर प्रसिद्ध करण्यात येईल. लिलावाचे धनाकर्ष (डीडी) १७ ऑक्टोबर रोजी दुपारी २.३० वाजेपर्यंत स्वीकारले जातील. त्याच दिवशी दुपारी ४ वाजता सहकार सभागृहामध्ये लिलाव करण्यात येईल. दुचाकी वाहन मालकांनी आकर्षक तसेच पसंतीचे क्रमांक विहित शुल्क भरून हवे असल्यास १७ ऑक्टोबर रोजी सकाळी १०.३०  ते दुपारी २.३० वाजेपर्यंत अर्ज करावा. एकाच क्रमांकाकरीता एकापेक्ष...

पुणे महानगर क्षेत्राच्या प्रारूप रचनेत शहरासाठी आवश्यक बाबींचा समावेश करा-उपमुख्यमंत्री अजित पवार

जनलोक वार्ता न्यूज नेटवर्क  पुणे, दि. १३:उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शासकीय विश्रामगृह येथे झालेल्या बैठकीत पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या नगर विकास रचना आणि प्रारूप विकास योजनेच्या आढावा घेतला. प्रारूप विकास योजनेत शहरासाठी आवश्यक सर्व बाबींचा समावेश करावा, असे निर्देश श्री.पवार यांनी यावेळी दिले.  बैठकीला विभागीय आयुक्त सौरभ राव, जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख, पीएमआरडीए आयुक्त राहुल महिवाल, क्रीडा आयुक्त सुहास दिवसे, पीएमआरडीए अतिरिक्त आयुक्त दीपक सिंघल  आदी उपस्थित होते. उपमुख्यमंत्री श्री.पवार म्हणाले, आराखड्यात पुरेशा प्रमाणात हरितक्षेत्र आणि पाण्यासाठी लोकसंख्येनुसार आवश्यक नियोजन करण्यात यावे. पीएमआरडीएमध्ये नव्या आकृतीबंधानुसार कर्मचारी भरती करतांना पूर्वी काम केलेल्या कंत्राटी कर्मचाऱ्यांचा अनुभव लक्षात घेण्याविषयी एमपीएससीला विनंती करण्यात यावी. भौगोलिक रचना लक्षात घेऊन अग्निशमन यंत्रणा उभी करावी, अशा सूचना त्यांनी दिल्या. यावेळी क्रीडा विद्यापीठासाठी  जागा निवडीबाबत चर्चा करण्यात आली. क्रीडा विद्यापीठाच्या कामासाठी निधी उपलब्ध करून दिला जाईल असे ...

माजी सैनिकांना १३६ इन्फंट्री बटालियन (टीए) इको, महार मध्ये नोकरीची संधी

  जनलोक वार्ता न्यूज नेटवर्क  पुणे, दि.१३ : माजी सैनिकांना १३६ इन्फंट्री बटालियन (टीए) इको, महार मध्ये नोकरीची संधी उपलब्ध झाली असून कोल्हापूर येथील १०९  इन्फंट्री बटालियन (टीए) मराठा लाईट इन्फंट्री येथे १७ ते २० ऑक्टोबर या कालावधीत भरती प्रक्रिया राबविण्यात येणार असल्याचे जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाने कळविले आहे.  नोकरीसाठी ५ वर्षाच्या आतील सेवानिवृत्त असलेले व  वय ५० वर्षापेक्षा कमी असलेले माजी सैनिक पात्र राहतील.  सेवानिवृत्ती वेतन आदेश (पीपीओ), सेवा पुस्तिका (डिस्चार्ज बुक), सध्याचे ८ रंगीत पासपोर्ट साईज फोटो, शैक्षणिक प्रमाणपत्र, रहिवाशी दाखला व  आधार कार्ड इत्यादी कागदपत्रे तयार ठेवावीत. अधिक माहितीसाठी भ्रमणध्वनी क्रमांक ९१६८१६८१३६ वर संपर्क साधावा. पुणे जिल्ह्यातील इच्छुक व पात्र माजी सैनिकांनी १७ ऑक्टोबर रोजी सकाळी ५ वाजता १०९ इन्फंट्री बटालियन (टीए) मराठा लाईट इन्फंट्री, कोल्हापूर (महाराष्ट्र) येथे उपस्थित रहावे, असे आवाहनही जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी लेफ्टनंट कर्नल हंगे स. दै. (नि.) यांनी केले आहे.           ...

महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांची बालगृहाला भेट

इमेज
  जनलोक वार्ता न्यूज नेटवर्क  पुणे, दि.१३: महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी येरवडा येथील बालभवनला भेट  देऊन परिसराची पाहणी केली.  यावेळी आमदार सुनील टिंगरे, महिला व बालविकास आयुक्त डॉ. प्रशांत नारनवरे, सहआयुक्त राहुल मोरे, विभागीय उपआयुक्त संजय माने, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी मोनिका रंधवे आदी उपस्थित होते. श्रीमती तटकरे म्हणाल्या, बालभवनात २२ विद्यार्थी महिला व बालविकास विभागाच्यावतीने देण्यात येणाऱ्या शासनाच्या बालसंगोपन सुविधेचा लाभ घेत आहेत. परिसरात महिला व बाल विकास विभागाच्या जागेवर असलेल्या जुन्या इमारतींचे  ऐतिहासिक महत्व जपत  नियमांचे पालन करुन याठिकाणी नवीन इमारती उभारण्याची कार्यवाही करण्यात येणार आहे. परिसरात महिला बचत गटासाठी सुविधा, नोकरदार महिलासांठी वसतीगृहे आदी सुविधा देण्याच्या विचार करण्यात येत आहे. त्यासाठी उपलब्ध जागेचे योग्य नियोजन करण्याच्या संबंधितांना सूचना देण्यात आल्या आहेत. महिला व बाल विकास आयुक्त कार्यालयासाठी पुर्वीच्या प्रस्तावामध्ये बदल करुन त्यामध्ये आणखीन नवीन बाबी समाविष्ट करण्यात येणार आहे. नवीन इमारतीमध्ये...

डेक्कन वाहतूक विभागाअंतर्गत पार्किंग व्यवस्थेत बदल

जनलोक वार्ता न्यूज नेटवर्क   पुणे, दि. १२  : डेक्कन वाहतुक विभागांतर्गत  गांधी क्लासीक कॉर्नरवरील व मॅजिस्टीक विल्स पासून पुढे पार्किंगसंदर्भात यापूर्वी काढलेल्या तात्पुरत्या आदेशांवर नागरिकांच्या सूचना विचारात घेऊन पार्किंग व्यवस्थेत बदल करण्याबाबत अंतिम आदेश निर्गमित करण्यात आले आहेत. त्यानुसार गांधी क्लासीक अपा. (उजवी बाजू) कॉर्नरवर जोशी हॉस्पिटल बोर्डापासून पुढे लाईटचा पोल नंबर ८८/३४ पर्यंत तसेच मॅजिस्टीक विल्स पासून पुढे लाईट डीपी शेजारी असलेल्या शेफालीका सोसायटी पर्यंत १५ मीटर नो पार्किंग करण्यात आले आहे, असे पुणे शहर वाहतुक विभागाचे पोलीस उपआयुक्त विजयकुमार मगर यांनी कळविले आहे.

धनगर समाजातील विद्यार्थ्यांसाठी पंडित दीनदयाल उपाध्याय स्वयंम योजना

  जनलोक वार्ता न्यूज नेटवर्क  पुणे, दि. १२  : वसतिगृह योजनेपासून वंचित असलेल्या  धनगर समाजातील विद्यार्थ्यांना आदिवासी विकास विभागाच्या धर्तीवर पंडीत दिनदयाल उपाध्याय स्वयंम योजना सूरू करण्यास शासनाने मान्यता दिली असल्याची  माहिती समाजकल्याण विभागाने दिली आहे.  महानगरपालिका, विभागीय शहरे व जिल्हास्तरीय शैक्षणिक संस्थांमध्ये शिक्षण घेत असलेल्या धनगर समाजातील विद्यार्थी  इयत्ता १२ वी नंतरचे उच्च शिक्षण घेताना निवासी व शैक्षणिक सुविधांपासून वंचित राहू नये यासाठी दीनदयाळ उपाध्याय स्वयंम योजना सुरू करण्यात आलेली आहे. विद्यार्थ्याने मान्यताप्राप्त शासकीय, शासन अनुदानित आणि कायम विनाअनुदानित महाविद्यालय, तंत्रनिकेतनांमध्ये शासनाने निर्धारित केलेल्या व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी केंद्रीभूत प्रवेश प्रक्रियेद्वारे प्रवेश घेतलेला असावा   आणि विद्यार्थी शासकीय वसतिगृह योजनेपासून वंचित असलेला भटक्या जमाती 'क' प्रवर्गामधील धनगर समाजातील असावा. या योजनेअंतर्गत भोजन, निवास व इतर शैक्षणिक साहित्य उपलब्ध करून देण्यासाठी विद्यार्थ्यांना  आधार संलग्न बँक खात्...

अन्न व औषध प्रशासन मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांच्या उपस्थितीत अन्न व औषध प्रशासन पुणे विभागाची आढावा बैठक ; अन्न पदार्थात भेसळ करणाऱ्या विक्रेत्यावर कडक कारवाई करा–मंत्री धर्मरावबाबा आत्राम

इमेज
जनलोक वार्ता न्यूज नेटवर्क  पुणे, दि. १२ : नागरिकांचे आरोग्य व जनहित विचारात घेवून नागरिकांना स्वच्छ, निर्भेळ  अन्न प्राप्त होणे आवश्यक आहे. त्यासाठी अन्न पदार्थात भेसळ करणाऱ्या विक्रेत्यावर अन्न व औषध प्रशासनाने कडक कारवाई करावी, असे निर्देश अन्न व औषध प्रशासन मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांनी दिली.  व्हीव्हीआयपी विश्रामगृह येथे आयोजित अन्न व औषध प्रशासनच्या पुणे विभाग आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी पुणे विभागाचे सह आयुक्त (अन्न) सुरेश अन्नपुरे, सह आयुक्त (औषधे) एस. व्ही. प्रतापराव,  तसेच पुणे विभागातील अन्न व औषध प्रशासनाचे सहायक आयुक्त उपस्थित होते.  मंत्री श्री. आत्राम म्हणाले,  सणासुदीच्या दिवसात  नागरिकांचा कल विविध मिठाई पदार्थ खरेदी करण्याकडे असतो. अशावेळी नागरिकांना भेसळ मुक्त, स्वच्छ पदार्थ कसे मिळतील हे पाहवे. हॉटेलचे किचन स्वच्छ  असल्याबाबत वेळोवेळी तपासणी करण्यात यावी. कार्यालयात येणाऱ्या तक्रारीवर तातडीने कार्यवाही करावी. सध्या ऑनलाईन खरेदीवरही नागरिकांचा कल वाढत आहे, त्यावर देखरेख ठेवावी. कॉस्मेटिक, अॅलोपॅथिक, आयुर्वेदिक उत्पादकांच...