पोस्ट्स

गोल्डन कार्ड काढणे शिबीरास लाभार्थ्यांचा मोठ्या प्रमाणात प्रतिसाद

इमेज
जनलोक वार्ता न्यूज नेटवर्क    प्रतिनिधी/ विशाल खुर्द        शिराळा दि.२३,    शिराळा नगरपंचायत मार्फत प्रधानमंत्री जन आरोग्य व महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजने अंतर्गत सन 2011 च्या जनगणनेच्या सर्व्हेक्षणानुसार शहरातील 2900 लाभार्थांची आयुष्मान भारत गोल्डन कार्ड लाभार्थी म्हणून केंद्र शासनाकडून निवड झाली असून गोल्डन कार्ड धारकांना दरवर्षी पाच लाखापर्यतचा आरोग्य विषयक उपचार मोफत मिळणार असल्याने शिराळा नगरपंचायत मार्फत आज दिनांक 23/01/2023 व दिनांक 24/01/2023 रोजी प्रधानमंत्री जन आरोग्य व महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजने अंतर्गत विशेष शिबिर आयोजित करण्यात आले होते.त्यापैकी दिनांक 23/01/2023  रोजी शिराळा शहरामध्ये डॉ.बाबासाहेब आंबेडकर समाज मंदिर शिराळा , लक्ष्मी मंदिर, कदमवाडी रोड नवजीवन वसाहत शिराळा , इंदिरा गणेश मंडळ शिराळा , यादव हॉस्पिटल जवळ कॉलेज रोड, शिराळा , मारुती मंदिर होळीचे टेक शिराळा या 5 ठिकाणी आयोजित केले होते. सदर शिबिरामध्ये लाभार्थ्यांचा मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला असून  एकूण 350 गोल्डन कार्ड काढण्यात आले आहेत...

इकोहोरायझन फार्मर कंपनी अंतर्गत सनएज केअर प्राईम मॉलचे राजगुरुनगर मध्ये सुरेखा मोहिते यांच्या हस्ते उद्घाटन

इमेज
  जनलोक वार्ता न्यूज नेटवर्क  प्रतिनिधी / लतिफ शेख   खेड : इकोहोरायझन फार्मर कंपनी अंतर्गत सनएज केअर प्राईम मॉलचे राजगुरुनगर मध्ये सुरेखा मोहिते यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. कंपनीचे अध्यक्ष छगनजी राठोड अशोक तोडमल ,उद्योजक व प्रेरणादायी वक्ता ,मनोज कुमार ढगे , कृषी अधिकारी वैभव चव्हाण ,सर्जेराव पिंगळे , सतीश नाईकरे ,राष्ट्रपती पदक विजेते विठ्ठल भोर ,केशव बनकर , चेतन पोखरकर , साहेबराव सातकर , पत्रकार दत्ता भगत , रामदास रेटवडे, व आसपास गावातील बहुसंख्य शेतकरी उपस्थित होते . या मॉलमध्ये आयुर्वेदिक प्रोडक्ट , हेल्थकेअर , सौंदर्य प्रसाधने ,आर्युवेदिक उत्पादने व 100% आयुर्वेदिक प्रॉडक्ट राजूनगरमधील लोंकाना  प्राप्त होणार आहे . या कार्यक्रमाची दिप प्रज्वलन करून झाली. त्यानंतर प्रेरणादायी वक्ते अशोक तोडणकर यांनी आपले विचार व्यक्त केले . व कंपनीचे अध्यक्ष छगन जी राठोड यांनी कंपनीचे तीन उद्दिष्टे सांगितली ती म्हणजे जमिनीला काळ्या आईला वाचवणे ,राष्ट्रप्रेम , व समाज जागृती , व महिला सबलीकरण , हे कंपनीचे उद्दिष्ट असून प्रामुख्याने रासायनिक खत वापरल्यामुळे अनेक आजारांचे मूळ आ...

ग्यान ज्योत इंग्लिश स्कूल आळंदी मध्ये राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांची जयंती साजरी

इमेज
जनलोक वार्ता न्यूज नेटवर्क  प्रतिनिधी -विजय धादवड आळंदी देवाची : मुक्तादेवी शिक्षण प्रसारक मंडळ व पद्मावती देवी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित ग्यान ज्योत इंग्लिश स्कूल आळंदी देवाची मध्ये राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद  यांची जयंती साजरी करण्यात आली. विद्यार्थीनी राजमाता जिजाउंच्या वेशभूषेत अतिशय सुंदर दिसत होत्या. विद्यार्थ्यांनी विविध प्रकारच्या वेशभूषा केल्या होत्या.विद्यार्थ्यांनी आपल्या भाषणातून राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांचा जीवनपट सांगून त्यांच्या कार्याची माहिती सांगितली..याप्रसंगी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष राजेंद्र घुंडरे, संचालिका कीर्ती घुंडरे, , मुख्याध्यापक ,सर्व शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन ऋतुजा भारंबे व अक्षरा आघाव यांनी केले.

शिवछत्रपती खेड तालुका माध्यमिक शिक्षक सेवक सहकारी पतसंस्थेच्या निवडणुकीत विकास पॅनेलने उडविला परिवर्तन पॅनेलचा धुव्वा

जनलोक वार्ता न्यूज नेटवर्क  प्रतिनिधी / बाळासाहेब मुळे खेड/ चाकण : शिवछत्रपती खेड तालुका माध्यमिक शिक्षक सेवक सहकारी पतसंस्था मर्यादित चाकण या पतसंस्थेची निवडणूक पार पडली यामध्ये दोन पॅनल अनुक्रमे विकास पॅनल,  परिवर्तन पॅनल व अपक्ष या मध्ये मतदान झाले.      मतदान प्रक्रिया पार पडली असता विकास पॅनलने १२/० अशी बाजी मारली .इतर मागास प्रवर्गामधुन मधुकर नाईक ,सर्वसाधारण प्रवर्गामधुन  अविनाश कड ,विजय पवार ,राजेंद्र चौधरी ,बाळासाहेब  मुळे आदलिंगे विलास, काळे संतोष, घेनंद पांडुरंग ,घोरपडे सरिता  ,टोपे एकनाथ  ,शेलार नंदकुमार , अनुसूचित प्रवर्गामधुन आव्हाड प्रशांत हे बारा उमेदवार बहुमताने विजयी झाले. एकुण १५ सभासद असुन तीन बिनविरोध निवड झालेले उमेदवार पुढीलप्रमाणे भटक्या जाती प्रवर्गातुन देवकाते हरीदास, महिला वर्गातून खराबी प्रिती, शेरकर अंजली यांची निवड झाली.      महत्वाचे म्हणजे विरोधी पॅनलने निवडणूक प्रचारा दरम्यान अपप्रचार करुन सुध्दा सुजान मतदारांनी विकास पॅनलच्या उमेदवारांना निवडूण दिले.       विकास पॅनला भरघोस ...

जि.प.प्राथमिक शाळा -ठाकरवाडी वेताळे शाळेस एनप्रो इंडस्ट्रीज लि.पुणे व रोटरी क्लब ऑफ निगडी ,कर्वे समाजसेवा संस्था पुणे यांचे कडून साहित्य वाटप

इमेज
  जनलोक वार्ता न्यूज नेटवर्क  प्रतिनिधी / योगेश माळशिरसकर      राजगुरुनगर  दि.१२, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा ठाकरवाडी वेताळे या शाळेस  एनप्रो इंडस्ट्रीज लिमिटेड पुणे, रोटरी क्लब ऑफ निगडी - पुणे, कर्वे समाजसेवा संस्था पुणे यांच्या वतीने अनेक साहित्याचे वाटप करण्यात आले.  यामध्ये, १. ई-लर्निंग व सोलर संच २. पिण्याच्या पाण्याची १५०० लिटर पाण्याची साठवणूक क्षमतेची टाकी , लोखंडी स्टँड व संपूर्ण प्लंबिंग ३. कृतियुक्त शैक्षणिक साधने ४. शालेय परसबाग ५. वृक्षारोपण ६. २ के.व्ही. क्षमतेचे सौरउर्जा  संच युनिट  ७. सॅनिटरी पॅड वेडिंग मशीन इत्यादी सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या.         कडूस, दोंदे , वेताळे, सायगाव या ग्रामपंचायत क्षेत्रातील १४ ठाकर वस्त्यांमध्ये ग्राम समृद्धी प्रकल्पाच्या माध्यमातून दुर्गम आदिवासी क्षेत्रातील ठाकर वस्त्यांसाठी आदिवासी विकास योजनेअंतर्गत शाळेस या सुविधा उपलब्ध करत देण्यात आल्या. शाळेमध्ये राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांचे व कामाचे मान्यवरांनी कौतुक केले. समाजातील लोकांनी विकासात्मक कामामध्...

ग्रामपंचायत निवडणूकीचा खर्च सादर करण्याचे आवाहन

इमेज
  जनलोक वार्ता न्यूज नेटवर्क  पुणे दि. ११: जिल्ह्यात १८ डिसेंबर रोजी पार पडलेल्या ग्रामपंचायत निवडणूकीमध्ये खर्चाचा हिशोब सादर न करणाऱ्या उमेदवारांवर अपात्रेची कारवाई सुरू करण्यात येणार असून २० जानेवारी २०२३ पर्यंत निवडणूक खर्चाचा हिशेब सादर करण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.  पुणे जिल्ह्यामध्ये १८ डिसेंबर २०२२ रोजी २२१ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणूका पार पडल्या. या निवडणूकीचा निकाल २३ डिसेंबर २०२२ रोजी जाहीर करण्यात आला आहे. या निवडणूकीमध्ये सदस्य पदासह थेट सरपंच पदाच्या २ हजार ७४ जागांसाठी ३ हजार ५३२ उमेदवारांनी निवडणूक लढविली आहे. तसेच ७६१ उमेदवार बिनविरोध निवडून आलेले आहेत.  निवडणूक लढविणाऱ्या व बिनविरोध निवडून आलेल्या एकूण ४ हजार २९३ उमेदवारांनी त्यांचा निवडणूकीच्या खर्चाचा हिशेब  २० जानेवारी २०२३ पर्यंत संबंधित निवडणूक निर्णय अधिकारी अथवा तहसिल कार्यालयात प्रतिज्ञापत्रासह जमा करणे आवश्यक आहे. खर्चाचा हिशोब प्रतिज्ञापत्रासह सादर न करणाऱ्या उमेदवारांना अपात्र करण्याबाबतची कार्यवाही जिल्हा प्रशासनामार्फत तातडीने सुरु करण्यात येणार आहे....

कारागृहातील बंदीजनांनी तयार केलेल्या वस्तूंचे प्रदर्शन व विक्री; कारागृह उत्पादित वस्तू लवकरच ‘ई-मार्केटप्लेस’ वर- कारागृह व सुधारसेवा महानिरीक्षक अमिताभ गुप्ता

इमेज
जनलोक वार्ता न्यूज नेटवर्क  पुणे, दि. ११: मकर संक्रांती सणानिमित्त कारागृहातील बंदीजनांनी तयार केलेल्या वस्तूंचे प्रदर्शन व विक्रीचे उद्घाटन उद्योग विक्री केंद्र येरवडा मध्यवर्ती कारागृह येथे अपर पोलीस महासंचालक व राज्याचे कारागृह व सुधारसेवा महानिरीक्षक अमिताभ गुप्ता यांच्या हस्ते करण्यात आले. कारागृह उत्पादित वस्तू ई-मार्केटप्लेस वर लवकरच नागरिकांसाठी खरेदीसाठी उपलब्ध करून देण्यात येतील, असे श्री. गुप्ता यावेळी म्हणाले. यावेळी पश्चिम विभागाच्या कारागृह उपमहानिरीक्षक स्वाती साठे, मुख्यालयाचे कारागृह उपमहानिरीक्षक सुनील ढमाळ, येरवडा मध्यवर्ती कारागृहाचे अधीक्षक शिवशंकर पाटील, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या सचिव मंगल कश्यप आदी उपस्थित होते. कारागृहातील बंदीजनांमध्ये अनेक सुप्त कलागुण असतात, असे सांगून श्री. गुप्ता म्हणाले, बंदीजनांना त्यांचे कलागुण, छंद कारागृहात असताना जोपासण्यासाठी पोषक वातावरण उपलब्ध करून दिल्यास त्यांच्याकडून विविध कल्पक गोष्टींची निर्मिती होत असते. बंदी कामात गुंतले गेल्याने ते कारागृहातील कालावधीत सतत व्यस्त राहतात. कायद्यानुसार बंद्यांना पुरवणे आवश्यक असलेल्...