पोस्ट्स

नॅशनल ॲवॉर्डसाठी प्रस्ताव सादर करावे ; मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांचे आवाहन

जनलोक वार्ता न्यूज नेटवर्क               मुंबई, दि. 11 : नागरिकांमध्ये मतदानाबाबत शिक्षण आणि जाणिव जागृती करण्यासाठी काम करणाऱ्या माध्यम संस्थांना भारतीय निवडणूक आयोगाच्या वतीने राष्ट्रीय पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे. यासाठी माध्यम संस्थांनी अर्ज करावेत, असे आवाहन राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी केले आहे.             चार गटांसाठी हे पुरस्कार आहेत. प्रिंट मिडिया, टेलिव्हिजन, रेडिओ आणि ऑनलाईन (इंटरनेट) सोशल मीडियासाठी हे पुरस्कार आहेत. प्रमाणपत्र, मानचिन्ह आणि रोख रक्कम असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. पुरस्काराचे वितरण राष्ट्रीय मतदार दिनी म्हणजेच दि. 25 जानेवारी रोजी केले जाईल, असे त्यांनी सांगितले. पुरस्काराची निवड मतदार जनजागृती करण्यासाठी केलेल्या उपाययोजनांची गुणवत्ता, उपाययोजनांची वारंवारता, उपाययोजनांचा मतदारांवर झालेला परिणाम, निवडणुकीच्या सुलभतेबाबतची प्रसिद्धी आणि इतर अनुषंगिक उपाययोजना या मुद्यावर निवड केली जाईल, अशी माहिती श्री. देशपांडे यांनी यांनी यावेळी दिली.             पुरस्कारासाठी अर्ज सादर करण्यासाठीच्या अटी आणि नियम याबाबतची माहिती भारतीय

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते पुढारी हेल्थ आयकॉन पुरस्काराचे वितरण ; आरोग्य विषयक योजनांचा लाभ देण्याचे राज्यपालांचे डॉक्टरांना आवाहन

इमेज
जनलोक वार्ता न्यूज नेटवर्क पुणे, दि.११:  प्रधानमंत्री आयुष्यमान योजना, प्रधानमंत्री भारतीय जनऔषधी योजना या सारख्या आरोग्य योजनांचा वंचित, गरीब, असाह्य घटकातील रुग्णांना लाभ देण्याचे आवाहन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केले.  पुढारी माध्यम समूहाच्यावतीने हॉटेल हयात येथे आयोजित 'पुढारी हेल्थ आयकॉन पुरस्कार' वितरण समारंभ प्रसंगी ते बोलत होते. यावेळी पद्मविभूषण डॉ.कांतीलाल संचेती, मुख्य संपादक पद्मश्री डॉ. प्रतापसिंह जाधव, अध्यक्ष तथा समूह संपादक योगेश जाधव, समूह सरव्यवस्थापक अनिल पाटील, पुणे आवृत्तीचे संपादक सुनील माळी आदी उपस्थित होते. श्री. कोश्यारी म्हणाले, कोरोनाच्या काळात देशात डॉक्टर, परिचारिका, पोलीस, प्रशासन यांच्यासह समाजातील सर्व घटकामध्ये राष्ट्रभावना निर्माण होवून एकजुटीने आपआपल्या पद्धतीने सेवा करत होते. डॉक्टरांचे कार्य पवित्र व पुंण्याचे आहे. लोक डॉक्टरांकडे देव म्हणून जातात. प्रत्येक डॉक्टर आपल्याला क्षेत्रात तज्ज्ञ असतो. ते रुग्ण बरे होण्यासाठी उत्तम उपचार करतात.  रुग्णसेवेतून डॉक्टरांना आनंद मिळतो. स्वतःचे आर्थिक हित आणि उपचार यामध्ये संतुलन राखत डॉक्टर  रुग्णस

जिल्हा ग्रंथोत्सवाचे १५ व १६ नोव्हेंबर रोजी आयोजन

जनलोक वार्ता न्यूज नेटवर्क पुणे, दि. ११: महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक धोरण-२०१० अंतर्गत उच्च व तंत्र शिक्षण विभाग ग्रंथालय संचालनालय मुंबई व जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने १५ व १६ नोव्हेंबर रोजी पंडित जवाहरलाल नेहरू सभागृह, घोलेरोड, शिवाजीनगर, येथे ग्रंथोत्सव- २०२२ चे आयोजन करण्यात आले आहे.  या निमित्ताने ग्रंथ प्रदर्शन, विक्री आणि त्यासोबतच विविध साहित्यिक व सांस्कृतीक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. ग्रंथोत्सवाचे उदघाटन जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांच्या हस्ते होणार असून उदगीर येथे झालेल्या ९५ व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे अध्यक्ष भारत सासणे हे कार्यक्रमाचे अध्यक्ष असतील.  ग्रंथोत्सवाचा समारोप १६ नोव्हेंबर रोजी राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री तथा पुणे जिल्ह्याचे चंद्रकांत दादा पाटील यांच्या उपस्थितीत होणार आहे. समारोप कार्यक्रमास राज्याचे ग्रंथालय संचालक द. आ. क्षीरसागर, जेष्ठ साहित्यिक आणि राज्य साहित्य संस्कृती मंडळाचे अध्यक्ष डॉ. सदानंद मोरे उपस्थित असतील अशी माहिती जिल्हा ग्रंथालय अधिकारी श्रीमती श्रे. श्री. गोखले यांनी दिली. *कार्य

भारतीय नौदलाचे कार्य प्रेरणादायी’ नौदलाचे कामकाज पाहून विधिमंडळ सदस्यांच्या भावना

  जनलोक वार्ता न्यूज नेटवर्क मुंबई, दि. १० : भारतीय नौदलाचे कामकाज कसे चालते, युद्धनौकांचे संचलन कसे होते, युद्धनौकेवरील जवान कशा पद्धतीने खडतर परिस्थितीत कामकाज करतात, शोध आणि बचाव कार्यात भारतीय नौदल कशा पद्धतीने योगदान देते याची प्रत्यक्ष पाहणी करण्याची संधी आज विधानमंडळ सदस्यांना मिळाली. भारतीय नौदलाचा पश्चिम विभाग आणि महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालयातील वि. स. पागे संसदीय प्रशिक्षण केंद्र यांच्यामार्फत आयोजित करण्यात आलेल्या ‘एक दिवस समुद्रावर’ या कार्यक्रमांतर्गत युद्ध नौकेस भेट देण्याच्या या उपक्रमात विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील, माजी मंत्री जयकुमार रावल, महादेव जानकर यांच्यासह भारतीय नौदलाचे व्हाईस ॲडमिरल आर. स्वामिनाथन, रेअर ॲडमिरल महेश सिंह, नौसेनेच्या पश्चिम बेड्याचे कमांडींग ऑफिसर समीर सक्सेना आदी वरिष्ठ अधिकारी यावेळी उपस्थित होते. आमदार संजय सावकारे, अमोल मिटकरी, आकाश फुंडकर, समाधान औताडे, राजेश एकडे, हरीश पिंपळे, शेखर निकम, अनिल भाईदास पाटील, कुमार आयलानी, वसंत खंडेलवाल, रोहित पवार, अभिमन्यू पवार, राजू पारवे, बाबासाहेब

"सांस्कृतिक धोरण समिती" कार्याध्यक्षपदी डॉ. विनय सहस्रबुद्धे यांची नियुक्ती - सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार

  जनलोक वार्ता न्यूज नेटवर्क मुंबई, दि. 10 : राज्याच्या सांस्कृतिक धोरणाचा फेरआढावा घेण्यासाठी एक समिती नुकतीच गठीत करण्यात आली आहे. या समितीच्या कार्याध्यक्षपदी डॉ. विनय सहस्रबुद्धे यांची नियुक्ती करण्यात आली असल्याची माहिती सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली. नव्याने नियुक्त करण्यात आलेल्या समितीत सांस्कृतिक कार्यमंत्री हे अध्यक्ष असतील, तर डॉ. विनय सहस्त्रबुद्धे हे कार्याध्यक्ष असतील. सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव, उपसचिव,पर्यटन विभागाचे उपसचिव, पर्यटन संचालनालयाचे व्यवस्थापकीय संचालक, क्रीडा संचालनालयचे आयुक्त, पुराभिलेख संचालनालयाचे संचालक, दर्शनिका विभागाचे कार्यकारी संपादक व सचिव, भाषा संचालनालयाचे संचालक, माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे संचालक, कला संचालनालयाचे संचालक, पुरातत्व व वस्तुसंग्रहालयाचे संचालक हे शासकीय सदस्य असतील. याशिवाय गिरीश प्रभुणे, नामदेव कांबळे, सुहास बहुळकर, कौशल इनामदार, बाबा नंदनपवार,जगन्नाथ हिलीम, सोनू दादा म्हस हे या समितीत अशासकीय सदस्य असतील. सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे संचालक हे या समितीचे सदस्य सचिव असतील. नव्याने नियुक्त

जिल्ह्यात १२ नोव्हेंबर रोजी राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन

जनलोक वार्ता न्यूज नेटवर्क पुणे, दि. १०: राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, नवी दिल्ली आणि महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण उच्च न्यायालय, मुंबई यांच्या निर्देशानुसार जिल्ह्यातील सर्व न्यायालयामध्ये शनिवार १२ नोव्हेंबर रोजी राष्ट्रीय लोक अदालत आयोजित करण्यात येणार आहे.  या लोकअदालतीमध्ये प्रलंबित असलेली दिवाणी, फौजदारी, मोटार अपघात नुकसान भरपाई, कलम १३८ निगोशिएबल इन्स्टुमेंट्स अॅक्ट, भूसंपादन, कौटुंबिक प्रकरणे, औद्योगिक कामगार व सहकार न्यायालयातील प्रकरणे मोठया प्रमाणात ठेवण्यात आलेली आहेत. तसेच विविध बँका, पतसंस्था, वित्तीय संस्था तसेच विविध ग्रामपंचायती व पुणे मनपा आणि पिंपरी चिंचवड मनपा यांचेकडील घरपट्टी, पाणीपट्टीची प्रकरणे, बीएसएनएल, आयडिया व्होडाफोन, महाराष्ट्र राज्य विद्युत महामंडळ, आदींकडील बाकी असलेली देयके इत्यादी दाखलपूर्व प्रकरणे तडजोडीने मिटविण्याकरीता मोठ्या प्रमाणात ठेवण्यात आलेली आहेत. पुणे जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाकडून घेण्यात आलेल्या मागील राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये ८ हजारपेक्षा अधिक प्रकरणे निकाली काढत पुणे जिल्ह्याने राज्यात आपले प्रथम स्थान कायम ठेवले आहे. लोकन्

मुंबई-पुणे द्रुतगती मार्ग ‘मिसींग लिंक’ प्रकल्प देशात पथदर्शी ठरेल-मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

इमेज
जनलोक वार्ता न्यूज नेटवर्क पुणे, दि.१०: जगातील अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून बांधण्यात येणारा मुंबई-पुणे द्रुतगती मार्गाअंतर्गत मिसिंग लिंक प्रकल्प हा देशात पथदर्शी  प्रकल्प होणार असून लाखो प्रवाशांना फायदेशीर ठरेल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केले. डिसेंबर २०२३ हा प्रकल्प पूर्णत्वास येईल असेही त्यांनी यावेळी सांगितले. मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी मुंबई पुणे द्रुतगती मार्गावरील खोपोली ते कुसगाव या लांबीतील नवीन मार्गिकेच्या (मीसिंग लिंक) प्रकल्पाला भेट देऊन लोणावळा (सिंहगड संस्था) येथे सुरू असलेल्या बोगद्याच्या कामाची पाहणी केली. त्यानंतर माध्यमांशी संवाद साधताना ते बोलत होते. यावेळी खासदार श्रीरंग बारणे, महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे (एमएसआरडीसी) महासंचालक राधेश्याम मोपलवार, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त अंकुश शिंदे, एमएसआरडीसीचे अधीक्षक अभियंता राहुल वसईकर आदी उपस्थित होते ‘मिसिंग लिंक’ प्रकल्पात जगातील अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे. हे काम अतिशय आव्हानात्मक होते. लोणावळा तलावाच्या तळाखाली जवळपास ५०० त

महाराष्ट्राला ‘टीआयओएल’चा जुरी पुरस्कार प्रदान

इमेज
जनलोक वार्ता न्यूज नेटवर्क नवी दिल्ली, 8 :  महाराष्ट्राला ‘टॅक्स इंडिया ऑनलाईन (टीआयओएल)’चा जुरी (निवड समिती) पुरस्कार आज  प्रदान  करण्यात आला. येथील ताज पॅलेस मध्ये दिमाखदार सोहळ्यात हा मानाचा पुरस्कार तामिळनाडू राज्याचे वित्तमंत्री पलानीवेल त्यागराजन यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. जीएसटीचे विशेष आयुक्त अनिल भंडारी, संयुक्त आयुक्त जी. श्रीकांत, स्वाती काळे, संजय निकम, श्री. पोपळघाट यांनी हा पुरस्कार स्वीकारला. मुंबई आणि पुणे झोनला यावेळी सन्मानित करण्यात आले. यावेळी राज्य सभा सदस्य सुशील मोदी, पंजाब चे माजी अर्थमंत्री मनप्रीत सिंग बादल, सेंट्रल बोर्ड ऑफ एक्साइज अँड कस्टम्सच्या माजी अध्यक्ष प्रवीण महाजन या व्यासपीठावर उपस्थित होत्या. तसेच देशभरातील विविध नामवंत संस्थेचे प्रमुख सभागृहात उपस्थित होते. महाराष्ट्र कर संकलनाच्या बाबतीत नेहमीच पहिले राज्य राहिलेले आहे. मागील वित्तीय वर्षात दोन लाख 18 हजार कर संकलन करून महाराष्ट्राने देशाच्या कर संकलनात जवळपास पंधरा टक्के योगदान दिले आहे. तसेच वर्ष 2022-23 मध्ये आत्तापर्यंत एक लाख 55 हजार विक्रमी कर संकलन केले आहे. इज ऑफ डूइंग बिजनेस ( Eas

टिळक महाराष्ट्र विद्यापीठाला आयएसओ मानांकन प्रदान सोहळा ; नवीन शिक्षण धोरणात लोकमान्य टिळकांच्या राष्ट्रीय शिक्षणाच्या भूमिकेवर भर- महसूल मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील

इमेज
  जनलोक वार्ता न्यूज नेटवर्क पुणे, दि. ८: केंद्र सरकारतर्फे आत्मनिर्भर भारताची संकल्पना राबविली जात आहे. मात्र या संकल्पनेचे प्रेरणास्थान लोकमान्य टिळक आहेत. नवीन शिक्षण धोरणातही लोकमान्यांच्या राष्ट्रीय शिक्षणाच्या भूमिकेवर भर देण्यात आला आहे. रोजगार, नोकरी आणि समाजाच्या गरजेनुसार शिक्षणाचा त्यात समावेश करण्यात आला आहे, असे प्रतिपादन राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी केले.  टिळक महाराष्ट्र विद्यापीठाला 'आएसओ 21001:2018'  मानांकन प्रदान सोहळा आणि  विद्यापीठाचे कुलपती डॉ. दीपक टिळक यांनी लिहिलेल्या‘जाणिवा कर्मयोगाच्या' या पुस्तकाच्या प्रकाशन कार्यक्रमात  ते बोलत होते. यावेळी विद्यापीठाचे कुलपती डॉ. दीपक टिळक, प्र. कुलगुरू डॉ. गीताली टिळक, टिमवी ट्रस्टचे उपाध्यक्ष डॉ. रोहित टिळक, विश्वस्त डॉ. प्रणती  टिळक, प्र-कुलसचिव अभिजीत जोशी, सचिव अजित खाडीलकर, 'आयएसओ'चे पुणे विभागाचे प्रमुख अनिल कदम आदी उपस्थित होते. लोकमान्य टिळकांच्या राष्ट्रीय शिक्षणाचा वारसा चालविण्याचे कार्य टिळक महाराष्ट्र विद्यापीठ अविरत करत आहे अशा शब्दात विद्यापीठाचा गौरव करून मंत्री श्री

रोजगार मेळाव्यांच्या आयोजनासाठी आता भरीव आर्थिक तरतूद- कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा

जनलोक वार्ता न्यूज नेटवर्क              मुंबई, दि 8 :- राज्यातील उद्योग, कारखाने, खाजगी आस्थापना, कॉर्पोरेट संस्था यामधील रोजगार भरतीसाठी कौशल्य विकास विभागामार्फत वेळोवेळी रोजगार मेळाव्यांचे आयोजन करण्यात येते. या मेळाव्यांच्या आयोजनासाठी आता भरीव आर्थिक तरतूद करण्यात आली असून विभागीय तसेच जिल्हास्तरावरील प्रत्येक मेळाव्यासाठी 5 लाख रुपयांपर्यंत खर्च करण्यास मान्यता देण्यात आली आहे, अशी माहिती कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नावीन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी दिली.             राज्यात ठिकठिकाणी रोजगार मेळाव्यांचे प्रभावीपणे आयोजन करून बेरोजगारांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी विभागाने पुढाकार घेतला आहे. महास्वयम वेबपोर्टल मार्फतही बेरोजगार उमेदवारांना कंपन्यांमध्ये रोजगार मिळवून देण्यासाठी प्रयत्न करण्यात येतात. आतापर्यंत विभागीय स्तरावरील रोजगार मेळाव्यासाठी 1 लाख रुपये तर जिल्हास्तरावरील रोजगार मेळाव्यासाठी 40 ते 60 हजार रुपयांपर्यंत  खर्च करण्याची मर्यादा होती. आता ही मर्यादा विभागीय आणि जिल्हास्तरावरील कोणत्याही मेळाव्यासाठी 5 लाख रुपयांपर्यंत वाढविण्यात आली आहे. त्यामुळे रोजगा

मुख्य निवडणूक आयुक्त आणि निवडणूक आयुक्त यांच्या उपस्थितीत ९ नोव्हेंबर रोजी पुणे येथे मतदार यादीचा विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमाचा देशपातळीवरील शुभारंभ-मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांची पत्रकार परिषदेत माहिती

इमेज
जनलोक वार्ता न्यूज नेटवर्क पुणे, दि. ७ : भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार आणि निवडणूक आयुक्त अनुपचंद्र पांडे  यांच्या प्रमुख उपस्थितीत १ जानेवारी २०२३ या अर्हता दिनांकावर आधारित देशपातळीवरील छायाचित्रासह मतदार यादीचा विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमाचा देशपातळीवरील शुभारंभ ९ नोव्हेंबर रोजी पुणे येथे होणार असल्याची माहिती मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत दिली. शहरी मतदार आणि युवकांचा मतदार प्रक्रियेतील सहभाग वाढविण्यासाठी पुणे येथे हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला असल्याचे नमूद करून श्री. देशपांडे म्हणाले, मतदार यादीचा विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम आगामी काळातील निवडणुकांच्यादृष्टीने महत्वाचा आहे. यानिमित्ताने मतदार जागृतीसाठी विविध उपक्रमाचे आयोजनही करण्यात येणार आहे. मुख्य निवडणूक आयुक्त आणि निवडणूक आयुक्त यांच्या उपस्थितीत मतदार नोंदणीविषयी जनजागृती करण्यासाठी ९ नोव्हेंबर रोजी बालेवाडी येथे सकाळी ६.३० वाजता सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले असून यामध्ये विविध क्षेत्रातील मान्यवर व्यक्ती सहभागी होणार आहेत. य

महाराष्ट्राला उद्योगक्षेत्रात अग्रस्थानावर आणण्यासाठी धोरण बदलांची आवश्यकता असल्यास उद्योगांच्या सूचना घेऊ- उद्योगमंत्री उदय सामंत

इमेज
जनलोक वार्ता न्यूज नेटवर्क पुणे, दि. ७: महाराष्ट्राला उद्योगक्षेत्रात अग्रस्थानावर आणायचे असून त्यासाठी औद्योगिक धोरणांमध्ये बदल करण्याची आवश्यकता असल्यास उद्योगांच्या सूचना घेऊन धोरणबदलांसाठी निश्चित प्रयत्नशील राहू, अशी ग्वाही उद्योगमंत्री उदय सामंत यांनी दिली. राज्य शासन उद्योगांच्या खंबीरपणे पाठिशी असून उद्योगांच्या वाढीसाठी सर्व सोयी सुविधा पुरवल्या जातील असेही ते यावेळी म्हणाले. महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्रीज अँड ॲग्रीकल्चरच्या (एमसीसीआयए) विद्यमाने पिंपरी चिंचवड येथील ऑटो क्लस्टर मध्ये आयोजित ‘पुणे मनुफॅक्चरींग एक्स्पो २०२२- पुणे डीफटेक' प्रदर्शनाला श्री. उद्योगमंत्री उदय सामंत यांनी भेट दिली. त्यानिमित्ताने आयोजित कार्यक्रमात श्री. सामंत बोलत होते. यावेळी  आमदार महेश लांडगे एमसीसीआयएचे अध्यक्ष दीपक करंदीकर, महासंचालक प्रशांत गिरबाने उपस्थित होते. पुणे ही ज्याप्रमाणे शिक्षणाची पंढरी आहे तसेच उद्योजकांची पंढरी देखील पुणेच आहे, असे सांगून श्री. सामंत म्हणाले, उद्योजकांच्या मागे ठामपणे उभे राहिले पाहिजे, त्यांच्या अडीअडचणी समजून घेतल्या पाहिजेत यासाठी आपण राज्यातील सर्व

हयातीचा दाखला सादर करण्याचे निवृत्तीवेतन धारकांना आवाहन

जनलोक वार्ता न्यूज नेटवर्क  प्रतिनिधी / इस्माईल तांबोळी पुणे, दि. ७: निवृत्तीवेतन घेत असलेल्या निवृत्तीवेतनधारकांना ३० नोव्हेंबर २०२२ पर्यंत हयातीचा दाखला सादर करण्याचे कोषागार कार्यालयातर्फे आवाहन करण्यात येत आहे. निवृत्तीवेतन धारकांना बँकेमध्ये प्रत्यक्ष हजर राहून हयातीच्या दाखल्यावर बँक व्यवस्थापकासमोर स्वाक्षरी करता येईल. राज्य शासनाच्या कोणत्याही राजपत्रित अधिकाऱ्याने सही व शिक्क्यासह साक्षांकित केलेला हयातीचा दाखला कोषागारास सादर करावा.  हयातीचा दाखला https://jeevanpramaan.gov.in या संकेतस्थळाद्वारे ऑनलाइन सादर करता येईल. जीवनप्रमाण पोर्टलवर हयातीचा दाखला ऑनलाइन सादर करण्याची कार्यपद्धती https://youtube/nNMIkTYqTF8 लिंक वर उपलब्ध आहे. यादृष्टीने बायोमेट्रिक ठसे हस्तगत करण्यासाठी भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणानी मान्यता दिलेल्या बायोमेट्रिक डिव्हाइसची माहिती https://uidai.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.  भारतीय डाक विभागाने इंडिया पोस्ट पेमेंट बँकच्या माध्यमातून डिजीटल हयातीचा दाखला ऑनलाइन सादर करण्याची सुविधा सशुल्क उपलब्ध करुन दिली आहे. सदर सेवा वापराची विनंती टपाल विभागाकडे स

महाराष्ट्रातील तीन परिचारिकांना राष्ट्रीय ‘फ्लॅोरेन्स नाइटिंगेल’ पुरस्कार प्रदान

  जनलोक वार्ता न्यूज नेटवर्क नवी दिल्ली 07 ;   आरोग्य क्षेत्राचा कणा असणा-या परिचारिकांना आज राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते राष्ट्रीय ‘फ्लॅोरेन्स नाइटिंगेल’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. महाराष्ट्रातील चार परिचारिकांना हा पुरस्कार जाहीर झाला होता.  तीन परिचारिकांनी हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. वर्ष 2021 चे राष्ट्रीय ‘फ्लॅोरेन्स नाइटिंगेल’ पुरस्कार वितरण सोहळा आज राष्ट्रपती भवनात पार पडला. यावेळी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते 50 पर‍िचारिकांना तसेच परिचारक यांना  पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. याप्रसंगी केंद्रीय राज्य आरोग्य तथा कुटुंब कल्याण मंत्री डॉ. भारती पवार या उपस्थित होत्या.  सोलापूर जिल्ह्यातील मोरूची येथ‍ील मनिषा भाऊसो जाधव, सहायक नर्सिंग मिडवाइफरी (ANM) यांना आरोग्य क्षेत्रात 16 वर्षांचा अनुभव आहे. आतापर्यंत त्यांनी केंद्र आणि राज्य शासनाच्या विविध आरोग्य विभागातील योजनांचे प्रभावीर‍ित्या अंमलबजावणी केलीली आहे. श्रीमती जाधव यांनी माता आणि बालकल्याण क्षेत्रातही उल्लेखनीय कार्य केले आहे. श्रीमती जाधव यांनी क्षयरोग्यांना हाताळण्यासाठी विशेष प्रश

चारचाकीं वाहनांसाठी नोंदणी क्रमांकाची नवीन मालिका

  जनलोक वार्ता न्यूज नेटवर्क प्रतिनिधी / राजू शिंगाडे  पुणे दि. ७: प्रादेशिक परिवहन कार्यालय, पुणे येथे लवकरच चारचाकी वाहनांसाठी नवीन मालिका सुरु करण्यात येत आहे. या मालिकेतील आकर्षक नोंदणी क्रमांक राखून ठेवण्याबाबत आगाऊ अर्ज स्वीकारण्याची व लिलाव कार्यपद्धतीची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. नव्याने सुरु होणाऱ्या चारचाकी मालिकेतील आकर्षक तसेच पसंतीचे क्रमांक विहित शुल्क भरून हवे असतील अशा चारचाकी वाहन मालकांनी १० नोव्हेंबर रोजी सकाळी १०.३० ते दुपारी ३.३०  वाजेपर्यंत विहित नमुन्यात अर्ज करावा.  अर्ज कार्यालयाच्या नवीन वाहन नोंदणी विभागात धनाकर्ष (डीडी), पत्त्याचा पुरावा, ओळखपत्र, आधारकार्ड, पॅनकार्डच्या साक्षांकित प्रतीसह आधारकार्डला लिंक असलेल्या मोबाईल क्रमांकासह जमा करावा. हा डीडी  ‘आर.टी.ओ. पुणे’यांच्या नावे राष्ट्रीयकृत, अनूसचित बँकेचा पुणे येथील असावा. अर्जदाराने ओळख पटविण्यासाठी अर्जासोबत फोटो ओळखपत्र तसेच पत्त्याच्या पुराव्यासाठी आधारकार्ड, दूरध्वनी देयक आदींची साक्षांकित प्रत सादर करणे आवश्यक आहे. एकाच क्रमांकाकरीता एकापेक्षा जास्त अर्ज असल्यास त्यांची यादी ११ नोव्हेंबर रोजी स

पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय कार्यक्षेत्रात कलम कलम १४४ लागू

  जनलोक वार्ता न्यूज नेटवर्क पुणे, दि. ७: पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय कार्यक्षेत्रात हत्यारांचे उत्पादन, विक्रीसाठी साठा व विक्रीस प्रतिबंध करण्यासह समाजविघातक व दहशतवादी कृत्यांना आळा घालण्यासाठी भ्रमणध्वनी कार्ड विक्रेते, कामगार कंत्राटदार आणि लॉज, हॉटेल, विश्रागृहाच्या मालकांवर निर्बंध घालण्यासाठी २ जानेवारी २०२३ पर्यंत भारतीय फौजदारी दंड प्रक्रिया संहिता कलम १४४ प्रमाणे प्रतिबंधात्मक आदेश पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांनी जारी केले आहेत. या आदेशानुसार नऊ इंच किंवा त्यापेक्षा जास्त लोखंडी पाते असलेले कोयता, पालघन व तत्सम लोखंडी हत्यार विक्रीसाठी बनवने, विक्रीसाठी साठा करणे किंवा विक्री करणे याला प्रतिबंध करण्यात आला आहे. तथापि, हा आदेश शेतकऱ्यांना शेतीसाठी लागणाऱ्या अवजारांसाठी लागू नाही. सिमकार्ड विक्री करताना ग्राहकांची योग्य पडताळणी व खात्री केल्याशिवाय, सिमकार्ड कार्ड विक्री नोंदवहीमध्ये नोंद घेतल्याशिवाय सिमकार्ड विक्री करता येणार नाही. नोंदवही आपल्या दुकानांमध्ये ठेवून ग्राहकाबाबतची माहिती त्यामध्ये नमूद करावी. नोंदवही अभिलेख स्वरुपात किमान ५ वर्षांकरीता जतन करावी.  कामगार कंत्

तब्बल 67 हजार विद्यार्थ्यांनी घेतला "सुचवा तुमच्या आवडीचे कौशल्य अभ्यासक्रम" स्पर्धेत सहभाग -कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांची माहिती

जनलोक वार्ता न्यूज नेटवर्क मुंबई, दि. 6 नोव्हेंबर 2022 : आयटीआयच्या अभ्यासक्रमामध्ये विद्यार्थ्यांचा सहभाग वाढविण्याच्या उद्देशाने हाती घेण्यात आलेल्या 'सुचवा तुमच्या आवडीचे कौशल्य अभ्यासक्रम' या स्पर्धेला विद्यार्थ्यांचा चांगला प्रतिसाद लाभला आहे. कालपर्यंत तब्बल ६७ हजार ९९० विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत सहभाग नोंदविला आहे, अशी माहिती राज्याचे कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी दिली. मागील काही वर्षांपासून आयटीआयच्या विविध अभ्यासक्रमांकडे विद्यार्थ्यांचा कल वाढत असून अधिकाधिक विद्यार्थी कौशल्याधारित प्रशिक्षण घेऊन रोजगार किंवा स्वयंरोजगार करीत आहेत. आता उद्योगांमधील बदलते नवनवे तंत्रज्ञान आणि त्याअनुषंगाने आयटीआयच्या अभ्यासक्रमांमध्ये आवश्यक बदल करण्यासाठी विभागाने पुढाकार घेतला असून यासाठी व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाकडून १५ नोव्हेबरपर्यत ही राज्यस्तरीय स्पर्धा जाहीर करण्यात आली आहे. याअंतर्गत वेगळ्या हटके संकल्पना सुचविणाऱ्या विद्यार्थ्यांना बक्षीस देण्यात येणार आहेत. औद्योगिक व सामाजिक क्षेत्रात वेगाने बदल होत असल्याच्या काळात विद्या

राजगुरूनगर सहकारी बँकेच्या निवडणूकीत अल्प मतदान ; केवळ ५७ टक्केच मतदान

इमेज
जनलोक वार्ता न्यूज नेटवर्क प्रतिनिधी /  पाडुरंग खुटाळ खेड दि.६ , राजगुरूनगर सहकारी बँकेच्या निवडणुकीत प्रथमच पॅनेल पडल्याने निवडणूकीमध्ये रंगत वाढली. जुने संचालक की नवीन संचालक निवडूण येणार ह्याचे मतदारा मध्ये उत्सुकता वाढली आहे  आज निवडणूक पार पडली. त्यात बँकेच्या १७ शाखापैकी १५ ठिकाणी २९ हजार २१९ सभासद मतदारांनी एकूण ६४ मतदान केंद्रावर आपला मतदानाचा हक्क बजावला.  एकूण मतदानाची टक्केवारी बघता ५७ टक्केच मतदान झाल्याची नोंद झाली आहे. बँकेच्या मतदान प्रक्रियेला अल्प प्रतिसाद मिळाल्याची चर्चा खेड तालुक्यात रंगू लागली आहे.  यात एकूण मतदानाची टक्केवारी बघता उमेदवारांच्या मनातील धाकधूक वाढली असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. या निवडणुकीत सरळ लढतीत भीमाशंकर सहकार पॅनल व राजगुरूनगर सहकार परिवर्तन पॅनलमध्ये चुरस पाहावयास मिळाली. परंतु या निवडणूकी मध्ये अल्प मतदाना मूळे कोणत्या पॅनलला व उमेदवाराला फायदा होईल असे सांगता येत नाही. यात दोन्ही पॅनलच्या उमेदवारांचे भवितव्य आज मतदान पेटीत बंद झाले आहे. एकूण मतदान केंद्रे व झालेल्या मतदानाची आकडेवारी.... शिरूर -२०९पुणे -१३३आळंदी -१७५जुन्नर - ८०पाईट - १९

राज्य सेवा (पूर्व) परीक्षा - २०२२ चा निकाल जाहीर ;मुख्य परीक्षा २१,२२ व २३ जानेवारी, २०२३ रोजी

  जनलोक वार्ता न्यूज नेटवर्क             मुंबई दि. ४ : महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत २१ ऑगस्ट, २०२२ रोजी घेण्यात आलेल्या राज्यसेवा (पूर्व) परीक्षा-२०२२ चा निकाल जाहीर करण्यात आला आहे. या पूर्व परीक्षेतून मुख्य परीक्षेकरीता अर्हताप्राप्त ठरलेल्या उमेदवारांच्या बैठक क्रमांकासह नावांची यादी व गुणांची सीमारेषा आयोगाच्या https://mpsc.gov.in या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.मुख्य परीक्षा २१, २२ व २३ जानेवारी, २०२३ रोजी घेण्यात येणार असल्याचे आयोगाचे उपसचिव (परीक्षोत्तर - राजपत्रित परीक्षा)यांनी कळविले आहे.             पूर्व परीक्षेच्या निकालाच्या आधारे ६२३ पदांसाठी १० हजार २०० उमेदवार मुख्य परीक्षेच्या प्रवेशाकरिता पात्र ठरले आहेत . पूर्व परीक्षेसाठी उमेदवारांनी ऑनलाईन पध्दतीने केलेल्या अर्जात दिलेल्या माहितीच्या आधारे, त्यांच्या पात्रता तपासण्याच्या अटीच्या अधीन राहून, पूर्व परीक्षेच्या निकालाआधारे मुख्य परीक्षेस पात्र ठरलेल्या उमेदवारांपैकी मुख्य परीक्षेसाठी विहित कालावधीत अर्ज करणाऱ्या व परीक्षा शुल्क भरणाऱ्या अर्हताप्राप्त उमेदवारांनाच मुख्य परीक्षेस प्रवेश देण्यात येणार आहे. आव

लोकसेवा आयोगाकडून सरळ सेवा भरतीकरीता १ व २ डिसेंबर २०२२ रोजी चाळणी परीक्षा

जनलोक वार्ता न्यूज नेटवर्क             मुंबई, दि.४ : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून विशिष्ट शैक्षणिक अर्हता आणि अनुभवावर आधारित सरळसेवा भरतीकरीता  विविध संवर्गासाठी  संगणक प्रणालीवर आधारित चाळणी परीक्षा १ व २ डिसेंबर २०२२ रोजी  घेण्यात आहे.             परीक्षा योजना, अभ्यासक्रम, निवड प्रक्रिया इत्यादी तपशील आयोगाच्या संकेतस्थळावर स्वतंत्रपणे प्रसिद्ध केल्याप्रमाणे राहणार आहे. संगणक प्रणालीवर आधारित परीक्षांची कार्यपद्धत, परीक्षेचे ठिकाण, दिनांक इत्यादी तपशील स्वतंत्रपणे अवगत करण्यात येणार आहे. विविध विभागातील मुख्य प्रशासकीय अधिकारी गट अ, प्रशासकीय अधिकारी गट ब व सहाय्यक प्रशासन अधिकारी गट ब संवर्ग करिता एकत्रितरीत्या चाळणी परीक्षा घेण्यात येणार आहे. एकत्रित चाळणी परीक्षा मधील गुणांच्या आधारे अर्ज केलेल्या संबंधित संवर्गाच्या निवडीसाठी गुणवत्तेच्या आधारे उमेदवारांचा विचार करण्यात येईल, तसेच एकत्रित परीक्षेमधील गुणांच्या आधारे पुढील निवड प्रक्रिया राबविण्यात येणार असल्याचे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे सहसचिव दक्षता, धोरण व संशोधन यांनी सांगितले आहे.             या परीक्षेची माहिती उदा. शासन

‘युपीएसी’ परिक्षा प्रशिक्षणासाठी अर्ज करण्याचे आवाहन ; प्रक्रिया ४ नोव्हेंबरपासून

  जनलोक वार्ता न्यूज नेटवर्क             मुंबई, दि. ४ :केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या नागरी सेवा परीक्षेच्या विनामूल्य प्रशिक्षणाची प्रवेश प्रक्रिया ४ नोव्हेंबर पासून सुरू होणार आहे. ऑनलाईन पद्धतीने प्रवेश अर्ज दि.४ नोव्हेंबर ते २५ नोव्हेंबर या कालावधीत भरता येणार असल्याची माहिती राज्य प्रशासकीय व्यवसाय शिक्षण संस्थेचे संचालक डॉ.के.एस.जैन यांनी दिली आहे.             उच्च व तंत्र शिक्षण विभागांतर्गत राज्य प्रशासकीय व्यवसाय शिक्षण संस्था (SIAC), मुंबई, भारतीय प्रशासकीय सेवा पूर्व प्रशिक्षण केंद्र, नाशिक, कोल्हापूर, औरंगाबाद, अमरावती व नागपूर, यशवंतराव चव्हाण विकास प्रशासन प्रबोधिनी (VASHADA) संचलित डॉ. आंबेडकर स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र (एसीईसी), पुणे आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिका (PCMC) संचलित सावित्रीबाई फुले ॲकॅडमी, पुणे मार्फत केंद्रीय लोकसेवा आयोगाची नागरी सेवा पूर्व परीक्षा २०२३ साठी पूर्ण वेळ विनामूल्य प्रशिक्षण देण्याकरिता सामायिक प्रवेश परीक्षेचे आयोजन करण्यात आले असून इच्छुक पात्र उमेदवाराकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात येत आहेत.              ऑन लाईन पद्धतीने प्रवेश अर्

जिल्ह्यात ३ ते १९ नोव्हेंबर दरम्यान विशेष स्वच्छता मोहिमेचे आयोजन

जनलोक वार्ता न्यूज नेटवर्क पुणे, दि.४: जागतिक शौचालय दिनाचे औचित्य साधून स्वच्छ भारत अभियान (ग्रामीण) टप्पा-२ अंतर्गत येणाऱ्या जिल्ह्यातील सर्व गावात हागणदारीमुक्त सातत्य ठेवण्यासाठी तसेच संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान २०२२-२३ अंतर्गत विहित कालमर्यादेत कार्यवाही करण्यासाठी ३ ते १९ नोव्हेंबर या कालावधीत विशेष मोहिम राबविण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी दिली आहे. स्वच्छ भारत अभियान (ग्रामीण) टप्पा-२ अंतर्गत गावस्तरावर स्वच्छतेच्या विविध उद्दिष्ट पूर्तीकरीता सूक्ष्म नियोजन करुन कामे पूर्ण करण्यासाठी मोहिमेचे आयोजन करण्यात येणार आहे. या कालावधीत जिल्ह्यातील स्वच्छतेच्या कामास गती देऊन स्वच्छतेचा जागर करण्यात येणार आहे. तसेच यापूर्वी मंजूर केलेले वैयक्तिक, सार्वजनिक शौचालय संकुलाचे बांधकाम, घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प, गोबरधन प्रकल्प, प्लॅस्टिक कचरा व्यवस्थापन प्रकल्प, शोषखड्डे बांधकाम, नादुरुस्त शौचालय दुरूस्ती करणे आदी प्रकारे सुरु असलेली सर्वप्रकारची कामे पूर्ण करण्यात येणार आहे.  या विशेष स्वच्छता मोहीम कालावधीत ग्रामस्थांचा सक्र

आणिबाणीच्या कालावधीत बंदीवास सोसावा लागलेल्या व्यक्तिंना मानधन ;पुणे जिल्ह्यात ५१५ लाभार्थ्यांना २७ महिन्यांच्या मानधनाचे १२ कोटी १७ लाख रुपये वितरीत करण्यात येणार

  जनलोक वार्ता न्यूज नेटवर्क पुणे, दि. ४: देशामध्ये १९७५ ते १९७७ या कालावधीत घोषित आणिबाणी कालावधीत बंदीवास सोसावा लागलेल्या व्यक्तिंना गौरवार्थ मानधन देण्याबाबतची योजना पुन्हा सुरू करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतल्यानुसार ऑगस्ट २०२० ते ऑक्टोबर २०२२ असे २७ महिन्यांच्या मानधनाची एकूण १२ कोटी १७ लाख २ हजार ५०० रुपये रक्कम पात्र ५१५ लाभार्थ्यांना वितरीत करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी दिली. याव्यतिरिक्त या योजनेत नव्याने २३ पात्र लाभार्थ्यांचा समावेश करण्यात आल्याने एकूण लाभार्थीसंख्या ५३८ झाली आहे. देशामध्ये २५ जून १९७५ ते ३१ मार्च १९७७ या कालावधीत आणिबाणी घोषित करण्यात आली होती. या कालावधीत मिसा अंतर्गत तसेच डी. आय. आर. (आणिबाणी) राजनैतीक अथवा सामाजिक कारणासाठी बंदीवास सोसावा लागलेल्या व्यक्तींचा सन्मान व यथोचित गौरव करण्याबाबत धोरण राज्य शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाकडील ३ जुलै २०१८ रोजीच्या शासन निर्णयान्वये जाहीर करण्यात आलेले आहे.  या धोरणानुसार एक महिन्यापेक्षा जास्त कारावास भोगलेल्या व्यक्तींना दरमहा १० हजार रुपये व त्यांच्या पश

वेदांत वाचस्पती पूज्यश्री जगन्नाथ महाराज पवार यांचे कार्य समाजाला दिशा देणारे-- उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

  जनलोक वार्ता न्यूज नेटवर्क   पंढरपूर, दि. ४, : वारकरी संप्रदायाने समाजामध्ये संस्कार रुजविले असून काव्यतीर्थ आचार्य वेदांत वाचस्पती पूज्यश्री जगन्नाथ महाराज पवार (अण्णासाहेब) यांचे कार्य समाजाला दिशा देणारे आहे, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे केले. काव्यतीर्थ आचार्य वेदांत वाचस्पती पूज्यश्री जगन्नाथ महाराज पवार (अण्णासाहेब) यांच्या मूर्ती अनावरणानंतर आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. महसूल मंत्री तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, रोजगार हमी योजना मंत्री संदिपान भुमरे, कृषि मंत्री अब्दुल सत्तार, खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, आमदार बबनराव पाचपुते, आमदार बालाजी किणीकर, मारुती महाराज कु-हेकर, देवगिरी चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष आप्पासाहेब  गावंडे, सचिव कमलाकर पेरे, पदाधिकारी उपस्थित होते. भक्ती हा ईश्वरापर्यंत पोहोचण्याचा सरळ आणि सोपा मार्ग संतांनी दाखविला. त्या संत परंपरेचे जगन्नाथ महाराज प्रतीक होते आणि नव्या पिढीला त्यांनी आपला वारसा सोपवला, त्या अर्थानेही त्यांचे कार्य महाराष्ट्राच्या अध्यात्मिक उन्नतीला बळ देणारेच आहे, असे स्पष्ट करून उपमुख्यमंत्री श्री.

नियोजन विभागाचे संपूर्ण कामकाज यावर्षीपासून संगणकीय प्रणालीद्वारे ; योजनांच्या अंमलबजावणीत ‘आयपास’ प्रणालीचा प्रभावी वापर करा-जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख

इमेज
जनलोक वार्ता न्यूज नेटवर्क प्रतिनिधी / राजू शिंगाडे पुणे, दि. 4: नियोजन विभागाचे कामकाज या आर्थिक वर्षापासून संपूर्णत: संगणकीकृत प्रणालीद्वारे करायचे असून सर्व शासकीय विभागांनी जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून राबवण्यात येणाऱ्या कामांवरील संनियंत्रणासाठी ‘इंटिग्रेटेड प्लॅनिंग ऑफीस ऑटोमेशन सिस्टीम’ (iPAS –‘आयपास’) प्रणालीचा प्रभावी वापर करावा, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी दिले. जिल्हाधिकारी कार्यालय येथे नियोजन विभागाद्वारे आयोजित ‘आयपास’ प्रणाली प्रशिक्षण कार्यशाळेत जिल्हाधिकारी डॉ. देशमुख बोलत होते. यावेळी यावेळी जिल्हा नियोजन अधिकारी संजय मरकळे, सहायक जिल्हा नियोजन अधिकारी डॉ. अपर्णा गुरव तसेच सर्व शासकीय कार्यान्वयीन यंत्रणांचे अधिकारी- कर्मचारी उपस्थित होते.  डॉ. देशमुख म्हणाले, १८ सप्टेंबर २०१९ च्या शासन निर्णयानुसार ‘आयपास’ प्रणालीचा उपयोग करणे आवश्यक आहे. याबाबत प्रशिक्षण होऊनही गेल्या दोन वर्षात कोव्हिड-१९ च्या प्रादुर्भावामुळे आणि तांत्रिक अडचणीमुळे प्रणालीचा वापर नियमित कामकाजात करणे सर्वच शासकीय कार्यालयांना शक्य झाले नाही. परंतु सन २०२२-२३ या आर्थिक वर्षाप

महानंद डेअरीला उर्जितावस्थेत आणण्यासाठी शासनाचे संपूर्ण सहकार्य- दुग्धव्यवसाय विकास मंत्री राधाकृष्ण विखेपाटील

इमेज
जनलोक वार्ता न्यूज नेटवर्क पुणे, दि. 3: महानंद डेअरीला पुन्हा उर्जितावस्था आणण्यासाठी शासनाकडून आवश्यक ते सहकार्य केले जाईल. त्यासाठी डेअरीनेही बाजाराच्या स्पर्धेत टिकण्यासाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात, असे निर्देश महसूल, पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय विकास मंत्री राधाकृष्ण विखे- पाटील यांनी दिले. महाराष्ट्र राज्य दूध महासंघाच्या (महानंद) समस्यांच्या अनुषंगाने विधानभवन येथे आयोजित बैठकीत मंत्री श्री. विखे- पाटील बोलत होते. बैठकीस आमदार हरिभाऊ बागडे, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास, मत्स्यव्यवसाय विभागाचे प्रधान सचिव जे.पी. गुप्ता, दुग्धव्यवसाय आयुक्त तसेच महानंदचे व्यवस्थापकीय संचालक श्रीकांत शिपूरकर यांच्यासह जिल्हा व तालुका दूध संघांचे प्रतिनिधी उपस्थित होते. महानंद डेअरी ही नामांकित नाममुद्रा आहे असे सांगून श्री. विखे-पाटील म्हणाले, जिल्हा, तालुका संघांची ही मातृसंस्था सध्या मोठ्या आर्थिक अडचणीत आहे. उत्पन्नाच्या तुलनेत खर्च मोठा आहे. त्यामुळे महानंदने खर्चात कपात करण्यासाठी उपाययोजना केल्या पाहिजेत. ही संस्था टिकली पाहिजे अशी शासनाची भूमिका आहे. त्यादृष्टीने काही कालावधीसाठी ही संस्था व

कुक्कुटपालकांच्या समस्यांवर उपायोजनांसाठी राज्यस्तरीय समन्वय समिती स्थापन करणार- पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय विकास मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील

जनलोक वार्ता न्यूज नेटवर्क पुणे, दि. 3: कुक्कुटपालन व्यवसायातील शेतकऱ्यांच्या समस्या सोडवण्यास शासनाचे प्राधान्य असून त्यासाठी कुक्कुटपालक शेतकऱ्यांचे प्रतिनिधी, कंपन्यांचे प्रतिनिधी तसेच शासनाचे प्रतिनिधी असलेली राज्यस्तरीय समन्वय समिती स्थापन करण्यात येईल, असे राज्याचे महसूल, पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय विकास मंत्री राधाकृष्ण विखे- पाटील यांनी जाहीर केले. कुक्कुटपालन व्यवसायातील शेतकऱ्यांच्या समस्यांच्या अनुषंगाने मंत्री श्री. विखे- पाटील यांच्या अध्यक्षतेखाली विधान भवन येथे बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी ते बोलत होते. बैठकीस आमदार महेश लांडगे, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास, मत्स्यव्यवसाय विभागाचे प्रधान सचिव जे.पी. गुप्ता, पशुसंवर्धन आयुक्त सचिंद्र प्रताप सिंह, अतिरिक्त आयुक्त डी. डी. परकाळे यांच्यासह कुक्कुट व अंडी व्यवसाय क्षेत्रातील कंपन्यांचे प्रतिनिधी, राज्यभरातील कुक्कुटपालकांच्या संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते. कुक्कुटपालन (पोल्ट्री व्यवसायिक) करणाऱ्या शेतकऱ्यांचे आर्थिक शोषण होऊ नये यासाठी शासनाकडून आवश्यक त्या सर्व उपाययोजना केल्या जातील असे सांगून श्री. विखे-पाटील

बैलगाडा शर्यतींबाबत लम्पी चर्मरोगाच्या स्थानिक परिस्थितीचा आढावा घेऊन निर्णय- पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय विकास मंत्री राधाकृष्ण विखे- पाटील

इमेज
जनलोक वार्ता न्यूज नेटवर्क पुणे, दि. 3: लम्पी चर्मरोगाची संबंधित जिल्ह्यातील स्थितीचा आढावा घेऊन जिल्हास्तरीय अधिकाऱ्यांनी स्थानिक स्तरावर बैलगाडा शर्यतींच्या आयोजनात शिथिलता देण्याबाबत निर्णय घेण्याचे निर्देश पशुसंवर्धन मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी दिले. मंत्री श्री. विखे- पाटील यांच्या अध्यक्षतेखाली बैलगाडा शर्यतींच्या अनुषंगाने बैलगाडा मालक संघटनेच्या शिष्टमंडळासोबत विधानभवन येथे आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी श्री. विखे- पाटील बोलत होते. बैठकीस आमदार महेश लांडगे, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास, मत्स्यव्यवसाय विभागाचे प्रधान सचिव जे.पी. गुप्ता, पशुसंवर्धन आयुक्त सचिंद्र प्रताप सिंह तसेच बैलगाडा मालक संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते. बैलगाडा शर्यती सुरू रहाव्यात ही शासनाची भूमिका असून त्यासाठी शासन खंबीरपणे आपली भूमिका बजावेल. बैलगाडा शर्यतीबाबत सर्वोच्च न्यायालयातील अंतिम सुनावणीसाठी बाजू मांडण्यासाठी नेमण्यात आलेल्या वरिष्ठ विधिज्ञांना आवश्यक ते सर्व सहकार्य शासनाच्यावतीने देण्यात येईल, असेही श्री. विखे पाटील यांनी यावेळी सांगितले. यावेळी आमदार लांडगे तसेच बैलगाडा मालक संघट

नवनियुक्त अधिकारी - कर्मचाऱ्यांनी पारदर्शक आणि लोकाभिमुख काम करावे- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

इमेज
जनलोक वार्ता न्यूज नेटवर्क प्रतिनिधी / दयानंद गौडगांव मुंबई, दि. 3 :- रोजगार मेळाव्याच्या माध्यमातून नियुक्तीपत्र मिळालेल्या राज्यातील सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांनी पारदर्शक आणि लोकाभिमुखपणे काम करावे, असे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त जाहीर केल्यानुसार येत्या वर्षभरात राज्यात 75 हजार नोकऱ्या उपलब्ध करून देणार असल्याचे त्यांनी सांगितले. राज्यस्तरीय रोजगार मेळाव्याअंतर्गत कोकण विभागातील पात्र उमेदवारांना नियुक्तीपत्र प्रदान करण्याचा कार्यक्रम मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत झाला. येथील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमध्ये आज या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर, कौशल्य विकास मंत्री तथा मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा, सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा पालघर आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण, राज्य उत्पादन शुल्क मंत्री तथा ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई, उद्योग मंत्री तथा रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्याचे पाल

महाराष्ट्राच्या प्रगतीची पताका सर्वदूर फडकू दे – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ; कार्तिक एकादशीनिमित्त विठूमाऊली चरणी मुख्यमंत्र्यांचे साकडे

जनलोक वार्ता न्यूज नेटवर्क मुंबई, दि. ३ :-  ‘देशाचा मानबिंदू असणाऱ्या आपल्या महाराष्ट्राच्या प्रगतीची पताका अशीच सर्वदूर फडकू दे. अन्नदाता शेतकरीराजा, कष्टकरी, मेहनती उद्यमी बांधवांच्या आयुष्यात सुख, समृद्धी आणि भरभराट नांदो, असे साकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विठ्ठलचरणी घातले आहे. कार्तिकी एकादशी निमित्ताने मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी श्री विठ्ठल-रुक्मिणी चरणी ही प्रार्थना अर्पण केली आहे. तसेच राज्यातील जनतेला कार्तिक एकादशीच्या पुर्वसंध्येला शुभेच्छाही दिल्या आहेत. मुख्यमंत्री या संदेशात म्हणतात, स्वातंत्र्य चळवळ ते आधुनिक भारताच्या उभारणीत महाराष्ट्राने आपल्या कामगिरीने प्रगतीची पताका सदैव फडकत ठेवली आहे. या सगळ्याचे श्रेय आपला अन्नदाता शेतकरीराजा, कष्टकरी, कामगार आणि उद्यमशीलता जोपासणाऱ्या मेहनती अशा सर्वांनाच जाते. या सर्वांच्या आयुष्यात सदैव सुख, समृद्धी आणि भरभराट नांदो आणि राज्यावर येणाऱ्या आव्हानांचा मुकाबला करण्याचे बळ मिळावे हीच विठ्ठल-रुक्मिणी चरणी प्रार्थना. कार्तिक एकादशीपासून विठ्ठल-रुक्मिणीचा चैतन्यदायी असा भक्ती सोहळा सुरु होतो. या मंगल पर्वाच्या प्रारंभानिमित्त

जिल्ह्यातील ३०३ कोटींच्या विकासकामांना पालकमंत्र्यांची मंजुरी

इमेज
जनलोक वार्ता न्यूज नेटवर्क प्रतिनिधी / इस्माईल तांबोळी पुणे दि.३-राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्या उपस्थितीत जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत ३०३ कोटींच्या विकासकामांना मंजुरी देण्यात आली. बैठकीस जिल्हाधिकारी तथा जिल्हा नियोजन समितीचे सदस्य सचिव डॉ.राजेश देशमुख, जिल्हा नियोजन अधिकारी संजय मरकळे उपस्थित होते. शासनाने जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत  कामांना यापूर्वी स्थगिती दिली होती.  प्रत्येक कामांची पालकमंत्र्यांनी तपासणी करून मंजुरी देण्याबाबत निर्णय घेण्यात आला होता. त्यानुसार पालकमंत्री पाटील यांनी वार्षिक आराखड्यात समाविष्ट प्रत्येक कामांची माहिती घेतली. जिल्ह्याच्या विकासाच्यादृष्टीने आवश्यक असलेल्या ३०३ कोटींच्या कामांना यावेळी मंजुरी देण्यात आली. सर्व विकासकामे नियोनबद्ध पद्धतीने वेळेत पूर्ण करण्यात यावेत आणि कामांचा दर्जा चांगला राहील याकडेही विशेष लक्ष द्यावे, अशा सूचना पालकमंत्र्यांनी यावेळी दिल्या.

रिक्त पदांच्या भरतीसोबत उद्योग क्षेत्रातही मोठ्या प्रमाणात रोजगाराच्या संधी निर्माण करण्याचा प्रयत्न-पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील

इमेज
जनलोक वार्ता न्यूज नेटवर्क प्रतिनिधी / राजू शिंगाडे पुणे, दि.३ : राज्यात शासकीय स्तरावर ७५ हजार उमेदवारांना रोजगार उपलब्ध करून देण्यासोबत उद्योग क्षेत्रातही मोठ्या प्रमाणात रोजगाराच्या संधी निर्माण व्हाव्यात यासाठी युवकांना कौशल्य विकासाचे प्रशिक्षण आणि छोट्या उद्योगांना प्रोत्साहन देण्यात येत आहे, असे प्रतिपादन राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले. जिल्हाधिकारी कार्यालय येथे आयोजित विभागीय रोजगार मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी विभागीय आयुक्त सौरभ राव, जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख, महावितरणचे प्रादेशिक संचालक अंकुश नाळे, पुणे परिमंडळाचे मुख्य अभियंता सचिन तालेवार, बारामती परिमंडळाचे मुख्य अभियंता सुनिल पावडे, कोल्हापूरचे परेश भागवत आदी उपस्थित होते. पालकमंत्री म्हणाले, राज्यातील युवकांना रोजगार देण्यासाठी रिक्त पदे भरण्यासोबत आवश्यक नवी पदे निर्माण करण्याच्या सूचना विविध विभागांना देण्यात आल्या आहेत. त्याचाच एक भाग म्हणून राज्यात एकाचवेळी ६ ठिकाणी अशा स्वरूपाच्या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. राज्यातील २ हजार ३३ उमेदवारांना आज निय

खराब झालेली विद्युत डीपी दुरुस्ती करण्यासाठी, नवीन डीपी मिळविण्यासाठी शेतकरी व कार्यकर्त्यांना महावितरण कार्यालयात माराव्या लागतात चकरा

इमेज
जनलोक वार्ता न्यूज नेटवर्क प्रतिनिधी / उत्तम खेसे                                                            खेड दावडी : भर कांदा सीझन लागवड खरीप हंगामात इलेक्ट्रिक पंपवर चालणारी विद्युत डीपी नेहमीच खराब होत असते. कधी कधी डीपी बॉक्स मध्येच जाळ तयार होतो. इलेक्ट्रिक लिंक वायर नेहमीच निसटलेले असतात . दुरुस्तीसाठी महावितरण कर्मचारी वायरमेनला बोलावल्यावर ते लवकर येत नाही. उडवा उडवी ची उत्तरे कर्मचाऱ्यांकडून दिली जातात. या भागातील सामान्य शेतकरी हैराण व निराश झालेली आहेत.   डीपी शॉर्टसर्किटमुळे राहुल होरे या शेतकऱ्याचा तीन लाखाचा ऊस जळाला होता. असे त्यांनी सांगितले. त्यामुळे नवीन डीपी ची मागणी करताना शेतकरी दावडी गावचे उपसरपंच अनिल नेटके यांनी नवीन डीपी  बसवावी म्हणून आदर्श दावडी ग्रामपंचायतींमध्ये वेळोवेळी कागदपत्राची माहिती  महावितरण कार्यालय हेड ऑफिस ला कळवली आहे. महावितरण कार्यालयात अर्ज देताना माजी सरपंच संभाजी घारे, माजी उपसरपंच हिरामण खेसे, पोलीस पाटील आत्माराम डुंबरे इ.  उपस्थित होते.

क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जिल्हास्तरीय गुणवंत /आदर्श शिक्षक पुरस्कार 2022 साठी मागवले अर्ज

जनलोक वार्ता न्यूज नेटवर्क    प्रतिनिधी / विजय कानवडे खेड दि.३,    क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले संस्था, चिंचवड, ही 1992 पासून पिंपरी चिंचवड शहरा मधील मराठी तसेच सेमी इंग्रजी माध्यम आणि इंग्रजी माध्यमाची दर्जेदार शिक्षण देणारी संस्था म्हणून नावाजलेली संस्था आहे. सध्या या संस्थेच्या एकूण सहा शाखा पिंपरी चिंचवड शहरात कार्यरत आहेत. या संस्थेचे संस्थापक कार्यवाह, अॅड. दिलीप निंबारकर सर तसेच संस्थेच्या अध्यक्षा सौ. श्रद्धाताई प्रथमेश बिरदवडे आणि प्राथमिक विद्यालयाच्या मुख्याध्यापिका जयश्री निंबारकर मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली सदर रौप्य महोत्सवी वर्षातील कार्यक्रम आयोजित केले जात आहेत.     सन 1992 मध्ये मोहननगर, चिंचवड या ठिकाणी स्थापन झालेल्या शैक्षणिक, सामाजिक, क्रीडा, कला अशा विविध क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या *क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले संस्था* यांच्या वतीने शैक्षणिक वर्ष 1996-97 मध्ये प्राथमिक विद्यालयाची स्थापना झाली, त्यास शासन मान्यता मिळून मान्यता पत्र 1997 मध्ये संस्थेस प्राप्त झाले. या घटनेस सन 2022 मध्ये 25 वर्ष पूर्ण होत असल्याने *प्राथमिक विद्यालयाच्या रौप्य महोत्सवी* वर्षा

कृषि क्षेत्रातील जागतिक स्पर्धेत अग्रेसर होण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाच्या वापराची गरज-केंद्रीय कृषि मंत्री नरेंद्र सिंह तोमर

इमेज
जनलोक वार्ता न्यूज नेटवर्क प्रतिनिधी / उत्तम खेसे पुणे दि.१:कृषि क्षेत्रात काळानुरूप बदल करून शेतकऱ्याला संपन्न करण्याची गरज आहे. आधुनिक तंत्रज्ञानाच्या आधारे कृषि क्षेत्रातील जागतिक स्पर्धेत पुढे जाण्यासाठी मुल्यसाखळी वृद्धीच्या माध्यमातून प्रयत्न करावे लागतील, असे प्रतिपादन केंद्रीय कृषि मंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी केले. वैकुंठभाई मेहता राष्ट्रीय सहकारी व्यवस्थापन संस्थेत‘फलोत्पादन पिकांमधील मूल्यसाखळी वृद्धी-क्षमता व संधी’ या विषयावर आयोजित राष्ट्रीय परिषदेच्या उद्घाटन कार्यक्रमात ते बोलत होते. बैठकीस राज्याचे कृषि मंत्री अब्दुल सत्तार, फलोत्पादन मंत्री संदिपान भुमरे, केंद्रीय कृषि आणि शेतकरी कल्याण विभागाचे सचिव मनोज आहुजा, अतिरिक्त सचिव डॉ.अभिलक्ष लिखी, राज्याच्या कृषि विभागाचे प्रधान सचिव एकनाथ डवले, केंद्रीय सहसचिव प्रिय रंजन, केंद्रीय फलोत्पादन आयुक्त प्रभात कुमार, राज्याचे  कृषि आयुक्त धीरज कुमार आदी उपस्थित होते. श्री.तोमर म्हणाले, ॲग्री स्टार्टअप, कृषि विमा, बाजारपेठेची उपलब्धता आदीद्वारे शेतकऱ्यांना संपन्न करण्याचे प्रयत्न होत आहेत. सुशिक्षित युवकांनी नव्या तंत्राचा वापर