खराब झालेली विद्युत डीपी दुरुस्ती करण्यासाठी, नवीन डीपी मिळविण्यासाठी शेतकरी व कार्यकर्त्यांना महावितरण कार्यालयात माराव्या लागतात चकरा
जनलोक वार्ता न्यूज नेटवर्क
प्रतिनिधी / उत्तम खेसे
खेड दावडी : भर कांदा सीझन लागवड खरीप हंगामात इलेक्ट्रिक पंपवर चालणारी विद्युत डीपी नेहमीच खराब होत असते. कधी कधी डीपी बॉक्स मध्येच जाळ तयार होतो. इलेक्ट्रिक लिंक वायर नेहमीच निसटलेले असतात . दुरुस्तीसाठी महावितरण कर्मचारी वायरमेनला बोलावल्यावर ते लवकर येत नाही. उडवा उडवी ची उत्तरे कर्मचाऱ्यांकडून दिली जातात. या भागातील सामान्य शेतकरी हैराण व निराश झालेली आहेत.
डीपी शॉर्टसर्किटमुळे राहुल होरे या शेतकऱ्याचा तीन लाखाचा ऊस जळाला होता. असे त्यांनी सांगितले. त्यामुळे नवीन डीपी ची मागणी करताना शेतकरी दावडी गावचे उपसरपंच अनिल नेटके यांनी नवीन डीपी बसवावी म्हणून आदर्श दावडी ग्रामपंचायतींमध्ये वेळोवेळी कागदपत्राची माहिती महावितरण कार्यालय हेड ऑफिस ला कळवली आहे. महावितरण कार्यालयात अर्ज देताना माजी सरपंच संभाजी घारे, माजी उपसरपंच हिरामण खेसे, पोलीस पाटील आत्माराम डुंबरे इ. उपस्थित होते.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा