क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जिल्हास्तरीय गुणवंत /आदर्श शिक्षक पुरस्कार 2022 साठी मागवले अर्ज
जनलोक वार्ता न्यूज नेटवर्क
प्रतिनिधी / विजय कानवडे
खेड दि.३, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले संस्था, चिंचवड, ही 1992 पासून पिंपरी चिंचवड शहरा मधील मराठी तसेच सेमी इंग्रजी माध्यम आणि इंग्रजी माध्यमाची दर्जेदार शिक्षण देणारी संस्था म्हणून नावाजलेली संस्था आहे. सध्या या संस्थेच्या एकूण सहा शाखा पिंपरी चिंचवड शहरात कार्यरत आहेत. या संस्थेचे संस्थापक कार्यवाह, अॅड. दिलीप निंबारकर सर तसेच संस्थेच्या अध्यक्षा सौ. श्रद्धाताई प्रथमेश बिरदवडे आणि प्राथमिक विद्यालयाच्या मुख्याध्यापिका जयश्री निंबारकर मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली सदर रौप्य महोत्सवी वर्षातील कार्यक्रम आयोजित केले जात आहेत.
सन 1992 मध्ये मोहननगर, चिंचवड या ठिकाणी स्थापन झालेल्या शैक्षणिक, सामाजिक, क्रीडा, कला अशा विविध क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या *क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले संस्था* यांच्या वतीने शैक्षणिक वर्ष 1996-97 मध्ये प्राथमिक विद्यालयाची स्थापना झाली, त्यास शासन मान्यता मिळून मान्यता पत्र 1997 मध्ये संस्थेस प्राप्त झाले. या घटनेस सन 2022 मध्ये 25 वर्ष पूर्ण होत असल्याने *प्राथमिक विद्यालयाच्या रौप्य महोत्सवी* वर्षानिमित्त, "क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जिल्हास्तरीय गुणवंत/आदर्श शिक्षक पुरस्कार 2022" देण्यात येणार आहेत.
सदर पुरस्कार हे पिंपरी चिंचवड शहरातील विविध माध्यमांच्या व विविध विभागांच्या शाळांमध्ये सध्या कार्यरत असणारे व शैक्षणिक क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कामगिरी बजावणारे तसेच पिंपरी चिंचवड महानगरपालिका शहराचे नाव शैक्षणिक क्षेत्रामध्ये उंचवण्यामध्ये ज्यांचा मोलाचा वाटा आहे, अशा शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, मुख्याध्यापक/ प्राचार्य या व्यक्तींसाठी दिले जाणार आहेत.
सदर पुरस्कार वितरण समारंभ *प्रा.रामकृष्ण मोरे सभागृह, चिंचवड* या ठिकाणी *दिनांक 19 डिसेंबर 2022* रोजी शैक्षणिक, सामाजिक व राजकीय क्षेत्रातील सन्माननीय व्यक्तींच्या हस्ते होणार आहे.
त्यासाठी अशा उल्लेखनीय कार्य करणाऱ्या शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, मुख्याध्यापक/ प्राचार्य यांचे कडून विहित नमुन्यातील पात्रता अर्ज तसेच अर्जासोबत वैयक्तिक माहिती मागविण्यात येत आहे. सदरचे अर्ज व माहिती ही 7447370388, 9146181651 किंवा 7774000897 या व्हाट्सअप क्रमांकावर आपण पाठवायची आहे. अथवा संस्थेच्या वरील पत्त्यावर पाठवायची आहे. माहिती पाठवण्याचा अंतिम दिनांक 15 नोव्हेंबर 2022 असा राहील. अधिक माहितीसाठी वरील मोबाईल क्रमांक वर संपर्क साधावा.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा