पोस्ट्स

मार्च, २०२४ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

शेतकऱ्यांचे १ लाख ६० हजार पर्यंतच्या कर्जावरील मुद्रांक शुल्क माफ – मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा

जनलोक वार्ता न्यूज नेटवर्क  मुंबई, दि. १५ : - शेतकऱ्यांच्या एक लाख ६० हजार रुपयांपर्यंतच्या कर्जासाठीचे मुद्रांक शुल्क माफ करण्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे केली. बीड जिल्ह्यातील किसान क्रेडिट कार्डच्या डिजिटल प्रकल्प – ‘जनसमर्थ’ चा शुभारंभ दूकश्राव्य प्रणालीच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झाला, त्यावेळी ते बोलत होते.  'सरकार शेतकऱ्यांच्या पाठिशी उभे राहणारे आहे. डिजिटल क्रांतीचा वापर शेतकऱ्यांसाठी करण्याचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या या डिजिटल प्रकल्पामुळे शेतकऱ्यांच्या जीवनात क्रांती येणार आहे, असेही मुख्यमंत्री शिंदे यावेळी म्हणाले. कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांच्या हस्ते बीड जिल्ह्यातील २२ शेतकऱ्यांच्या खात्यात किसान क्रेडीट कार्डच्या माध्यमातून थेट रक्कम एका क्लिकद्वारे जमा करण्यात आली. या कार्यक्रमास कृषिमंत्री धनंजय मुंडे, उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई, क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे, आमदार बालाजी कल्याणकर, आमदार राजेश पवार, आमदार संजय रायमुलकर, कृषि विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव अनूप कुमार, कृषि आय़ुक्त डॉ. प्रवीण गेडाम, विभागीय आयुक्

लोकसभेसाठी भाजपाकडून महाराष्ट्रातील २० उमेदवारांची दुसरी यादी जाहीर ; नितीन गडकरी, पंकजा मुंडेंचाही समावेश

जनलोक वार्ता न्यूज नेटवर्क   महाराष्ट्र भाजपा उमेदवारांची यादी हिना गावित – नंदुरबार सुभाष भामरे – धुळे स्मिता वाघ – जळगाव रक्षा खडसे – रावेर अनुप धोत्रे – अकोला रामदास तडस – वर्धा नितीन गडकरी – नागपूर सुधीर मुनगंटीवार – चंद्रपूर प्रतापराव चिखलीकर – नांदेड रावसाहेब दानवे – जालना भारती पवाण – दिंडोरी कपिल पाटील – भिवंडी पियूष गोयल – उत्तर मुंबई मिहिर कोटेचा – मुंबई उत्तर पूर्व मुरलीधर मोहोळ – पुणे सुजय विखे पाटील – अहमदनगर पंकजा मुंडे – बीड सुधाकर श्रृंगारे – लातूर रणजीत सिंह नाईक निंबाळकर – माढा संजयकाका पाटील – सांगली

रवींद्र वायकर यांचा शिवसेना शिंदे गटात प्रवेश ; उध्दव ठाकरेंना मोठा धक्का

इमेज
जनलोक वार्ता न्यूज नेटवर्क  मुंबई, दि.१०, शिवसेना ठाकरे गटाचे बडे नेते आणि ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांचे निकटवर्तीय अशी ख्याती असलेले आमदार रवींद्र वायकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ‘वर्षा’ या शासकीय निवासस्थानी रवींद्र वायकर यांचा पक्षप्रवेशाचा जंगी कार्यक्रम पार पडला. रवींद्र वायकर यांच्यावर गेल्या अनेक दिवसांपासून ईडीच्या चौकशीचा ससेमिरा लागला होता. कथित जोगेश्वरी भूखंड घोटाळा प्रकरणी ते अडचणीत आले होते. रवींद्र वायकर यांनी ईडी चौकशीवरुन शिंदे गट आणि भाजपवर प्रचंड टीकाही केली होती. पण आज अखेर वायकर यांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे. वायकर यांनी आपल्या शेकडो कार्यकर्ते, पदाधिकारी, माजी नगरसेवक यांच्यासोबत आज शिंदे गटाच प्रवेश केला. रवींद्र वायकर यांच्या पक्षप्रवेशावेळी खासदार गजानन कीर्तिकर, एकनाथ शिंदे मंचावर होते.रवींद्र वायकर आगे बडो हम तुमारे साथ हैं अशी घोषणाबाजी शिवसैनिकांनी केली.

अक्कलकोट ते जेऊर मार्गे बरूर रस्त्यास 270 कोटी रुपये मंजूर ; आमदार कल्याणशेट्टींच्या मागणीला यश

इमेज
अक्कलकोट (दि. १०), अक्कलकोट, जेऊर ,तडवळ, कोर्सेगाव मार्गे बरूर ते विजापूर रोड जोडणारा या अतिशय महत्त्वाच्या असलेल्या दोन राज्यांना जोडणाऱ्या 45 किलोमीटर लांबीच्या रस्त्यास 270 कोटी रुपये मंजूर होऊन निविदा प्रसिद्ध झाली आहे. उपमुख्यमंत्री  देवेंद्र फडणवीस यांच्याकडे तालुक्याचे विद्यमान आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी आग्रही मागणी करून देगावं एक्सप्रेस कॅनॉलच्या 400 कोटींच्या कामाच्या मंजुरीनंतर आता पुन्हा तब्बल 270 कोटी रुपयांचे हे काम मार्गी लागले आहे. सदर रस्ता पूर्णत्वास गेल्यानंतर शेतकरी बांधवाना दुग्ध व शेती उत्पादने तसेच कृषिपूरक उत्पादने बाजारपेठेत पाठविणे करीता दळणवळण सुविधा म्हणून मराठवाड्यातील नांदेड, लातूर तसेच तेलंगणाच्या हैद्राबाद तसेच बिदर,कलबुर्गी या कर्नाटकाच्या भागाला जवळच्या अंतराने जोडणारा अक्कलकोट व दक्षिण सोलापूर या दोन तालुक्यांच्या मध्यमातून जोडणारा महत्वाचा ठरणार आहे.  शिवाय अक्कलकोट मतदारसंघातील नागरिकांची 30 वर्ष्यापासूनची असलेली इच्छा पूर्ण करण्यात हातभार लागला तसेच तुम्हाला दिलेल्या शब्दाला जागता आला याचे वेगळेच समाधान आहे.अक्कलकोटच्या दक्षिण भागात देगाव एक्सप्