पोस्ट्स

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेबाबत कार्यशाळा संपन्न

  जनलोक वार्ता न्यूज नेटवर्क   पुणे, दि. ३१ : समाज कल्याण विभागाच्यावतीने भारत सरकार शिष्यवृत्ती व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेबाबत जिल्ह्यातील महाविद्यालयांची कार्यशाळा पुणे विद्यार्थीगृहाचे अभियांत्रिकी महाविद्यालय येथे संपन्न झाली. या कार्यशाळेत जिल्ह्यातील सुमारे ३५० महाविद्यालयांनी सहभाग नोंदविला.  कार्यशाळेमध्ये स्वाधार योजना व भारत सरकार शिष्यवृत्ती या योजनांच्या कार्यपद्धतीबाबत मार्गदर्शन करुन प्रभावी अंमलबजावणीसाठी सर्व महाविद्यालयांनी प्रयत्न करावेत अशा सूचना देण्यात आल्या. सन २०१८-१९ ते २०२२-२३ पर्यंतचे महाविद्यालय स्तरावरील प्रलंबित अर्ज तात्काळ निकाली काढावेत, शैक्षणिक वर्ष सुरू होताच सर्व विद्यार्थ्यांचे शिष्यवृत्ती व स्वाधार योजनेचे अर्ज भरून घ्यावेत व शिष्यवृत्ती प्रलंबित असताना महाविद्यालयांकडून विद्यार्थ्यांची अडवणूक करू नये अशा सूचना यावेळी देण्यात आल्या.  महाविद्यालय स्तरावर स्थापन करण्यात आलेल्या समान संधी केंद्र अथवा शिष्यवृत्ती शाखेने विद्यार्थ्यांच्या महा-डीबीटी व स्वाधार योजनेसंदर्भातील शंकाचे निरसन तेथेच करावे. समाज कल्याण वि...

न्या. शिंदे समितीचा पहिला अहवाल स्वीकारला ; कुणबी प्रमाणपत्र देण्याची कार्यवाही सुरु

  जनलोक वार्ता न्यूज नेटवर्क  मुंबई दि. ३१, मराठवाड्यातील निझामकालीन व इतर उपलब्ध कागदपत्रांच्या आधारे मराठा -कुणबी, कुणबी-मराठा जात प्रमाणपत्रांसंदर्भात कार्यवाही निश्चित करणाऱ्या निवृत्त न्या. संदीप शिंदे समितीचा पहिला अहवाल आज राज्य मंत्रिमंडळाने स्वीकृत केला.  अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते.  या अहवालामध्ये निवृत्त न्या. संदीप शिंदे समितीने नमूद केल्याप्रमाणे मराठवाड्यातील आठही जिल्ह्यातील सुमारे पावणेदोन कोटी नोंदी तपासण्यात आल्या असून १३ हजार ४९८ जुन्या कुणबी नोंदी आढळल्या आहेत. या कुणबी नोंदी तपासण्याचे काम दररोज सुरु असून अशा नोंदी असलेल्यांना कुणबी जात प्रमाणपत्र देण्याची कार्यवाही तातडीने सुरू करण्यास देखील आज मंत्रिमंडळाने मान्यता दिली. या नोंदी तपासताना मोडी आणि उर्दू भाषेतील दस्तावेज आढळून आला.  या कागदपत्रांचे भाषांतर करून जतन करण्यासाठी ते डिजिटाईज करून पब्लिक डोमेनवर आणून त्या आधारे कुणबी जातीचे प्रमाणपत्र देण्यास देखील आज मान्यता देण्यात आली.   न्या. शिंदे यांच्या अहवालातील शिफारशींनुसार मराठा-कुणबी, कुणबी-मराठा जातीचे प्रम...

अखिल जनलोक संपादक व पत्रकार संघ संलग्न जनलोक वार्ता समिती निवडणूक 2023 चा निकाल जाहीर

जनलोक वार्ता न्यूज नेटवर्क        सासवड (झेंडेवाडी)  : दि. २९, सासवड येथील झेंडेवाडीत सदस्य गणेश जाधव यांच्या फार्म हाऊसवर  अखिल जनलोक संपादक व पत्रकार संघ संलग्न जनलोक वार्ता समिती महाराष्ट्र प्रदेश व पश्चिम महाराष्ट्र निवडणूक 2023 चा निकाल अखिल जनलोक संपादक व पत्रकार संघाचे संस्थापक राजूसाहेब शिंगाडे यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रीय महिला अध्यक्षा व निवडणूक अधिकारी सोनाली जगताप व अखिल जनलोक संपादक व पत्रकार संघाचे  खेड तालुकाप्रमुख व निवडणूक अधिकारी लतीफ शेख यांनी जाहीर केला. जनलोक वार्ता समिती ची दर पाच वर्षांनी होणाऱ्या निवडणुकीचे पदाधिकारी यांची निवडणूक रविवार दिनांक २९ रोजी झाली व त्याच दिवशी दुपारी ३ वाजता विजयी उमेदवार घोषित करण्यात आले.  या निवडणुकीत विजयी पदाधिकारी उत्तम खेसे, राजगुरूनगर. ( महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष ), संतोष गाडेकर राजगुरुनगर. ( महाराष्ट्र प्रदेश सचिव ), चंद्रकांत सलवदे, पुणे. ( महाराष्ट्र प्रदेश खजिनदार ), अमोल जाधव,  इस्लामपूर. ( महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्ष ), विशाल खुर्द, शिराळा. ( महाराष्ट्र प्रदेश उपकार्य...

लसीकरणाला गती देण्यासाठी राष्ट्रीय कार्यशाळेचे आयोजन

इमेज
जनलोक वार्ता न्यूज नेटवर्क  पुणे, दि. ३०: नियमित लसीकरण कार्यक्रमाला गती देण्यासाठी पुण्यातील हॉटेल कॉनरॅड येथे विविध राज्यातील प्रतिनिधींच्या दोन दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले.   युएसएआयडी द्वारे संचलित ‘मोमेंटम रुटीन इम्युनायझेशन ट्रान्सफॉर्मेशन आणि इक्विटी’ प्रकल्पाच्या पुढाकाराने या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. कार्यशाळेत विविध राज्यांचे प्रतिनिधीत्व करणाऱ्या अशासकीय संस्था, प्रकल्प भागीदार यांनी कोविड लसीकरणाच्या व्यवस्थापनात आलेले अनुभव मांडले. या अनुभवांचा उपयोग नियमित लसीकरण मोहिमेत सातत्य राखण्यासाठी तसेच प्रकल्पाच्या कार्यपद्धतीत सुधारणा करण्यासाठी होऊ शकतो असे यावेळी सांगण्यात आले.  नियमित लसीकरण कार्यक्रम वाढीसाठी विविध राज्यांचे प्रतिनिधीत्व करणाऱ्या एनजीओच्या प्रकल्प भागीदारांनी त्यांच्या नाविन्यपूर्ण आणि धोरणात्मक निर्णय कार्यशाळेत मांडले. या कार्यशाळेत लसीकरण कार्यक्रमाच्या शिफारसी तयार करण्यावर भर दिला गेला.    देशातील लसीकरणाला गती देण्याच्यादृष्टीने युएसएआयडीद्वारे संचलित मोमेंटम रुटीन इम्युनायझेशन ट्रान्सफॉर्मेशन आणि इक्विटी प्र...

चारचाकींसाठी लवकरच नवीन मालिका

जनलोक वार्ता न्यूज नेटवर्क  पुणे दि. ३०  : उप प्रादेशिक परिवहन कार्यालय पिंपरी-चिंचवडमार्फत खासगी चारचाकी वाहनांसाठी सुरु होणाऱ्या 'एलई' या मालिकेतील आकर्षक नोंदणी क्रमांक शुल्क भरुन राखून ठेवण्याकरिता आगाऊ अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. नवीन सुरू होणाऱ्या मालिकेतील आकर्षक तसेच पसंतीचा क्रमांक विहित शुल्क भरुन हवा असल्यास त्यासाठी विहित नमुन्यात अर्ज करणे आवश्यक आहे. हा अर्ज आणि धनाकर्ष (डीडी) १ नोव्हेंबर रोजी सकाळी ११ ते दुपारी २.३० दरम्यान कार्यालयाच्या नवीन वाहन नोंदणी विभागात पत्त्याचा पुरावा, आधारकार्ड, ओळखपत्र, पॅनकार्डच्या साक्षांकित प्रतीसह जमा करावा. चारचाकी वाहन क्रमाकांची यादी २ नोव्हेंबर रोजी कार्यालयीन सूचनाफलकावर लावण्यात येईल. या यादीतील अर्जदारांनी लिलावासाठी जास्त रक्कमेचा एकच धनाकर्ष (डीडी) २ नोव्हेंबर रोजी दुपारी २.३० वाजेपर्यंत सीलबंद लिफाफ्यात घालून कार्यालयात जमा करावा. धनाकर्ष ‘डीवाय. आर.टी.ओ. पिंपरी-चिंचवड’ या नावाने राष्ट्रीयकृत किंवा अनुसूचित बँकेचा पुणे येथील असावा. त्याच दिवशी दुपारी ३.३० वाजता लिफाफे उघडून ज्या अर्जदाराने जास्तीत जास्त रकमेचा...

जिल्हा रस्ते सुरक्षा समिती बैठकीत अपघातांच्या शास्त्रीय विश्लेषणावर भर देण्याची गरज व्यक्त ; अपघातांच्या ठिकाणी जलदगतीने रुग्णवाहिका उपलब्ध होण्यासाठी एसओपी बनवा- जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख

जनलोक वार्ता न्यूज नेटवर्क  पुणे, दि. ३०: पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागात यवत (ता. दौंड), शिक्रापूर आणि रांजणगाव (ता. शिरुर) येथे मोठ्या प्रमाणात अपघात होत असल्यामुळे या ठिकाणी यंत्रणांनी सुरक्षा तसेच उपाययोजनांविषयक पाहणी करावी. आवश्यक उपाययोजनांसह अत्याधुनिक जीवरक्षक साधनसामुग्री असलेल्या रुग्णवाहिका येथे जलदगतीने कशा उपलब्ध होऊ शकतील यासाठी प्रमाणित कार्यपद्धती (एसओपी) बनवावी, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी दिले. जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित जिल्हा रस्ता सुरक्षा समितीच्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी पुणे शहर वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त विजयकुमार मगर, भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे प्रकल्प संचालक संजय कदम, उप प्रादेशिक परिवहन अधिकारी संजीव भोर, पुणे मनपाचे रस्ते विभागाचे अधीक्षक अभियंता साहेबराव दांडगे, सार्व. बांध. विभागाचे कार्यकारी अभियंता मिलिंद बारभाई, महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या कार्यकारी अभियंता श्रुती नाईक आदी उपस्थित होते. बैठकीत पुणे, पिंपरी चिंचवड शहर तसेच ग्रामीण भागातील सतत अपघात होणाऱ्या ठिकाणांच्या ठिकाणी (ब्लॅक स्पॉट) करण्...

जिल्ह्यात १४ कोटी रुपये किंमतीचे अंमली पदार्थ जप्त

  जनलोक वार्ता न्यूज नेटवर्क  पुणे, दि.२८: पुणे शहर पोलीस आयुक्तालय, पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय, पुणे ग्रामीण पोलीस आणि पुणे लोहमार्ग पोलीस अधीक्षक कार्यालयाद्वारे ऑक्टोबर २०२३ पर्यंत  ४०९ प्रकारच्या कारवाईत ९ हजार ३५५ किलो ६८ ग्रॅम वजनाचे १४ कोटी ५५ लाख ३४ हजार २२३ रुपये किंमतीचे अंमली पदार्थ जप्त करण्यात आले असून एकूण ५०४ आरोपींना अटक करण्यात आली आहे. भारत सरकारच्या गृह मंत्रालयाच्या निर्देशानुसार अंमली पदार्थाच्या वापरावर आळा घालण्यासाठी तसेच अंमली पदार्थाबाबतची समस्या प्रभावीपणे हाताळण्यासाठी जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय अंमली पदार्थ विरोधी केंद्र समिती स्थापन करण्यात आली आहे.  या समितीमध्ये पोलीस अधीक्षक पुणे ग्रामीण, उप वनसंरक्षक अधिकारी, जिल्हा आरोग्य अधिकारी  शिक्षणाधिकारी (माध्यमिक), सहायक आयुक्त समाज कल्याण, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी,  सहा.  केंद्रीय वस्तू व सेवा कर विभागाचे आयुक्त, उपविभागीय दंडाधिकारी,  अन्न व औषध प्रशासन विभागाचे सह आयुक्त, केंद्रीय नार्कोटीक्स कंट्रोल ब्युरोचे अधीक्षक, पुणे व  पिंपरी चिंच...