पोस्ट्स

विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढीसाठी प्रयत्न करणार - मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिसे

इमेज
  जनलोक वार्ता न्यूज नेटवर्क  सांगली ( प्रतिनिधी ) : प्रहार शिक्षक संघटने तर्फे सांगली जिल्हा परिषद च्या नूतन मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिसे यांचा सत्कार करण्यात आला.त्याच बरोबर शिक्षकांच्या विविध प्रश्नबाबत सकारात्मक चर्चा करण्यात आली.  शिक्षकांच्या वैद्यकीय बिलाबाबत फाईल्स एक आदर्श नमुना असावा  व फाईल पंचायत समितीवर परिपूर्ण होऊनच जिल्हा परिषद ला पाठवण्यात यावी. तसेच इयत्ता पहिली व दुसरीच्या गुणवत्ता परीक्षा घेण्यात येऊ नयेत,ऍप, लिंक,यांचा वापर मर्यादित असावा यांसारख्या, शिक्षकांना अशैक्षणिक कामे देऊ नयेत यांसारख्या विषयांवर सकारात्मक चर्चा करण्यात आली. याप्रसंगी मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणाल्या, विध्यार्थी गुणवत्ता वाढीसाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगण्यात आले. सदर मागण्यांचे निवेदन प्रहार शिक्षक संघटना कडून देण्यात आले. शिक्षकांच्या विविध प्रश्नावर शिक्षणाधिकारी मोहनराव गायकवाड व शा. पो. आहार जिह्वा प्रमुख मा. दीपाली यादव मॅडम यांच्याशी केली सकारात्मक चर्चा. प्रहार शिक्षक संघटना सांगली यांनी  जिल्हा प्राथमिक शिक्षणाधिकारी मोहनराव गायकवाड साहेब यांचे...

महाराष्ट्र राज्य शारीरिक शिक्षक महासंघाच्या सचिवपदी विश्वनाथ पाटोळे यांची निवड

इमेज
  जनलोक वार्ता न्यूज नेटवर्क  प्रतिनिधी-- लतिफ शेख  खेड दि. २९, केडगाव चौफुला या ठिकाणी महाराष्ट्र राज्य शारीरिक शिक्षक महासंघ संघटना व पुणे जिल्हा शारीरिक शिक्षक संघटना यांची वार्षिक सर्वसाधारण सभा राज्य महासंघाचे अध्यक्ष राजेद्र कोतकर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली यामध्ये सर्वप्रथम पुणे जिल्हा शारीरिक शिक्षक संघटनेची सभा संपन्न झाल्यानंतर महाराष्ट्र राज्य शारीरिक शिक्षक महासंघाची वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न झाली या सभेसाठी महाराष्ट्र राज्यातून तमाम शिक्षक उपस्थित झालेले होते. या राज्याच्या वार्षिक मीटिंगमध्ये पहिल्या क्रीडा शिक्षक अधिवेशनाचे जनक व शारीरिक शिक्षकांच्या विविध प्रश्न सोडविणारे विश्वनाथ पाटोळे यांची महाराष्ट्र राज्याच्या सचिव पदी निवड करण्यात आली तसेच दौंडचे जालिंदर आवारी यांची महाराष्ट्र राज्याच्या संचालक पदी निवड करण्यात आली यासाठी महाराष्ट्र राज्याच्या ऑलिम्पिक संघटनेचे सचिव आदरणीय निलेश जगताप काळे व ठाकूर तसेच पुणे जिल्ह्यातील तेरा तालुके व पुणे चिंचवड क्रीडा शिक्षक संघटनेचे सर्व अध्यक्ष सचिव पदाधिकारी या सभेसाठी उपस्थित होते कार्यक्रमाचे प्रस्ताविक ...

दौंड व पुरंदर तालुक्यातील पोलीस पाटील भरती प्रक्रिया स्थगित

  जनलोक वार्ता न्यूज नेटवर्क  पुणे, दि. २८: पुरंदर उपविभागातील दौंड व पुरंदर तालुक्यातील रिक्त असलेल्या पोलीस पाटील पदांसाठी १ ऑगस्ट २०२३ रोजी आयोजित करण्यात आलेली लेखी परीक्षा पावसाची स्थिती लक्षात घेऊन तसेच अन्य प्रशासकीय कारणास्तव स्थगित करण्यात आली असल्याचे उपविभागीय अधिकारी मिनाज मुल्ला यांनी कळविले आहे. जिल्हाधिकारी पुणे यांच्या निर्देशानुसार ३ जुलै २०२३ रोजी पोलीस पाटील भरती प्रकियेबाबत जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आला होता. पोलीस पाटील पदासाठी प्राप्त अर्जाची छाननी करून पात्र उमेदवारांची यादी २४ जुलै रोजी प्रसिद्ध करण्यात आली आहे. भरती प्रक्रियेबाबत कालबद्ध कार्यक्रमानुसार मंगळवार १ ऑगस्ट रोजी सकाळी ११ वाजता परीक्षा घेण्यात येणार होती. पुणे जिल्ह्यात अतिवृष्टी/मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. तसेच दिनांक १ ऑगस्ट ते ७ ऑगस्ट या कालावधीत महसूल सप्ताह आयोजित करण्यात येणार आहे. पुरंदर तालुक्यातील गराडे, सोनारी व हिवरे या गावांतील पुणे वर्तुळाकार महामार्गासाठी संपादित जमिनीच्या मोजणीची तारीख निश्चित केलेली आहे.    ही परिस्थिती लक्षात घेता नियोजित लेखी परीक्षा घ...

अमेरिकेला प्रायोगिक तत्वावर डाळिंबांची निर्यात

जनलोक वार्ता न्यूज नेटवर्क  पुणे, दि. २८: कृषी उत्पादने निर्यात विकास प्राधिकरण (अपेडा), राष्ट्रीय पीक संरक्षण संस्था (एनपीपीओ), महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळ, डाळिंब संशोधन केंद्र, सोलापूर आणि आय.एन.आय फार्म प्रा.लि. यांच्या संयुक्त विद्यमाने कृषी पणन मंडळाच्या वाशी (नवी मुंबई) येथील विकिरण सुविधा केंद्रावरुन अपेडाच्या महाव्यवस्थापक विनिता सुधांशू  यांच्या हस्ते प्रायोगिक तत्त्वावर अमेरिकेला डाळिंब निर्यातीचा शुभारंभ करण्यात आला. या निर्यातीनंतर अमेरिकेतील मोठी बाजारपेठ खुली होईल असा विश्वास श्रीमती सुधांशू यांनी यावेळी व्यक्त केला.  कार्यक्रमाला अपेडाचे अध्यक्ष अभिषेक देव, संचालक तरुण बजाज, महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाचे कार्यकारी संचालक संजय कदम, राष्ट्रीय डाळिंब संशोधन केंद्र सोलापूरचे डॉ. आर. ए. मराठे, अपेडाचे सरव्यवस्थापक यु. के. वत्स, प्लॅंट प्रोटेक्शन ॲडवायजर जे. पी. सिंग, विकिरण सुविधा केंद्राचे प्रमुख सतिश वाघमोडे आदिंसह अधिकारी व निर्यातदार उपस्थित होते. डाळिंबाच्या दाण्यामध्ये फळमाशीचा प्रादुर्भाव झाल्यामुळे अमेरिका देशाने भारतातून डाळिंबाची आयात करण्यास २...

परदेशी शिष्यवृत्तीसाठी अनुसूचित जमाती प्रर्वगातील विद्यार्थ्यांना अर्ज करण्याचे आवाहन

  जनलोक वार्ता न्यूज नेटवर्क  पुणे, दि. २८: पुणे, कोल्हापूर, सातारा व सांगली या जिल्ह्यातील अनुसूचित जमाती प्रर्वगातील विद्यार्थ्यांनी परदेशात पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या शिक्षणाकरिता सन २०२३-२४ या शैक्षणिक वर्षासाठी परदेशी शिष्यवृत्ती योजनेसाठी १५ ऑगस्ट पर्यंत अर्ज करण्याचे आवाहन एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाकडून करण्यात आले आहे.  राज्यातील अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना परदेशात पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमाचे शिक्षण घेता यावे यासाठी आदिवासी विकास विभागाकडून आयुक्तालय स्तरावर परदेशी शिष्यवृत्ती योजना राबविण्यात येते. एमबीए, वैद्यकीय अभ्यासक्रम, बी. टेक, विज्ञान, कृषी व इतर विषयांचे पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमास परदेशातील मान्यताप्राप्त विद्यापीठात प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांसाठी ही योजना राबविण्यात येते. योजनेच्या लाभासाठी अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या पालकांचे कौटुंबिक कमाल उत्पन्न ६ लाख रुपयांपर्यंत असावे.  परदेशी शिष्यवृत्तीचे विहित नमुन्यातील अर्ज  एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प घोडेगाव यांच्या कार्यालयात विनामूल्य उपलब्ध आहेत. इच्छुक विद...

पर्वती विधानसभा मतदार संघातील गृहनिर्माण संस्थांमध्ये शनिवार, रविवारी मतदार नोंदणी अभियान

जनलोक वार्ता न्यूज नेटवर्क  पुणे, दि. २८:  मतदार याद्यांच्या विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रमाअंतर्गत २१२ पर्वती विधानसभा मतदार संघाच्या कार्यक्षेत्रातील गृहनिर्माण संस्थांमध्ये शनिवार २९ व रविवार ३० जुलै रोजी विशेष मतदार नोंदणी अभियान राबविण्यात येणार आहे. भारत निवडणूक आयोगाने १ जानेवारी २०२४ या अर्हता दिनांकावर मतदार याद्यांचा विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम घोषित केला आहे. त्याअंतर्गत मतदार संघातील मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (बीएलओ) गृहनिर्माण संस्थांमध्ये प्रत्यक्ष घरोघरी भेट देऊन पडताळणी करणार आहेत. त्यामध्ये ज्या मतदारांची नावे मतदार यादीमध्ये समाविष्ट नाहीत त्यांची नावे नमुना क्रमांक ६ मध्ये भरुन घेणे, कायमस्वरुपी स्थलांतरीत व मयत झालेल्या मतदारांची नावे मतदार यादीतून वगळण्यासाठी नमुना क्रमांक ७ तर मतदार यादी किंवा मतदार ओळखपत्रातील त्रुटी दूर करण्यासाठी नमुना क्रमांक ८ भरुन घेतला जाणार आहे.   मतदार नोंदणीसाठी आवश्यक कागदपत्रे: नमुना क्रमांक ६ भरण्यासाठी अर्हता दिनांकाला वय वर्षे १८  पूर्ण होत असावे. निवासाच्या पुराव्यासाठी आधार कार्ड, वाहन चालविण्याचा ...

खेड तालुक्यातील पोलीस पाटील भरती प्रक्रिया स्थगित

जनलोक वार्ता न्यूज नेटवर्क   पुणे दि. २८: खेड तालुक्यातील रिक्त असलेल्या पोलीस पाटील पदांसाठी १ ऑगस्ट २०२३ रोजी आयोजित करण्यात आलेली लेखी परीक्षा पावसाची स्थिती लक्षात घेऊन तसेच प्रशासकीय कारणास्तव स्थगित करण्यात आली असल्याचे खेडचे उपविभागीय अधिकारी जोगेंद्र कट्यारे यांनी कळविले आहे. जिल्हाधिकारी पुणे यांच्या निर्देशानुसार ३ जुलै २०२३ रोजी भरती प्रकियेबाबत जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात  आला होता. पोलीस पाटील पदासाठी प्राप्त अर्जाची छाननी करून पात्र उमेदवारांची यादी २४ जुलै रोजी प्रसिद्ध  करण्यात आली आहे. भरती प्रक्रियेबाबत कालबद्ध कार्यक्रमानुसार मंगळवार १ ऑगस्ट रोजी सकाळी ११ वाजता परीक्षा घेण्यात येणार होती. पुणे जिल्ह्यात अतिवृष्टी/मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. दिनांक १ ऑगस्ट ते ७ ऑगस्ट या कालावधीत महसूल सप्ताह आयोजित करण्यात येणार आहे. खेड तालुक्यातील काही गावांतील पुणे वर्तुळ रस्त्याची संपादित जमिनीच्या मोजणीची तारीख निश्चित केलेली आहे. महाराष्ट्र औद्योगिक विकास मंडळाकडून रोहकल येथील जमीन संपादनाच्या अनुषंगाने मोजणी स्थगित करण्याबाबत शेतकऱ्यांनी निवेदन दिले...