विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढीसाठी प्रयत्न करणार - मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिसे
जनलोक वार्ता न्यूज नेटवर्क
सांगली ( प्रतिनिधी ) : प्रहार शिक्षक संघटने तर्फे सांगली जिल्हा परिषद च्या नूतन मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिसे यांचा सत्कार करण्यात आला.त्याच बरोबर शिक्षकांच्या विविध प्रश्नबाबत सकारात्मक चर्चा करण्यात आली.
शिक्षकांच्या वैद्यकीय बिलाबाबत फाईल्स एक आदर्श नमुना असावा व फाईल पंचायत समितीवर परिपूर्ण होऊनच जिल्हा परिषद ला पाठवण्यात यावी. तसेच इयत्ता पहिली व दुसरीच्या गुणवत्ता परीक्षा घेण्यात येऊ नयेत,ऍप, लिंक,यांचा वापर मर्यादित असावा यांसारख्या, शिक्षकांना अशैक्षणिक कामे देऊ नयेत यांसारख्या विषयांवर सकारात्मक चर्चा करण्यात आली. याप्रसंगी मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणाल्या, विध्यार्थी गुणवत्ता वाढीसाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगण्यात आले. सदर मागण्यांचे निवेदन प्रहार शिक्षक संघटना कडून देण्यात आले.
शिक्षकांच्या विविध प्रश्नावर शिक्षणाधिकारी मोहनराव गायकवाड व शा. पो. आहार जिह्वा प्रमुख मा. दीपाली यादव मॅडम यांच्याशी केली सकारात्मक चर्चा.
प्रहार शिक्षक संघटना सांगली यांनी जिल्हा प्राथमिक शिक्षणाधिकारी मोहनराव गायकवाड साहेब यांचे सोबत शिक्षकांच्या विविध प्रश्नावर सकारात्मक चर्चा करण्यात आली.
शिक्षकांची मेडिकल बिलाचा आदर्श नमुना तयार करून तालुका स्तरावर द्यावा, मेडिकल बिल तालुकास्तरावरुन विशिष्ट फॉर्मेट मधे द्यावे, या संदर्भात विविध सुधारणा करणार असल्याचे गायकवाड साहेबांनी सांगितले.
NPS धारक 1062 शिक्षकांचे ऑनलाईन काम पूर्ण पूर्ण केल्याचें NpS विभागप्रमुख यांनी सांगितले.
तसेच शालेय पोषण आहार जिल्हा प्रमुख दीपाली यादव यांचाही प्रहार शिक्षक संघटनेकडून सत्कार करण्यात आला.यांच्याची शा. पो. आहार समस्या बाबत चर्चा करण्यात आली. शिराळा तालुक्यातील शा. पो. आहार समस्याचें निराकार करणार असल्याचे सांगितले.या संदर्भात प्रहार चें तालुका प्रमुख रमेश तिके यांनी यादव मॅडमसोबत चर्चा केली, यादव मॅडम यांनी शिराळा तालुक्यात येऊन सर्व मुख्याद्यापक यांना मार्गदर्शन करण्याचे मान्य केले.
या प्रसंगी प्रहारचे जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर क्षीरसागर, सरचिटणीस अमोल जाधव, वाळवा तालुकाध्यक्ष सचिन बामणे, जिल्हानेते जोशी सर, बंडू बामणे, केंद्रीय पत्रकार संघांचे अध्यक्ष रवी लोंढे, पत्रकार भिसे सर,उपस्थित होते.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा