पोस्ट्स

राजगुरुनगर मधील बालनाट्य प्रशिक्षण शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद

इमेज
  जनलोक वार्ता न्यूज नेटवर्क राजगुरुनगर दि.२५ (प्रतिनिधी - योगेश माळशिरसकर)     सोहम नाटय संस्था व स्वास्थ्यमंत्र व्याख्यानमाला राजगुरूनगर आयोजित राजगुरूनगर मध्ये ६ ते १४ वयोगातील विद्यार्थ्यासाठी पहिले बालनाट्य प्रशिक्षण उत्स्फूर्त प्रतिसादासह नुकतेच दि. ७ मे ते २१ मे या दरम्यान  पार पडले .      यासाठी एकूण ४० मुलांनी शिबिरात सहभाग नोंदवला.नाटक आणि चित्रपट सृष्टीतील अनेक मान्यवर दिग्दर्शक,संगीतकार, व्हॉईस आर्टिस्ट यांनी नाट्य कलेची विविध माहिती ,नाटकाचे प्रकार , प्रात्यक्षिकांसह मुलांना मार्गदर्शन केले.         १५ दिवस चाललेल्या या शिबिराची सांगता रविवार (दि.२१ मे)रोजी समतानगर,वाडा रोड वरील सारा इंटरनॅशनल स्कूल येथे देवाची फुलं,वेडात मराठे वीर दौडले सात,राजहंस,मूकनाट्य  Mime Act,अप्पर डिप्पर या नाटकांच्या सादरीकरणाने झाली.     या शिबिरासाठी प्रतिक खिसमतराव,डॉ.नीलम गायकवाड,डॉ.शीतल ढवळे - खिसमतराव ,डॉ.कुंतल जाधव  या आयोजकांनी  राजगुरुनगर मध्ये प्रथमच एक आगळावेगळा उपक्रम यशस्वी करण्यासाठी अथक परिश्रम घेतले .

वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्यास खिशाला बसणार दुप्पट कात्री ; वाहतूक विभागाने जारी केले नवीन दंडाच्या रकमेची यादी

  जनलोक वार्ता न्यूज नेटवर्क पुणे दि २६, पुणे शहर वाहतूक पोलिस विभागाकडून दंडाच्या रकमेबाबत सूचनापत्र जारी करण्यात आले आहे. त्यानुसार पुणे शहरात नो पार्किंगमध्ये वाहन लावणाऱ्या दुचाकीस्वारांकडून पहिल्यांदा टोइंगसह 785 रुपये आणि मोटारचालकांकडून 1,071रुपये दंड आकारण्यात येणार आहे. दुसऱ्यांदा नो पार्किंगमध्ये वाहन लावल्यास दुचाकीस्वारांना 1,785 रुपये आणि मोटारचालकांना 2,071 रुपये दंड भरावा लागेल. पार्किंगसंदर्भातील नियम तोडणाऱ्या वाहनचालकांनी पोलिसांसोबत वाद घालू नयेत, असे आवाहन वाहतूक पोलिस शाखेकडून करण्यात आले आहे. वाहतूक नियम: वाहनाचा प्रकार - दुचाकी - चारचाकी प्रथमच दंडाची रक्कम - रु 500 - रु. 500 दुसऱ्यांदा दंडाची रक्कम - रु 1500 - रु. 1500 टोइंग चार्ज: दुचाकी - 200 रु चारचाकी - 484 रु दुचाकी - रु 85.56 चारचाकी - रु 87.12 दुचाकी - रु 785.56 (पहिल्यांदा) आणि रु 1,785.56 (दुसऱ्यांदा) चारचाकी - रु 1,071.12 (पहिल्यांदा) आणि रु 2,071.12 (दुसऱ्यांदा)

शासन आपल्या दारी अभियानाचा सातारा पॅटर्न तयार करणार- मंत्री शंभूराज देसाई

जनलोक वार्ता न्यूज नेटवर्क              मुंबई ,  दि. 18 : सर्वसामान्यांची कामे स्थानिक पातळीवर व्हावीत ,  त्यांना विविध योजनांचे लाभ मिळावेत ,  यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून राज्यात  ‘ शासन आपल्या दारी ’  हे अभियान राबविण्यात येत आहे. सातारा जिल्ह्यातील दौलतनगर येथे दि.१३ मे रोजी या अभियानाचा राज्यस्तरीय शुभारंभ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आला. सातारा जिल्ह्यात शासन आपल्या दारी अंतर्गत २७ हजार पात्र लाभार्थींना लाभ झाला असून  या अभियानांतर्गत  जास्तीत जास्त नागरिकांना विविध शासकीय योजनांचे लाभ होण्यासाठी सातारा पॅटर्न तयार करणार असल्याचे राज्य उत्पादन शुल्क मंत्री तथा सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी सांगितले.             मंत्री श्री. देसाई यांनी आज शासन आपल्या दारी अभियान व जलयुक्त शिवार अभियान टप्पा दोन या विषयाबाबत पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी ते...

आकुर्डी रेल्वेलाइन हद्दीतील अतिक्रमणावर पालिकेचा हातोडा

इमेज
  जनलोक वार्ता न्यूज नेटवर्क  निगडी दि.१८, आकुर्डी रेल्वे लाइन हद्दीतील अवैध टपऱ्यांवर पालिकेने कारवाई केली. आकुर्डी रेल्वलाइन हद्दीत मोठ्या प्रमाणात अतिक्रमण वाढत चालला होता. अखेर आज पालिका प्रशासनाने त्याच्यावर धडक कारवाई केली आहे.          पिंपरी चिंचवड महानगरपालिके आयुक्त शेखर सिंह यांनी गेल्या अनेक दिवसांपासून अतिक्रमणावर धडक मोहीम राबविण्याचे काम करत आहेत. शहरातील सर्व अ ते ह क्षेत्रीय हद्दीत अतिक्रमण हटाव मोहिम राबविली जात आहे. मात्र याला अनेक कष्टकरी आणि फेरिवाल्या संघाकडून विरोध देखिल होताना पहायला मिळत आहे.

५५ वर्षांहून अधिक वयाच्या वाहतूक पोलिसांना रस्त्यावर कर्तव्य बजावण्यासाठी तैनात करू नये -मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पोलीस आयुक्तांना निर्देश

जनलोक वार्ता न्यूज नेटवर्क                  मुंबई ,  दि. १७: दुपारच्या उन्हात कर्तव्य बजावणाऱ्या वाहतूक पोलिसांना सावलीसाठी तात्पुरत्या शेड्स तसेच पिण्याचे पाणी उपलब्ध करून द्यावे. ५५ वर्षांहून अधिक वयाच्या वाहतूक पोलिसांना रस्त्यावर कर्तव्य बजावण्यासाठी तैनात करू नये ,  असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबईचे पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर यांना दिले आहेत.  आवश्यकता भासल्यास मुख्यमंत्री सहायता निधीमधून त्यासाठी अतिरिक्त निधी उपलब्ध करून दिला जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.            आज दुपारी साडेबारा वाजता मुख्यमंत्री श्री. शिंदे  ठाणे येथून मुंबईकडे मार्गक्रमण करत असताना भर उन्हात जागोजागी कर्तव्य बजावत असलेले वाहतूक पोलीस त्यांना दिसले. यातील अनेक पोलीस हे वयाने ज्येष्ठ असूनही भर उन्हात कर्तव्य बजावत असल्याचे त्यांनी पाहिले. संवेदनशील मुख्यमंत्री म्हणून ओळख असलेल्या श्री. शिंदे यांनी त्यांची अवस्था पाहून तातडीने मुंबई पोलीस आयुक्तांना फोन...

गुजरात राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेतील पदक प्राप्त खेळाडू, त्यांचे क्रीडा मार्गदर्शक यांच्या रोख पारितोषिकाची रक्कम बँक खात्यात जमा करण्यास मान्यता- क्रीडा व युवक कल्याण मंत्री गिरीश महाजन

जनलोक वार्ता न्यूज नेटवर्क                मुंबई, दि.१७ : गुजरात राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा (National games), २०२२ स्पर्धेतील राज्यातील पदक प्राप्त खेळाडू व त्यांचे क्रीडा मार्गदर्शक यांना मंजूर रोख पारितोषिकाची रक्कम त्यांच्या बँक खात्यात जमा करण्यास मान्यता देण्यात आली  असल्याचे क्रीडा व युवक कल्याण मंत्री गिरीश महाजन यांनी सांगितले.             महाजन म्हणाले, स्पर्धेतील पदकप्राप्त खेळाडूंच्या रोख पारितोषिक रक्कमेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वाढ केली आहे. त्यानुसार पदक प्राप्त खेळाडूंना रोख पारितोषिकाची रक्कम जाहिर केली आहे. खेळाडू व मार्गदर्शक यांच्या रोख पारितोषिकासाठी एकूण रक्कम रू. २०३६.७० लक्ष प्राप्त झालेली आहे.              राज्याचे क्रीडा धोरण अंतर्गत आंतरराष्ट्रीय स्तरावर उल्लेखनीय कामगिरी तसेच राज्याचे नाव उज्ज्वल करून पदक प्राप्त खेळाडू व त्यांचे क्रीडा मार्गदर्शक यांना रोख बक्षीस देऊन गौरविण्याची योजना संचालनालयस्तरावर कार्यान्वित असून त्याअंतर्गत दि. २७ सप्टेंबर त...

पथविक्रेत्यांच्या मुलांच्या शिक्षणासाठी सहकार्य करणार-पालकमंत्री चंद्रकांत पाटील

इमेज
  जनलोक वार्ता न्यूज नेटवर्क पुणे दि.१७: पथविक्रेत्यांच्या मुलांच्या शिक्षणासाठी एखादा ट्रस्ट स्थापन केल्यास आणि त्यामार्फत अर्ज एकत्रित केल्यास दानशूर व्यक्तींकडून मदत मिळवून देण्यात येईल, असे प्रतिपादन राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी केले. पुणे महानगरपालिकेच्या समाजविकास विभागातर्फे यशवंतराव चव्हाण नाट्यगृह येथे आयोजित पंतप्रधान पथविक्रेता आत्मनिर्भरता निधी अर्थात स्वनिधी महोत्सवाच्या उदघाटन प्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाला मनपा आयुक्त विक्रमकुमार, केंद्रीय गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालयाचे सहसचिव राहुल कपूर, मनपाचे अतिरिक्त आयुक्त डॉ. कुणाल खेमनार, उपायुक्त नितीन उदास, जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक श्रीकांत कारेगावकर उपस्थित होते. योजनेच्या अंमलबजावणीसाठी महानगरपालिकेचे अभिनंदन करून पालकमंत्री श्री.पाटील म्हणाले, पथविक्रेत्यांनी एकत्रितपणे वस्तू मोठ्या प्रमाणात खरेदी केल्यास कमी किमतीत खरेदी होईल. त्यामुळे मिळणारे उत्पन्न वाढविता येईल.  सुरुवातीच्या खरेदीसाठी  निधी उभारण्यातांना लोकप्रतिनिधी मदत करतील. पुढच्...