पोस्ट्स

सेवा पंधरवडा निमित्ताने मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते दाखले वाटप

इमेज
जनलोक वार्ता न्यूज नेटवर्क  प्रतिनिधी  / मुस्तफा चाबरू पुणे दि.१७- राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता सेवा पंधरवडा निमित्ताने उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते कोथरूड येथे विविध प्रकराच्या दाखल्यांचे वितरण करण्यात आले. मंत्री श्री.पाटील यांच्या निर्देशानुसार हवेली तहसील कार्यालयाच्या माध्यमातून कोथरूड येथे विविध दाखले जागेवर उपलब्ध करून देण्याची सुविधा करण्यात आली आहे. या सुविधेच्या शुभारंभ प्रसंगी श्री.पाटील म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सामान्य नागरिकांसाठी अनेक कल्याणकारी योजना राबविल्या आहेत. त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने सामान्य नागरिकांचे प्रश्न सोडविण्यासाठी हा पंधरवडा साजरा करण्यात येत आहे. या माध्यामातून विविध प्रकारचे दाखले एकाच ठिकाणी देण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. नागरिकांनी या सुविधेचा लाभ घ्यावा असे आवाहन त्यांनी केले. नागरिकांचे प्रश्न सोडविण्यासाठी शासन प्रयत्नशील असल्याचे ते म्हणाले. राष्ट्रपिता महत्मा गांधी यांनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी केलेल्या कार्याचा श्री.पाटील यांनी विशेष उल्लेख केला. यावेळी श्री.पाटील यांच्या हस्ते  ...

मराठवाड्याच्या सर्वांगीण विकासासाठी शासन कटीबद्ध- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

इमेज
जनलोक वार्ता न्यूज नेटवर्क प्रतिनिधी / राजू शिंगाडे औरंगाबाद, दि.17 (विमाका) :-  मराठवाडा ही पवित्र भूमी असून येथे संतांचे संस्कार, मेहनती तरुण, वाढणारे उद्योग, यासह पर्यटनाच्या अनेक संधी उपलब्ध आहेत. येथील विकासाचे प्रश्न सोडविण्यसाठी आम्ही कटीबद्ध असून विविध विकास कामांसाठी शासन भरीव निधी उपलब्ध करुन देत आहे. तसेच या सर्व कामांचा यापुढे मंत्रालय स्तरावरुन नियमित आढावा घेतला जाईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे दिली. मराठवाड्यातील जिल्ह्यांसाठी विविध विकास कामांच्या घोषणाही मुख्यमंत्र्यांनी आज केल्या.   मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनानिमित्त् मुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते येथील सिद्धार्थ उद्यानात आज ध्वजारोहण करण्यात आले. या निमित्ताने मुक्तिसंग्रामाचा अमृत महोत्सवी वर्षासही आज सुरूवात झाली. या कार्यक्रमास केंद्रीय वित्त राज्यमंत्री डॉ.भागवत कराड, विधान परिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, आमदार सर्वश्री  हरिभाऊ बागडे, संजय शिरसाट, अभिमन्यु पवार, प्रशांत बंब, विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर, जिल्हाधिकारी सुनील चव्हाण, विशेष पोलीस महानिरीक्षक मल्लिकार्...

सजग नागरिक घडविण्यासाठी छात्र संसद उपयुक्त- उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील

इमेज
  जनलोक वार्ता न्यूज नेटवर्क प्रतिनिधी / इस्माईल तांबोळी पुणे दि.१७-देशात सजग नागरिक घडविण्यासाठी ‘भारतीय छात्र संसद’ सारखे उपक्रम उपयुक्त ठरतील आणि या माध्यमातून विविध कायदे तयार करताना चांगली मते मांडणारे नागरिक तयार होतील, असे प्रतिपादन राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले. एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी आयोजित बाराव्या छात्र संसदेत ते बोलत होते. कार्यक्रमाला विद्यापीठाचे संस्थापक डॉ.विश्वनाथ कराड आणि राहुल कराड उपस्थित होते. श्री.पाटील म्हणाले, देशातील कायदा सर्व धर्म आणि जातींसाठी समान आहे. डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी राज्यघटना तयार करताना भविष्याचा विचार करून तयार केली असून त्याद्वारे प्रत्येकाला समान अधिकार देण्यात आले आहेत. राज्यघटनेतील तत्वाला अनुसरून देशातील पुरुष आणि महिलांमधील विषमता दूर करण्यासाठी कायद्याची गरज आहे. त्यासाठी समाजातील विविध घटकांनी चर्चा करावी, असे आवाहन त्यांनी केले. सामान्य कुटुंबातील व्यक्तीने समाजासाठी परिश्रमपूर्वक कार्य केल्यास ती उच्च पदावर जाऊ शकते आणि हेच आपल्या लोकशाहीची वैशिष्ठ्य आहे. युवकांनी छात्र संसदसारख्या उपक्रमां...

चांदणी चौकातील सेवारस्त्यासाठी ५ मिळकतींचे भूसंपादन जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली केवळ २० दिवसात कार्यवाही होणार

इमेज
जनलोक वार्ता न्यूज नेटवर्क प्रतिनिधी / संदीप जगताप पुणे, दि.१७: पुणे- बेंगळुरू राष्ट्रीय महामार्ग क्र. ४ वर चांदणी चौक येथे होणाऱ्या वाहतूक कोंडीवर उपाययोजनांतर्गत सेवारस्त्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाने गतीने कार्यवाही करत बावधन (ता.मुळशी) येथील ५ मिळकतींच्या भूसंपादनाचे निवाडे जाहीर केले असून सोमवारी या जमिनींचा ताबा घेण्यात येणार आहे.  चांदणी चौकातील वाहतूक कोंडीची समस्या सोडविण्यासाठी प्रशासनातर्फे गतीने कार्यवाही करण्यात येत आहे. त्याचा एक भाग म्हणून जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली उपजिल्हाधिकारी भूमी संपादन (समन्वय) प्रवीण साळुंखे आणि विशेष भूमी संपादन अधिकारी (क्र.१६) द. दा. काळे यांनी तातडीने आवश्यक कार्यवाही करीत  २० दिवसांच्या आतच ही प्रक्रिया पूर्ण केली.  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नुकतीच चांदणी चौक परिसराला भेट देऊन  वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी गतीने उपाययोजनांचे निर्देश प्रशासनाला दिले होते. त्यानंतर केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी २ सप्टेंबर रोजी सर्व संबंधित यंत्रणांची बैठक घेऊन या चौकात उभारण्यात येणा...

जायंटस् ग्रुप ऑफ हिरकणी मार्फत घेण्यात आलेल्या तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धेचे बक्षीस वितरण संपन्न

इमेज
जनलोक वार्ता न्यूज नेटवर्क प्रतिनिधी / विशाल खुर्द शिराळा : जायंटस् ग्रुप ऑफ हिरकणी मार्फत यंग जायंट्स ऑफ शिराळा प्राईड व पंचायत समिती शिराळा शिक्षण विभाग यांच्या साहाय्याने 13 ऑगस्ट रोजी तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धेतील विजेत्यांना बक्षीस वितरण व आदर्श शिक्षकांचा सत्कार समारंभ सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष, आमदार मा.मानसिंगराव नाईक यांच्या हस्ते पार पडला.             जायंटस ग्रुप ऑफ हिरकणी च्या माध्यमातून शिराळा भागात विविध सामाजिक उपक्रम राबविले जातात. ग्रुप च्या सामाजिक कार्याबद्दल कौतुक आ.मानसिंगराव नाईक यांनी आपल्या मनोगतातून प्रेरणा देण्याचे काम केले . शालेय विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून, सामाजिक कार्यात सर्वातोपरी मदतीचे आश्वासन आ. नाईक यांनी केले जायंट्स गृप ऑफ हिरकणी च्या अध्यक्षा सविता नलावडे यांनी प्रास्ताविक केले. गृपच्या कार्यवाह आशा साळुंखे यांनी सर्वांचे स्वागत केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डाॅ.मनिषा यादव यांनी केले . तसेच कार्यक्रम यशस्...

अडचणीतील सूतगिरण्या आणि यंत्रमाग पूर्ण क्षमतेने सुरू राहण्यासाठी शासन सहकार्य करणार- वस्त्रोद्योग मंत्री चंद्रकांत पाटील

इमेज
जनलोक वार्ता न्यूज नेटवर्क  प्रतिनिधी  / दयानंद गौडगांव               पुणे, दि. 14 : कृषीक्षेत्रानंतर देशात दुसऱ्या क्रमांकाचे रोजगार निर्मितीचे क्षेत्र म्हणून वस्त्रोद्योगाकडे पाहिले जाते. परंतु राज्यातील अनेक सूतगिरण्या आणि यंत्रमाग अडचणीत आहेत. त्या पूर्ण क्षमतेने सुरू करण्यासाठी शासन सहकार्य करेल असे वस्त्रोद्योग मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.             आज मंत्रालयात मंत्री श्री. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली वस्त्रोद्योग विभागाची आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. बैठकीला वस्त्रोद्योग विभागाचे प्रधान सचिव पराग जैन, वस्त्रोद्योग आयुक्त शितल उगले आणि संबंधित अधिकारी उपस्थित होते.             श्री. पाटील म्हणाले, राज्यातील सूतगिरण्या अनेक वर्षांपासून अडचणीत आहेत. काही बंद आहेत तर काही बंद पडण्याच्या अवस्थेत आहेत. या सर्व सूतगिरण्यांबाबत त्यांच्या नेमक्या काय अडचणी आहेत. यावर काय उपाययोजना करता येतील याबाबत प्रत्येक सूतगिरणी नुसार विभागाने सविस्तर प्रस्ताव तयार करावा. या ...

'तृतीयपंथीयांचा लोकशाहीतील सहभाग' या विषयावर राज्यस्तरीय परिषदेचे उद्‌घाटनतृ ; तीयपंथीयांच्या प्रश्नाबाबत परिषदेत सकारात्मक चर्चा

इमेज
जनलोक वार्ता न्यूज नेटवर्क प्रतिनिधी धर्मपाल कांबळे  पुणे, दि. १४: मुख्य निवडणूक अधिकारी महाराष्ट्र राज्य आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने 'तृतीयपंथीयांचा लोकशाहीतील सहभाग' या विषयावर आयोजित दोन दिवसीय राज्यस्तरीय परिषदेचे उद्घाटन खासदार सुप्रिया सुळे यांच्या हस्ते करण्यात आले.  सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या संत नामदेव सभागृहात आयोजित या कार्यक्रमाला मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे, पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, पुणे विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. संजीव सोनावणे, चित्रा वाघ, झैनब पटेल, श्रीगौरी सावंत, सलमा खान आदी उपस्थित होते.  खासदार सुळे म्हणाल्या, तृतीयपंथीयांचा लोकशाहीतील सहभाग अत्यंत महत्वाचा आहे. तृतीयपंथीयांच्या प्रश्न सोडविण्याच्यादृष्टीने ही परिषद महत्वाची ठरणार आहे.  चित्रा वाघ म्हणाल्या, तृतीयपंथीयांच्या बाबत आपली मानसिकता बदलणे गरजेचे आहे. या समुदायाचे प्रश्न आपण आपले प्रश्न म्हणून मांडणे गरजेचे आहे.  मुख्य निवडणूक अधिकारी देशपांडे म्हणाले, लोकशाही प्रक्रियेत दिव्यांग तसेच तृतीयपंथीय यांचा सहभाग वाढावा, यासाठीच...