पोस्ट्स

फेब्रुवारी, २०२४ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

महाराष्ट्रातून राज्यसभेवर सहा उमेदवारांची निवड

  जनलोक वार्ता न्यूज नेटवर्क              मुंबई, दि. २३ : राज्यातील सहा उमेदवारांची राज्यसभेच्या सदस्यपदी निवड झाली आहे. यामध्ये भारतीय जनता पक्षाच्या मेधा कुलकर्णी, अजित गोपछडे, अशोकराव चव्हाण (माजी मुख्यमंत्री) आणि शिवसेनेचे मिलिंद देवरा, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (अजित पवार गट) प्रफुल्ल पटेल, भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे चंद्रकांत हंडोरे यांची महाराष्ट्रातून राज्यसभेवर निवड झाली.             राज्यसभेच्या १५ राज्यातील ५६ जागांसाठी २७ फेब्रुवारी २०२४ रोजी निवडणूक होणार होती. राज्यात उमेदवारीचा अर्ज मागे घेण्याची तारीख २० फेब्रुवारी होती. राज्यसभेवर महाराष्ट्राच्या सहा जागांसाठी सहा अर्ज प्राप्त झाल्याने, या सहा जणांची निवड करण्यात आली आहे. २ एप्रिल २०२४ मध्ये राज्यसभा सदस्यांची मुदत संपल्यानंतर या उमेदवारांची नियुक्ती करण्यात येणार असल्याचे राज्य विधिमंडळाचे सचिव जितेंद्र भोळे यांनी पत्रकाद्वारे कळविले आहे.

महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांचं निधन ; वयाच्या ८७ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

इमेज
मुंबई दि.२३, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री तथा हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे कडवट शिवसैनिक मानले जाणारे मनोहर जोशी  यांचं निधन झालं आहे. वयाच्या 87व्या वर्षी त्यांची प्राणज्योत मालवली. मध्यरात्री 3 वाजता मुंबईच्या हिंदुजा रुग्णालयात  उपचारा दरम्यान त्यांनी अखेरचा श्वास घेतला. दरम्यान, मनोहर जोशी यांना हृदयविकाराचा झटका आल्यानं त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यांच्यावर आयसीयूमध्ये उपचार सुरू होते. काही महिन्यांपूर्वी मनोहर जोशी यांना ब्रेन हॅमरेजचा त्रास होत असल्यानं हिंदुजा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं. मात्र त्यानंतर प्रकृती स्थिर झाल्यानंतर त्यांना डिस्चार्ज देण्यात आला होता.

भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाची पिंपरी चिंचवड शहर जम्बो कार्यकारिणी जाहीर

इमेज
पुणे दि.२१, (प्रतिनिधी - दयानंद गौडगांव) भा रतीय  जनता पार्टी युवा मोर्चाची पिंपरी-चिंचवड शहराची  जंम्बो कार्यकारणी जाहीर करण्यात आली आहे. नवनियुक्त पदाधिकार्‍यांचा पदग्रहण सोहळा मंगळवारी  संत तुकारामनगर, पिंपरी येथील आचार्य अत्रे रंगमंदिर येथे उत्साहात पार पाडला. भाजपाचे शहराध्यक्ष शंकर जगताप यांच्या हस्ते नवनियुक्त पदाधिकार्‍यांना नियुक्तीपत्र देण्यात आले. यावेळी आमदार महेश लांडगे, अश्विनी जगताप, उमा खापरे, पक्षाचे शहर चिटणीस नामदेव ढागे, संजय मंगोडिकर, राजू दुर्गे, शीतल शिंदे, भाजपा युवा मोर्चाचे शहराध्यक्ष व संयोजक तुषार हिंगे, महिला शहराध्यक्षा सुजाता पालांडे, अल्पसंख्याक मोर्चाचे शाकिर शेख, कामगार प्रकोष्ठ नामदेव पवार, सांस्कृतिक प्रकोष्ठ विजय भिसे, किसान मोर्चाचे गुलाब बनकर, वैद्यकीय प्रकोष्ठ डॉ. प्रताप सोमवंशी, दिव्यांग सेलचे शिवदास हांडे, बेटी बचाओ बेटी पढाओचे प्रिती कामतीकर, वाहतुक सेलचे दीपक मोढवे पाटील, जैन प्रकोष्ठ संदेश गादिया आदी पदाधिकारी उपस्थित होते.  भाजपा युवा मोर्चाची पिंपरी-चिंचवड शहर कार्यकारणी पुढीलप्रमाणे! उमेश सांडभोर, भूषण गायके, अक्षय कामठे, मनीष यादव, रवी भ