आदर्श ग्राम सिद्धेगव्हाणच्या उपसरपंचपदी प्रा. राजेंद्र गाडे बिनविरोध निवड

जनलोक वार्ता न्यूज नेटवर्क 


खेड (प्रतिनिधी ) : आदर्श ग्राम सिद्धेगव्हाण येथील ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी आमदार दिलीपराव मोहिते पाटील यांचे समर्थक प्रा. राजेंद्र गाडे यांची निवड करण्यात आली.


 सौ. ज्योती साबळे यांनी आपल्या सहकाऱ्यांना संधी मिळावी. या उद्देशाने पदाचा राजीनामा दिला. त्यानुसार दौलतराव मोरे यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आलेल्या विशेष बैठकीत निवडणुक प्रक्रिया पार पडली. उपसरपंच पदासाठी राजेंद्र गाडे यांचा एकमेव उमेदवारी अर्ज दाखल झाल्याने निवडणूक अधिकारी स्वाती माळी व सभेचे अध्यक्ष दौलतराव मोरे यांनी बिनविरोध निवड जाहीर केली.


 यावेळी सरपंच परिषदेचे उपाध्यक्ष शशिकांत मोरे मावळत्या उपसरपंच ज्योती साबळे,मा.चेअरमन अनिल साबळे, उद्योजक उमेश मोरे , ग्रामपंचायत सदस्य स्वाती मोरे, कांचन थोरात, अच्युता पवार, अविनाश मोरे, मनोज मोरे, बाळासाहेब मोरे, वाल्मिकराव साबळे, मुगुटराव मोरे, संतोष साबळे माजी सैनिक प्रकाशराव उगले, धनंजय धाऊत्रे, विनायक पवार, मा. सरपंच दत्तात्रय गंगावणे, दिलीप मोरे, शिवाजी मोरे, विलास चौधरी, संतोष मोरे, जयसिंग धाऊत्रे, दत्ता गाडे, दयानंद धुमाळ, कमलाकर वाडेकर, बाळासाहेब चौधरी, मोहन साबळे, संतोष गाडे, धीरज मोरे, विलास पवार, हनुमंत गाडे, प्रदीप थोरात, पंडित मोरे, गोरक्ष साबळे,गणेश धाऊत्रे, काळूराम पवार, बापू गाडे, आनंद साबळे, रमेश मोरे, संजय साबळे, राजेंद्र उगले, महेंद्र उगले, बाळासाहेब मालुसरे, अनिल मोरे, परशुराम धाऊत्रे, रणजित मोरे, नितीन कावरे, सचिन मोरे, सोमनाथ वाडेकर, प्रा. महेंद्र गाडे, शिवाजी गंगावणे, धोंडिबा धाऊत्रे, विक्रांत चौधरी, बाळासाहेब जाधव, निलेश गंगावणे इत्यादी उपस्थित होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सोलापूर जिल्यातील बाबुळगाव जातीयवाद्यांचा बौद्ध समाजाच्या कार्यकार्त्यावर हल्ला

अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाला रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (A) उपाध्यक्ष पुणे जिल्हा व खेड तालुका युवक अध्यक्षांचा पाठिंबा

वाल्हेकरवाडी येथे शिवभक्त प्रतिष्ठान आयोजित श्रीराम प्रतिमा पुजन व दिपोत्सव कार्यक्रम उत्साहात