सोलापूरचे जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांची बदली ; कुमार आशीर्वाद नवे जिल्हाधिकारी

जनलोक वार्ता न्यूज नेटवर्क 


सोलापूर (प्रतिनिधी) दि. २०, सोलापूर चे आदर्श  जिल्हाधिकारी म्हणून ठसा उमटविलेले मिलिंद शंभरकर यांची बदली करण्यात आली असून त्यांच्या जागी  कुमार आशीर्वाद  यांची नियुक्ती करण्यात आली आहे. राज्यतील काही आय ए एस अधिकाऱ्यांच्या बदल्या राज्य सरकारने केल्या आहेत यात सोलापूर चे जिल्हाधिकारी मिलिद शंभरकर आणि सोलापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांचा समावेश आहे.


सोलापूर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदी मनीषा आव्हाळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे .

राज्य सरकारने तब्बल 41 आयएएस अधिकाऱ्यांच्या  बदल्या केल्या असून त्यामध्ये सोलापूरच्या जिल्हाधिकारी पदी गडचिरोली जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुमार आशीर्वाद यांची नियुक्ती करण्यात आली आहे,  तर सोलापूर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदी सहाय्यक जिल्हाधिकारी तथा प्रांताधिकारी क्रमांक दोन च्या मनीषा आव्हाळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.


सोलापूरचे जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांना साडेतीन वर्षे पूर्ण झाले आहेत तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांना ही अडीच वर्षे पूर्ण होऊन गेले आहेत. दिलीप स्वामी व मिलिंद शंभरकर या जोडीने कोरोनाच्या लाटेमध्ये अतिशय चांगले काम केल्याचे पाहायला मिळाले. जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी कोरोनाच्या दोन्ही लाटेत चांगल्या पद्धतीने सोलापूरला काम केले या दोन्ही लाटे मधून त्यांनी सोलापूरला बाहेर काढले होते. जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांना महात्मा फुले जन आरोग्य योजनेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदी नियुक्ती देण्यात आली आहे. सोलापूर चे जिल्हाधिकारी म्हणून कार्यरत असताना मिलिंद शंभरकर हे कसलाही डाम डौल न ठेवता अंत्यत साधेपणा ठेवून जिल्ह्यातील प्रत्येक कामाचे नियोजन करून जिल्हाधिकारी पदाची साडे तीन वर्षाचा कार्यकाळ पुर्ण केले आहेत  पंढरपूर च्या सर्व यात्रा कालावधी मध्ये तसेच मुख्यमंत्री यांचे दौरे आणि सोलापूर जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यात जिल्हाधिकारी  मिलिंद शंभरकर यांनी चोख  नियोजन केले, तर दिलीप स्वामी यांनी ही अंत्यत नीटनेटके नियोजन करून सोलापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून अडीच वर्षाचा कार्यकाळ सांभाळला आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सोलापूर जिल्यातील बाबुळगाव जातीयवाद्यांचा बौद्ध समाजाच्या कार्यकार्त्यावर हल्ला

अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाला रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (A) उपाध्यक्ष पुणे जिल्हा व खेड तालुका युवक अध्यक्षांचा पाठिंबा

वाल्हेकरवाडी येथे शिवभक्त प्रतिष्ठान आयोजित श्रीराम प्रतिमा पुजन व दिपोत्सव कार्यक्रम उत्साहात