'शासन आपल्या दारी' कार्यक्रमाच्या अनुषंगाने ड्रोन वापरावर बंदी

जनलोक वार्ता न्यूज नेटवर्क 


पुणे, दि. ११:  पुरंदर तालुक्यातील जेजुरी येथे १३ जुलै रोजी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत 'शासन आपल्या दारी' व जेजुरी विकास आराखडा भूमीपूजन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाच्यावेळी कायदा व सुव्यवस्था राखण्याच्यादृष्टीने पूर्व परवानगीशिवाय ड्रोनद्वारे चित्रीकरणास मनाई असल्याचे अप्पर जिल्हादंडाधिकारी ज्योती कदम यांनी आदेशित केले आहे.


कोणतीही व्यक्ती, संस्था, आयोजक यांना पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षकांच्या पूर्वपरवानगीशिवाय ड्रोनद्वारे चित्रीकरण करता येणार नाही असे आदेशात नमूद करण्यात आले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

मोठी बातमी ..! राज्यातील सर्व शाळा 5 डिसेंबरला राहणार बंद, शिक्षण संस्था महामंडळाची तातडीच्या चर्चेची मागणी

PCMC : पिंपरी चिंचवड शहरातील वाढते औद्योगिकीकरण लक्षात घेता उद्योगास पोषक वातावरण तयार करावे-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Pune : पुण्यात गुरूवारी या भागातील पाणीपुरवठा राहणार बंद