पवना नदी फेसासळी ; नदी प्रदूषित करणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी
निगडी दि ७ , थेरगाव जवळ पवना नदी पात्रात मोठ्या प्रमाणात फेसाळ दिसत आहे. पवना नदीत वारंवार रसायन मिश्रीत पाण्यामुळे नदी प्रदूषित होत आहे.
पिंपरी-चिंचवड शहराची जीवनदायिनी असलेली पवना नदी काही समाज कंटकांनी प्रदूषित करण्याचा विडा उचलला आहे. कंपन्यांच्या रसायनमिश्रित पाण्यामुळे नदी मृत होत चालली आहे. परंतु, या कंपन्यांना आवर घालण्यासाठी वाली उरला आहे की नाही असा प्रश्न पर्यावरणप्रेमींनी केला आहे. केजुबाई बंधाऱ्यापासून ते मोरया गोसावी मंदिरापर्यंत सध्या मोठ्या प्रमाणात नदी पांढऱ्या रंगाने फेसाळली आहे. हा फेस पाण्यावर तरंगत आहे. फेस उगमापासून आहे की, मध्येच कुठे मिश्रित आहे याबाबत नागरिकांमध्ये चर्चा रंगली आहे.
याशिवाय संबंधितांवर कारवाई करावी अशी मागणी स्थानिक करत आहेत .
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा