शनिवारी राज्यस्तरीय कृषि दिन कार्यक्रमाचे आयोजन

जनलोक वार्ता न्यूज नेटवर्क 


पुणे, दि.30: कै.वसंतराव नाईक जयंतीनिमित्त कृषि मंत्री अब्दुल सत्तार यांच्या उपस्थितीत 1 जुलै रोजी सकाळी 10 वाजता पुणे जिल्हा परिषदेच्या श्री. शरदचंद्र पवार सभागृहात राज्यस्तरीय कृषि दिन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.


कार्यक्रमाला राज्याचे कृषि आयुक्त सुनील चव्हाण, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद,  तसेच कृषि विभागातील वरिष्ठ अधिकारी आणि प्रगतीशील शेतकरी उपस्थित राहणार आहेत. 


कृषि विभागातील अधिकारी, कर्मचारी आणि शेतकऱ्यांनी कार्यक्रमाला उपस्थित रहावे, असे आवाहन कृषि विभागातर्फे करण्यात आले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

मोठी बातमी ..! राज्यातील सर्व शाळा 5 डिसेंबरला राहणार बंद, शिक्षण संस्था महामंडळाची तातडीच्या चर्चेची मागणी

अखिल महाराष्ट्र विश्वकर्मा सुतार समाज महासंघ आयोजित भव्य राज्यस्तरीय वधू वर पालक परिचय मेळावा

Pune : पुण्यात गुरूवारी या भागातील पाणीपुरवठा राहणार बंद