शिराळा येथील न्यू इंग्लिश स्कूल मध्ये योग दिवस साजरा

 जनलोक वार्ता न्यूज नेटवर्क



शिराळा दि.२०, येथील न्यू इंग्लिश स्कूलमध्ये आंतरराष्ट्रीय योग दिवस उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी एन. सी.सी. ऑफिसर अरुण हाके यांच्या मार्गर्शनाखाली विद्यार्थ्यांनी योग अभ्यास केला.

यावेळी  मुख्याध्यापक अंगराज माजगावकर यांनी विद्यार्थ्यांना योग साधनेचे महत्त्व समजावून सांगितले. विद्यार्थीदशेत योग साधनेचे महत्त्व जाणून घेवून नियमित पणे योग करावा. व निरोगी राहण्यासाठी योग साधनेची आवश्यकता पटवून देण्यात आली. यावेळी भास्कर हराळे सर यांनी विद्यार्थ्यांना योगासने व त्यांचे महत्त्व सांगितले . 

यावेळी विद्यालयाचे मुख्याध्यापक ए.पी.माजगावकर, पर्यवेक्षक एस.बी.नांद्रे, क्रीडा शिक्षक एस.एस.चव्हाण तसेच सर्व शिक्षक, शिक्षिका शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

मोठी बातमी ..! राज्यातील सर्व शाळा 5 डिसेंबरला राहणार बंद, शिक्षण संस्था महामंडळाची तातडीच्या चर्चेची मागणी

अखिल महाराष्ट्र विश्वकर्मा सुतार समाज महासंघ आयोजित भव्य राज्यस्तरीय वधू वर पालक परिचय मेळावा

Pune : पुण्यात गुरूवारी या भागातील पाणीपुरवठा राहणार बंद