महाडीबीटी पोर्टल वरील राज्याच्या 'ई-वॉलेट' चे केंद्र शासनास सादरीकरण ;समाज कल्याण विभागाच्या कार्याची केंद्रीय सचिवांकडून दखल

जनलोक वार्ता न्यूज नेटवर्क 


पुणे, दि.२८: राज्यातील अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकातील विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती योजनेचा लाभ महाडीबीटी प्रणालीवर अर्ज केल्यानंतर सुरळीत होण्यासाठी राज्य शासनाच्या माहिती व तंत्रज्ञान विभागाने  विकसित केलेल्या ‘ई-वॉलेट’ चे सादरीकरण केंद्र शासनाच्या केंद्रीय सामाजिक न्याय व अधिकारिता  मंत्रालयासमोर करण्यात आले. आज दिल्ली येथे समाज कल्याण विभागाचे आयुक्त डॉ. प्रशांत नारनवरे यांनी हे सादरीकरण केले.


अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकातील विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती योजनेचा लाभ महाडीबीटी या प्रणालीवरून देण्यात येतो. सदर महाडीबीटी प्रणालीवर अर्ज केल्यानंतर शिष्यवृत्ती चा लाभ संबंधित विद्यार्थी व महाविद्यालयांना सुरळीत होण्याकरिता राज्य शासनाच्या माहिती व तंत्रज्ञान विभागाने  ‘ई-वॉलेट’ ही संकल्पना केंद्र शासनाच्या पी.एफ.एम.एस. द्वारे वितरण करण्याची प्रणाली विकसित केलेली आहे. 


2018-19 पासून या प्रणालीचा वापर करण्यात येऊन विद्यार्थ्यांच्या आधार संलग्न खात्यामध्ये त्यांच्या निर्वाह भत्त्याची रक्कम तसेच महाविद्यालयांना देय असलेली संबंधित विद्यार्थ्यांचे शिक्षण शुल्क व परीक्षा फी व इतर शुल्क थेट महाविद्यालयास या प्रणालीद्वारे वितरित करण्यात येते. या सुविधेचा सुमारे राज्यातील चार ते पाच लाख विद्यार्थ्यांना दरवर्षी फायदा होत असून शिष्यवृत्तीच्या योजनेमध्ये अधिक सुलभता व पारदर्शकता यामुळे निर्माण झाली आहे.


या ‘ई-वॉलेट’ प्रणालीची केंद्र शासनाच्या केंद्रीय सामाजिक न्याय व अधिकारिता  मंत्रालयाने दखल घेतली असून त्याबाबत माहिती जाणून घेतली आहे. केंद्रीय सचिव सौरभ गर्ग यांच्यासमोर आज समाज कल्याण आयुक्त डॉ. नारनवरे यांनी याबाबत सादरीकरण केले. 


या 'ई-वॉलेट' प्रणालीमुळे शिष्यवृत्तीचे कामकाज अधिक सुरळीत केल्याबद्दल केंद्रीय सामाजिक न्याय व अधिकारीता मंत्रालयातील अधिकाऱ्यांनी विभागाच्या कार्याचे कौतुक केले आहे. सदर बैठकीस केंद्र शासनाचे सामाजिक न्याय व अधिकारिता मंत्रालयाचे अधिकारी व राज्याच्या समाज कल्याण विभागाचे अधिकारी उपस्थित होते.


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सोलापूर जिल्यातील बाबुळगाव जातीयवाद्यांचा बौद्ध समाजाच्या कार्यकार्त्यावर हल्ला

अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाला रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (A) उपाध्यक्ष पुणे जिल्हा व खेड तालुका युवक अध्यक्षांचा पाठिंबा

वाल्हेकरवाडी येथे शिवभक्त प्रतिष्ठान आयोजित श्रीराम प्रतिमा पुजन व दिपोत्सव कार्यक्रम उत्साहात