राजर्षी छत्रपती शाहू महाराजांचा जन्मदिवस 'सामाजिक न्याय दिन' म्हणून साजरा होणार

जनलोक वार्ता न्यूज नेटवर्क 



पुणे, दि. २२ : राजर्षी छत्रपती शाहू महाराजांचा जन्मदिवस २६ जून हा "सामाजिक न्याय दिन" म्हणून साजरा करण्यात येतो. सामाजिक न्याय दिन अधिक लोकाभिमुख होण्याच्यादृष्टीने व जनतेमध्ये सामाजिक न्यायाच्या प्रती अधिक जागरूकता निर्माण व्हावी यादृष्टिने सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत विशेष उपक्रम राबविण्यात येणार आहेत, अशी माहिती समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त कैलास आढे यांनी दिली आहे. 


समाज कल्याण विभागामार्फत यावर्षीही  २६  जून रोजी अखिल भारतीय मराठा शिक्षण परिषदेचे श्री शाहू मंदीर महाविद्यालय पर्वती पायथा आणि राजीव गांधी अॅकेडमी ऑफ ई- लर्निंग स्कुल अँड सायन्स ज्युनिअर कॉलेज, अनुराग सोसायटी, शिवदर्शन पूरग्रस्त वसाहत, पर्वती पायथा पुणे येथून विद्यार्थ्यांच्या प्रभातफेरीचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाला  समाज कल्याण आयुक्त आणि जिल्हाधिकारी उपस्थित राहणार आहेत.   


सामाजिक न्याय दिनाच्या या कार्यक्रमाला  नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहवे, असे आवाहनही समाज कल्याण विभागामार्फत करण्यात आले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सोलापूर जिल्यातील बाबुळगाव जातीयवाद्यांचा बौद्ध समाजाच्या कार्यकार्त्यावर हल्ला

अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाला रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (A) उपाध्यक्ष पुणे जिल्हा व खेड तालुका युवक अध्यक्षांचा पाठिंबा

वाल्हेकरवाडी येथे शिवभक्त प्रतिष्ठान आयोजित श्रीराम प्रतिमा पुजन व दिपोत्सव कार्यक्रम उत्साहात