जुन्नर-आंबेगाव उपविभागात मंचर येथे ११ मे रोजी राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन

जनलोक वार्ता न्यूज नेटवर्क 


पुणे, दि. ८ : राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, नवी दिल्ली, महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण उच्च न्यायालय, मुंबई, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण आणि जिल्हाधिकारी पुणे यांच्या निर्देशानुसार  गुरुवारी ११ मे  रोजी जुन्नर-आंबेगाव उपविभागीय अधिकारी  यांच्या मंचर येथील कार्यालयात सकाळी ११ वाजता महसूल न्यायालयातील अर्धन्यायिक प्रकरणांसाठी विशेष लोक अदालतीचे आयोजन करण्यात आलेले आहे.


या विशेष लोक अदालतीसाठी संबंधित पक्षकारांना नोटीसा पाठविण्यात आल्या असून विशेष लोक अदालतीचे कामकाज व्यवस्थितरित्या पार पाडण्यासाठी अधिकारी-कर्मचाऱ्यांची एकूण ६ पथके तयार करण्यात आलेली आहेत.  


या विशेष लोक अदालतीत सन २०१३ ते २०२० या कालावधीतील प्रलंबित दावे मुख्यत्वे तडजोडीने निकाली काढण्याचा प्रयत्न केला जाईल. 


विशेष लोक अदालतीमध्ये पक्षकारांनी व त्यांच्या विधिज्ञांनी हजर राहून जास्तीत जास्त प्रकरणे तडजोडीने निकाली काढण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन गोविंद शिंदे उपविभागीय अधिकारी जुन्नर-आंबेगाव, उपविभाग, मंचर (पुणे) यांनी केले आहे.

                                

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

मोठी बातमी ..! राज्यातील सर्व शाळा 5 डिसेंबरला राहणार बंद, शिक्षण संस्था महामंडळाची तातडीच्या चर्चेची मागणी

अखिल महाराष्ट्र विश्वकर्मा सुतार समाज महासंघ आयोजित भव्य राज्यस्तरीय वधू वर पालक परिचय मेळावा

Pune : पुण्यात गुरूवारी या भागातील पाणीपुरवठा राहणार बंद