बाणेर-बालेवाडी योजनेचे १७ मे रोजी लोकार्पण करण्याच्या पालकमंत्र्यांच्या अधिकाऱ्यांना सूचना

 जनलोक वार्ता न्यूज नेटवर्क




     पुणे, दि. ८: समान पाणी पुरवठा योजनेअंतर्गत बाणेर-बालेवाडी भागातील नागरिकांचा पाण्याच्या सोडविण्यासाठी येत्या १७ मे रोजी योजनेचे पहिल्या टप्प्यातील पूर्ण झालेल्या कामाचे लोकार्पण करण्याचे निर्देश  पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी अधिकाऱ्यांना आढावा बैठकीत दिले.  


  शासकीय विश्रामगृह येथे आयोजित या बैठकीस  पुणे मनपा आयुक्त विक्रम कुमार, अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे, पाणी पुरवठा विभागाचे  मुख्य अभियंता अनिरुद्ध पावसकर, २४x७ योजनेचे अधीक्षक अभियंता नंदकिशोर जगताप आदी उपस्थित होते.


महापालिकेच्या माध्यमातून सुरू असलेली समान पाणीपुरवठा योजनेची कामे जलदगतीने पूर्ण करावीत. तसेच पाणी मोजणीसाठी मीटर लावावे, अशा सूचना पालकमंत्री श्री. पाटील  यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

मोठी बातमी ..! राज्यातील सर्व शाळा 5 डिसेंबरला राहणार बंद, शिक्षण संस्था महामंडळाची तातडीच्या चर्चेची मागणी

अखिल महाराष्ट्र विश्वकर्मा सुतार समाज महासंघ आयोजित भव्य राज्यस्तरीय वधू वर पालक परिचय मेळावा

Pune : पुण्यात गुरूवारी या भागातील पाणीपुरवठा राहणार बंद