शिराळ्यातील बायपास नाक्यावरील खाजगी बस थांब्यावर महिला प्रवाशांसाठी स्वच्छतागृह उभारा ; शिराळा तालुका प्रवासी संघाची मागणी

जनलोक वार्ता न्यूज नेटवर्क

प्रतिनिधी  / विशाल खुर्द



शिराळा येथली शासकीय तंत्रनिकेतन (ITI)- शिराळा बायपास येथील ट्रॅव्हल्सच्या थांब्यावर मुंबई- पुणेकर प्रवाशी, विशेषतः महिला प्रवाशी, लहान मुले यांच्याकरिता स्वच्छतागृहाची उभारणी करावी, तसेच स्वच्छतागृहाचे बांधकाम पूर्ण होईपर्यंत फिरते स्वच्छतागृह देण्यात यावे, या मागणीचे निवेदन शिराळा तालुका प्रवासी संघ, शिराळा-वाळवा (शिवा) युवक क्रांती आघाडी तर्फे शिराळा नगरपंचायत प्रशासनास देण्यात आले. सदर ठिकाणी स्वच्छतागृह नसल्याने महिला तसेच इतर प्रवाशांची मोठी गैरसोय होत असल्याने उघड्यावर लघुशंकेस जाण्याची दुर्दैवी वेळ येत आहे. यामुळे महिला सुरक्षा आणि सार्वजनिक स्वच्छतेचा प्रश्न निर्माण होत असल्याबाबत शिराळा तालुका प्रवासी संघाचे समन्वयक लालासाहेब शिंदे, बंटी नांगरे- पाटील, महादेव रोकडे, मानसिंग पाटील, बाळासाहेब पाटील, अमोल पाटील, महेश माने, मारुती रोकडे, कैलास देसाई यांनी नगरपंचायत प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सोलापूर जिल्यातील बाबुळगाव जातीयवाद्यांचा बौद्ध समाजाच्या कार्यकार्त्यावर हल्ला

अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाला रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (A) उपाध्यक्ष पुणे जिल्हा व खेड तालुका युवक अध्यक्षांचा पाठिंबा

वाल्हेकरवाडी येथे शिवभक्त प्रतिष्ठान आयोजित श्रीराम प्रतिमा पुजन व दिपोत्सव कार्यक्रम उत्साहात