पुणे जिल्हास्तरीय खेड येथील गुणवंत शिक्षक पुरस्काराने दत्ता भगत उत्तमराव खेसे विजय कानवडे व लतीफ शेख राजगुरू रत्न पुरस्काराने सन्मानित

जनलोक वार्ता न्यूज नेटवर्क

 प्रतिनिधी / विजय कानवडे 



पुणे, दि. १८,पुणे जिल्हास्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्कार व राजगुरुरत्न पुरस्कार खेड येथे रिद्धी सिद्धी मंगल कार्यालयात  करण्यात आला. गुणवंत शिक्षक पुरस्कार दत्ता भगत, उत्तमराव खेसे व विजय कानवडे यांना खेड तालुक्याचे लोकप्रिय आमदार दिलीप मोहिते पाटील यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आला. तसेच  लतीफ शेख यांना राजगुरू रत्न पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. वरील सर्व शिक्षक हे शैक्षणिक क्षेत्र, सामाजिक क्षेत्र यामध्ये प्रशंसनीय कार्य करत आहेत. हे शिक्षक शाळेच्या, विद्यार्थ्यांच्या आणि जनसेवेच्या कल्याणासाठी निस्वार्थीपणे अविरत कार्य करत असतात. या कार्याचा गौरव म्हणून खेड तालुक्याचे मुख्याध्यापक शिक्षक शिक्षकेतर संघाच्यावतीने पुरस्कार प्रदान करण्यात आला.

याप्रसंगी शिक्षक आमदार भगवान साळुंखे, पुणे जिल्हा अध्यक्ष निर्मलाताई पानसरे, पदवीधर आमदार गणपती लाड, जि.प. सदस्य शरद बुट्टे पाटील, जि. प. सदस्य अतुल भाऊ देशमुख, शिक्षक आमदार दत्तात्रय सावंत शिक्षणाधिकारी पुणे, सुनंदा वाखारे शिक्षणाधिकारी पिंपरी चिंचवड, मनपा संजय नाईकडे सचिव महाराष्ट्र राज्य परीक्षा विभाग पुणे, अशोक भोसले व खेड तालुका माध्यमिक मुख्याध्यापक शिक्षक व शिक्षक केंद्र संघाचे अध्यक्ष मधुकर नाईक कार्याध्यक्ष उत्तमराव पोटवडे व सचिव रामदास रेटवडे इत्यादी मान्यवर याप्रसंगी उपस्थित होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सोलापूर जिल्यातील बाबुळगाव जातीयवाद्यांचा बौद्ध समाजाच्या कार्यकार्त्यावर हल्ला

अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाला रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (A) उपाध्यक्ष पुणे जिल्हा व खेड तालुका युवक अध्यक्षांचा पाठिंबा

वाल्हेकरवाडी येथे शिवभक्त प्रतिष्ठान आयोजित श्रीराम प्रतिमा पुजन व दिपोत्सव कार्यक्रम उत्साहात