आव्हाट येथे आर्थिक साक्षरता अभियान संपन्न

जनलोक वार्ता न्यूज नेटवर्क

प्रतिनिधी / विकास शिंदे



खेड दि १६. एखाद्या व्यक्तीची वैयक्तिक आणी कौटुंबिक उदिष्टये उत्तम प्रकारे पुर्ण करण्यासाठी आर्थिक बाबींविषयी ज्ञान व कौशल्ये असणे म्हणजे आर्थिक साक्षरता होय .


वैयक्तीक आर्थिक व्यवस्थापन अंदाजपत्रक आणी गुंतवणुक यासह विविध आर्थिक कौशल्ये समजुन घेण्याची आणी प्रभावीपणे वापरण्याची क्षमता म्हणजे आर्थिक साक्षरता होय .


खेड तालुक्यातील आव्हाट ग्रामपंचायतीमध्ये राष्ट्रीय कृषी व ग्रामीण विकास बॅक ( नाबार्ड ) व पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅक मर्यादित पुणे शाखा वाडा आणी यशवंतराव चव्हाण सेंटर मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने आर्थिक साक्षरता अभियान घेण्यात आले .

वाडा शाखेचे ब्रॅच मॅनेजर श्री सुदाम केदारी ;विकास अधिकारी श्री रघुनाथ मुळुक ; एफ एल सी  तालुका समन्वयक अधिकारी श्रीमती फदाले मॅडम ;श्री सुरज सुर्यवंशी ;श्री अमोल विरणक यांनी उपस्थित राहून ; बॅकेच्या योजना ;कर्ज ;बचत खाते ;मुदत ठेवी ;विमा ;एटीएम सुविधा आणी बँकेचे ध्येय याबद्दल ग्रामस्थांना मार्गदर्शन केले .

सोसायटीचे चेअरमन शिवाजीशेठ वाळुंज ;श्री भैरवनाथ शिक्षण प्रसारक मंडळाचे उपाध्यक्ष श्री दत्ताशेठ वाळुंज ;माजी सरपंच हरिभाऊ तळपे ;नामदेव वाळुंज यांच्या हस्ते बॅक अधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला आणी दत्ताशेठ वाळुंज यांनी आभार मानले.


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

मोठी बातमी ..! राज्यातील सर्व शाळा 5 डिसेंबरला राहणार बंद, शिक्षण संस्था महामंडळाची तातडीच्या चर्चेची मागणी

अखिल महाराष्ट्र विश्वकर्मा सुतार समाज महासंघ आयोजित भव्य राज्यस्तरीय वधू वर पालक परिचय मेळावा

Pune : पुण्यात गुरूवारी या भागातील पाणीपुरवठा राहणार बंद