लम्पी रोगामुळे शेतकऱ्यांच्या नियोजनावर पाणी ; निमगाव खंडोबा भागात बैलांना पुरणपोळीचा घास घरीच भरवून सण साजरा

जनलोक वार्ता न्यूज नेटवर्क

प्रतिनिधी / दत्ता भगत



पुणे/खेड दि२६,  लम्पीच्या प्रादुर्भावामुळे बैल पोळ्याच्यानिमित्ताने बैलांच्या मिरवणुकीवर घातलेल्या बंदीमुळे खेड तालुक्यातील निमगाव खंडोबा येथील शेतकरी वर्गाने साध्य पध्दतीने बैल पोळा सण साजरा केला आहे. गेल्या काही दिवसापासुन पशुसंवर्धन खात्याने घातलेल्या निर्भबधनामुळे लम्पिचे संकट ओढवले आहे.

लसीकरण बऱ्यापैकी झालेले असले तरी खबरदारीचे उपाय म्हणून काही प्रमाणात निरबंध घालण्यात आले आहे. मिरवणुकीवरील बंदी याचाच एक भाग म्हणून साध्या आणि घरगुती पध्दतीने बैल पोळा सण साजरा करण्यात आला. दत्ता भगत यांनी अगदीच साध्या पध्दतीने राहत्या घरी बैल सजवले,अगदी ढोल,ताशा,लेझीम वगैरे सर्व नियोजन केले होते पण ते सर्व बारगले कारण पशुसंवर्धन खात्याचे सर्व नियमांचे पालन केले. या मुळे आम्ही बैलांना धून,शिगंना रंग,बेगाडे ,गळ्यात विविध फुलांचे हार बांधून  घरातील महिला भगिनींनी पूजन करून पुरण पोळीचा घास भरविला आणि शेतकरी वर्गाला यावरच समाधान मानावे लागले. 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सोलापूर जिल्यातील बाबुळगाव जातीयवाद्यांचा बौद्ध समाजाच्या कार्यकार्त्यावर हल्ला

अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाला रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (A) उपाध्यक्ष पुणे जिल्हा व खेड तालुका युवक अध्यक्षांचा पाठिंबा

वाल्हेकरवाडी येथे शिवभक्त प्रतिष्ठान आयोजित श्रीराम प्रतिमा पुजन व दिपोत्सव कार्यक्रम उत्साहात