नाविंदगी जिल्हा परिषद शाळांना खेळाचे मैदान उपलब्ध करून देण्याबाबत शाळा व गावकऱ्यांकडून ग्रामपंचायतीला निवेदन
जनलोक वार्ता न्यूज नेटवर्क
अक्कलकोट प्रतिनिधी दि, १९. अक्कलकोट तालुक्यातील नाविंदगी येथील जिल्हा परिषद शाळेला विद्यार्थ्यांना खेळण्यासाठी मैदानच नसल्याने येथील विद्यार्थी शारीरिक व मानसिक तणावाला बळी पडत आहेत.
नाविंदगीत सध्या मराठी, कन्नड आणि उर्दू या तिन्ही माध्यमांच्या शाळा आहेत मात्र यामध्ये एकाही शाळेला खेळाचे मैदाने नाही. त्यामुळे याबाबत तिनही माध्यमांच्या शाळेंनी वारंवार ग्रामपंचायतीला निवेदन देवूनही ग्रामपंचायतीने याकडे दुर्लक्ष केल्याने आज पुन्हा गावकऱ्यांकडूनही निवेदन देण्यात आले आहे. त्यासोबत शाळांच्या शौचालये, पाणी , कंम्पाऊंड आणि इतर समस्यांविषयी चे निवेदन देण्यात आले.
दरम्यान, गावच्या सरपंचांनी या निवेदनाचे समर्थन करत काम करण्यासाठी सकारात्मकता दाखविली असून लवकरच आपण विद्यार्थ्यांसाठी खेळाचे मैदान उपलब्ध करून देऊ असे आश्वासन दिले आहे. यावेळी गावचे सरपंच, उपसरपंच, ग्रामसेवक, श्रिकांत पांतारे, पुंडलिक तडलगी, , मल्लिकार्जुन नाविंदगीकर, दयानंद गौडगांव, चंद्रकांत हाळतोट आदी गावकरी उपस्थित होते.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा