पोस्ट्स

खत खरेदीवेळी जातीचा उल्लेख वगळण्याबाबत केंद्र सरकारला विनंती करणार - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

  जनलोक वार्ता न्यूज नेटवर्क                मुंबई ,  दि. 10 : खत खरेदी करताना पीओएस मशीनमधील जातीचा उल्लेख वगळण्याबाबत केंद्र शासनाला विनंती करण्यात येईल ,  अशी माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत दिली.             यासंदर्भात विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी उपस्थित केलेल्या मुद्द्यावर मुख्यमंत्री बोलत होते.             सांगली जिल्ह्यात शेतकरी रासायनिक खत खरेदी करत असताना ऑनलाईन माहिती भरली जात आहे. यामध्ये जातीचा उल्लेख आहे हे डीबीटी पोर्टल केंद्र शासनाचे असून जातीचा  उल्लेख  वगळण्याबाबत केंद्र शासनाकडे विनंती करण्यात येईल ,  असेही मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी विधानसभेत सांगितले.

प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेतील रस्ते सिमेंटचे करणार- मंत्री गिरीश महाजन

  जनलोक वार्ता न्यूज नेटवर्क                मुंबई, दि. 10 : राज्यातील ग्रामीण भागातील रस्त्यांची दर्जोन्नती करण्यासाठी प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेंतर्गत येणारे रस्ते सिमेंटचे करण्यात येणार असल्याचे ग्राम विकास आणि पंचायत राज मंत्री गिरीश महाजन यांनी विधानसभेत सांगितले.             विधानसभा सदस्य सुनील राणे यांनी प्रधानमंत्री ग्रामसडक योजना व मुख्यमंत्री ग्रामसडक योजने अंतर्गत केलेल्या कामांचे कंत्राटदारांकडून वस्तू व सेवाकराची रक्कम कपात न केल्याबाबतचा प्रश्न उपस्थित केला होता.             मंत्री श्री.महाजन म्हणाले की ,  प्रधानमंत्री ग्रामसडक योजना तसेच मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेंतर्गत होणाऱ्या कामाबाबत संबंधित कंत्राटदाराचे अंतिम देयक अदा करताना नियमानुसार वस्तू व सेवाकराची कपात करून कंत्राटदाराला देयके अदा केली जातात. कंत्राटदारांना काम देण्याअगोदर त्यांची बीड कॅपॅसिटी किती आहे हे तपासली जाते.  ...

चारचाकींसाठी लवकरच नवीन मालिका

  जनलोक वार्ता न्यूज नेटवर्क  पुणे दि.९: उप प्रादेशिक परिवहन कार्यालय पिंपरी-चिंचवडमार्फत खासगी चारचाकी वाहनांसाठी सुरु होणाऱ्या 'केएस' या मालिकेतील आकर्षक नोंदणी क्रमांक शुल्क भरुन राखून ठेवण्याकरिता आगाऊ अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. नवीन सुरू होणाऱ्या मालिकेतील आकर्षक तसेच पसंतीचा क्रमांक विहित शुल्क भरुन हवा असल्यास त्यासाठी विहित नमुन्यात अर्ज करणे आवश्यक आहे. हा अर्ज आणि धनाकर्ष (डीडी) ९ मार्च २०२३ रोजी सकाळी ११ ते दुपारी २.३०  दरम्यान कार्यालयाच्या नवीन वाहन नोंदणी विभागात पत्त्याचा पुरावा, आधारकार्ड, ओळखपत्र, पॅनकार्डच्या साक्षांकित प्रतीसह स्वतः जमा करणे आवश्यक राहील. एकाच क्रमांकाकरिता एकापेक्षा जास्त अर्ज आल्यास त्यांची यादी  १० मार्च २०२३ रोजी कार्यालयीन सूचनाफलकावर लावण्यात येईल. या यादीतील अर्जदारांनी लिलावासाठी जास्त रक्कमेचा एकच धनाकर्ष (डीडी) १० मार्च २०२३ रोजी दुपारी २.३० वाजेपर्यंत सीलबंद लिफाफ्यात घालून कार्यालयात जमा करावा. धनाकर्ष ‘डीवाय. आर.टी.ओ. पिंपरी-चिंचवड’ या नावाने राष्ट्रीयकृत किंवा अनुसूचित बँकेचा पुणे येथील असावा. त्याच दिवशी दु...

जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेवर अशासकीय सदस्य निवडीसाठी अर्ज करण्याचे आवाहन

  जनलोक वार्ता न्यूज नेटवर्क  पुणे, दि. ९  : जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेवर अशासकीय सदस्य म्हणून नियुक्तीसाठी इच्छुक संस्थांचे प्रतिनिधी व व्यक्तींनी ११ एप्रिल पर्यंत विहित नमुन्यात आवश्यक त्या कागदपत्रांसह अर्ज करण्याचे आवाहन पुणे जिल्हा पुरवठा अधिकारी सुरेखा माने यांनी केले आहे.  जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेवर २८ अशासकीय सदस्यांची तीन वर्षासाठी नियुक्ती करण्यात येणार आहे. महानगरपालिका सदस्य, पंचायत समिती सदस्य, कृषी उत्पन्न बाजार समिती सदस्य, ग्राहक संघटना सदस्य, शाळा/महाविद्यालयातील सदस्य, वैद्यकीय व्यवसायिक, व्यापार व उद्योग क्षेत्र, पेट्रोल व गॅस विक्रेते, शेतकरी यामधून सदस्यांची निवड करण्यात येणार आहे.  विहित नमुन्यातील अर्ज तसेच अटी, शर्ती व निकषांच्या अधिक माहितीसाठी जिल्हाधिकारी कार्यालय (पुरवठा शाखा) येथे संपर्क साधावा, असेही जिल्हा पुरवठा अधिकारी यांनी कळविले आहे.

वैध मापन शास्त्र यंत्रणेच्या कारवाईत ६१९ आस्थापनांकडून ३२ लाख रुपये दंडवसुली

जनलोक वार्ता न्यूज नेटवर्क  पुणे, दि. ९:  अन्न व नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाअंतर्गत वैध मापन शास्त्र यंत्रणेकडून २०२२-२३ या वर्षामध्ये फेब्रुवारी २०२३ अखेर वैध मापन शास्त्र नियमांचा भंग केल्याबद्दल जिल्ह्यातील विविध ६१९ आस्थापनांवर दंडात्मक कारवाईद्वारे ३२ लाख ६० हजार ७०० रूपये इतके प्रशमन शुल्क शासनास जमा करण्यात आले आहे.  नुकतीच वैध मापन शास्त्र यंत्रणेकडून चिकन, मटन विक्रेते आस्थापनांची विशेष तपासणी मोहिम राबविण्यात आली. यामध्ये १०० आस्थापनांची तपासणी करुन दोषी आढळलेल्या ६० आस्थापनांवर खटले दाखल करण्यासह दंडात्मक कारवाई केली आहे.   आवेष्टित वस्तुंवर नियमानुसार घोषवाक्ये नसणे, मूळ छापील किंमत खाडाखोड करणे, छापील किंमतीपेक्षा जादा दराने वस्तू विक्री करणे, गॅस सिलींडर वितरीत करणाऱ्या डिलीव्हरी बॉयकडे वजन काटा उपलब्ध नसणे अशा पद्धतीचे उल्लंघन आढळल्यास विक्रेत्यांवर कारवाई केली जाते. ग्राहकांना विविध विक्रेत्यांकडून वस्तू खरेदी करताना नियमांचे उल्लंघन आढळून आल्यास त्यांनी नियंत्रक कक्ष दूरध्वनी क्रमांक ०२२-२२६२२०२२, ०२०-२६१३७११४ व  व्हॉट्सॲप क्रमांक ...

आठवे राष्ट्रीय छायाचित्रण पुरस्कार प्रदान ; महाराष्ट्राच्या तीन छायाचित्रकारांना पुरस्कार

इमेज
  जनलोक वार्ता न्यूज नेटवर्क  नवी दिल्ली, दि. 8 मार्च : उत्कृष्ट छायाचित्रणासाठी  महाराष्ट्रातील तीन छायाचित्रकारांना राष्ट्रीय छायाचित्रण पुरस्काराने केंद्रीय माहिती प्रसारण राज्यमंत्री डॉ. एल. मुरूगन यांच्याहस्ते पुरस्कार प्रदान करून गौरविण्यात आले.  येथील राष्ट्रीय माध्यम केंद्रात मंगळवारी केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्रालयाच्यावतीने आठव्या राष्ट्रीय छायाचित्रण पुरस्कारांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. यावेळी केंद्रीय राज्यमंत्री डॉ. एल. मुरूगन, माहिती व प्रसारण मंत्रालयाचे सचिव अपूर्व चंद्र, परिक्षक मंडळाचे अध्यक्ष विजय क्रांती उपस्थित होते. कार्यक्रमात वेगवेगळया श्रेणीतील उत्कृष्ट छायाचित्रणांसाठी 13 छायाचित्रकांराना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. यामध्ये महाराष्ट्रातील तीन छायाचित्रकारांचा समावेश आहे. कार्यक्रमस्थळी केंद्रीय राज्य मंत्र्यांच्या हस्ते  छायाचित्र प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी मान्यवरांच्या हस्ते विशेष माहिती पुस्तिकेचे प्रकाशनही करण्यात आले. व्यावसायिक छायाचित्रकार श्रेणीतील ‘विशेष उल्लेख’ हा पुरस्कार पुण्यातील दिपज्योती बनिक...

महिला दिनानिमित्त बचत गट सदस्यांसाठी प्रशिक्षणाचे आयोजन

इमेज
  जनलोक वार्ता न्यूज नेटवर्क  पुणे, दि. 8:- भारतीय राष्ट्रीय सहकारी संघ, नवी दिल्ली आणि महाराष्ट्र राज्य सहकारी संघ मर्या. पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या निमित्ताने पद्मभूषण वसंतदादा पाटील सभागृह येथे नागरी सहकारी बँका,पतसंस्थेच्या महिला संचालिका, सभासद व स्वयंसहाय्यता महिला बचत गटातील महिलाकरीता एक दिवसीय महिला प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.  कार्यक्रमाला माजी महापौर कमल व्यवहारे, माहिती उपसंचालक डॉ.पुरुषोत्तम पाटोदकर, महाराष्ट्र राज्य सहकारी संघाच्या मानद सचिव विद्या पाटील, शिक्षण-प्रशिक्षण मुख्याधिकारी एम.डी. भोईर, सहकारी संस्था सहनिबंधक तथा मुख्य कार्यकारी अधिकारी सोनाली रावल-ठाकुर, सहकारी संस्था पुणे ग्रामीणचे जिल्हा उपनिबंधक प्रकाश जगताप आदी उपस्थित होते. आंतराष्ट्रीय महिला दिनानिमित्त शुभेच्छा देवून श्रीमती व्यवहारे म्हणाला, सहकार क्षेत्रात महिलांना स्थान देण्यात आल्यामुळे त्यांना प्रतिनिधीत्व करण्याची संधी मिळाली. सहकार क्षेत्रात महिलांनी चांगली कामगिरी केली आहे. महाराष्ट्र राज्य सहकारी संघ सर्व सहकारी संस्थाची शिखर संस्था म...