पोस्ट्स

मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर १ डिसेंबरपासून रस्ता ‘सुरक्षा’ उपक्रम

जनलोक वार्ता न्यूज नेटवर्क पुणे, दि. ३०:  मुंबई-पुणे द्रुतगती नवीन व जुन्या महामार्गावर अपघाताचे प्रमाण कमी करणे, वाहन चालकांमध्ये शिस्त निर्माण व्हावी यासाठी १ डिसेंबर पासून पुढील ६ महिन्यांसाठी २४ तास ‘सुरक्षा’ या रस्ता सुरक्षा जनजागृती व अंमलबजावणी उपक्रमाचे आयोजन परिवहन विभागामार्फत करण्यात येत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत १७ ऑक्टोबर २०२२ रोजी झालेल्या बैठकीत रस्त्यावरील जीवीत व वित्त हानी टाळण्यासाठी विविध उपाययोजना अंमलात आणण्यासाठी सर्व संबंधित विभागांना आदेश देण्यात आले होते. मुंबई-पुणे द्रुतगती महामार्ग तसेच जुना महामार्गावर अपघाताचे प्रमाण कमी करणे व वाहन चालकांमध्ये शिस्त निर्माण होण्याकरीता दीर्घकालीन जनजागृती व अंमलबजावणी करण्याचे आदेश यावेळी देण्यात आले होते. त्यानुसार परिवहन विभागाने ‘सुरक्षा’ हा उपक्रम हाती घेतला आहे. या उपक्रमासाठी मोटार वाहन विभागातील मुंबई, पुणे, पनवेल, पिंपरी चिंचवड या प्रादेशिक परिवहन कार्यालयातील अधिकाऱ्यांची एकूण १२ पथकांची निर्मिती करण्यात आलेली असून त्या प्रत्येक...

'अधिकार व कर्तव्ये' या विषयावर संविधान विषयक व्याख्यान संपन्न

जनलोक वार्ता न्यूज नेटवर्क पुणे, दि. ३०:  सामाजिक न्याय विभागातर्फे २६ नोव्हेंबर ते ६ डिसेंबर २०२२ या कालावधीत 'सामाजिक न्याय पर्व' म्हणून साजरा करण्यात येत असून या कार्यक्रमांतर्गत सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, पुणे कार्यालयामार्फत 'अधिकार व कर्तव्ये' या विषयावर संविधान विषयक व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी पुणे विद्यार्थी गृहाचे कार्यवाह प्राध्यापक राजेंद्र कांबळे यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी केलेल्या विविध चळवळींवर भाष्य करून डॉ.बाबासाहेब आंबेडकर आणि संविधान या व्यापक विषयावर माहितीपर मार्गदर्शन केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे सामाजिक कार्य व त्यांनी वंचित घटकांसाठी केलेल्या विविध चळवळी याबाबत सखोल माहिती दिली. सत्यशोधक ढोक यांनी महात्मा ज्योतिबा फुले यांच्या प्रेरणेतून ‘सत्यशोधक विवाह’ संस्थेमार्फत राबविण्यात येणारे विविध उपक्रमांची माहिती देत त्यांनी सत्यशोधक विवाह संस्था व महात्मा ज्योतिबा फुले यांचे विचार यावर प्रकाश टाकला. समाजातील युवक-युवतींनी सत्यशोधक पद्धतीने विवाह करण्याचे आवाहन केले. सत्यशोधक पद्धतीने लावण्यात येणारे विवाह मोफत करण्यात ये...

पिंपरी-चिंचवड येथील मागासवर्गीय मुलींचे शासकीय वसतिगृहात प्रवेश प्रकियेला सुरुवात

जनलोक वार्ता न्यूज नेटवर्क पुणे, दि. ३०: पिंपरी-चिंचवड सेक्टर ४ येथील मागासवर्गीय मुलींचे शासकीय येथे  विनामूल्य प्रवेश देण्याची प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे.   २०२२-२३ या शैक्षणिक वर्षाकरीता अनुसूचित जाती, अनाथ आदी प्रवर्गातील पुणे-पिंपरी-चिंचवड, मोशी प्राधिकरण परिसरातील शैक्षणिक संस्थांमध्ये इयत्ता ११ वी आणि व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या पहिल्या वर्षात प्रवेश घेतलेल्या बाहेरगावच्या विद्यार्थीनींनी अर्ज भरण्याकरिता वसतिगृहात जावून नोंद करावी.   या वसतिगृहामध्ये प्रवेशितांना विनामूल्य निवास व भोजन, पुस्तके, स्टेशनरी आदीकरीता शासनाने ठरवून दिलेल्या दराची रक्कम, दरमहा निर्वाह भत्ता ९०० रुपये विद्यार्थ्याच्या आधार संलग्न बचत खात्यावर जमा करण्यात येते.   विद्यार्थीनी बाहेरगावची परंतु पुणे, पिंपरी-चिंचवड, मोशी प्राधिकरण येथील महाविद्यालयात शिक्षण घेणारी असावी. प्रवेशासाठी मागील वर्षात उत्तीर्ण झाल्याबाबतची गुणपत्रिका,  प्राधिकृत अधिकाऱ्याच्या स्वाक्षरीचे जात प्रमाणपत्र, वडिलांचे उत्पन्न प्रमाणपत्र, अधिवास प्रमाणपत्र, चालू महिन्याचे महाविद्यालयाचे बोनाफाईड प्रमाणपत्र, ...

बैलगाडा शर्यतींना पशुधन विकास अधिकाऱ्यांच्या अभिप्रायानंतर परवानगी देण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश

जनलोक वार्ता न्यूज नेटवर्क  पुणे, दि. ३०: राज्य शासनाने प्राण्यांमधील संक्रामक व सांसर्गिक रोगास प्रतिबंध व नियंत्रण अधिनियम २००९ मध्ये सुधारणेची अधिसूचना  जारी केली आहे. त्या अनुषंगाने जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी जिल्ह्यातील उपविभागीय अधिकाऱ्यांनी त्यांच्या उपविभागाच्या कार्यक्षेत्रामध्ये  लम्पी चर्मरोगाच्या अनुषंगाने संबंधीत तालुक्यातील पंचायत समितीच्या पशुधन विकास अधिकारी (विस्तार) यांच्याकडील अभिप्राय प्राप्त झाल्यानंतरच बैलगाड्यांच्या शर्यतीस परवानगी देण्याबाबत कार्यवाही करण्याचे निर्देश दिले आहेत. प्राण्यांमधील संक्रामक व सांसर्गिक रोगास प्रतिबंध व नियंत्रण अधिनियम २००९ मध्ये सुधारणेची अधिसूचना राज्य शासनाच्या कृषी, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास व मत्सयव्यवसाय विभागाने काल जारी केली आहे. त्यानुसार जिल्हाधिकारी हे जिल्ह्यातील लम्पी चर्मरोगाचा आढावा घेतल्यानंतर नियंत्रित क्षेत्रात कोणताही प्राणी बाजार भरवणे आणि प्राण्यांच्या शर्यती लावण्यास परवानगी देऊ शकतात असे नमूद करण्यात आले आहे. जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी जिल्ह्यातील उपविभागीय अधिकाऱ्यांना त्यां...

ऊस वाहतूक करणाऱ्या वाहन मालक चालकांना आवाहन

  जनलोक वार्ता न्यूज नेटवर्क पुणे, दि. ३०: राज्यात साखर कारखान्यांचा गळीत हंगाम सुरू झालेला असून शेतकऱ्यांच्या शेतापासून ते साखर कारखान्यांपर्यंत ऊसाची वाहतूक करणाऱ्या ट्रक, ट्रॅक्टर- ट्रेलर, बैलगाडी मालक व चालकांनी सुरक्षिततेच्यादृष्टीने खबरदारीचा उपाय करण्याचे आवाहन करण्यात येत आहे.  ऊस वाहतुकीची ट्रक, ट्रॅक्टर- ट्रेलर, बैलगाडी अशी वाहने इतर वाहनांच्या तुलनेत अत्यंत कमी वेगाने प्रवास करीत असतात. प्रवास करताना किंवा उभे असताना दृष्यमान नसल्यास रस्त्याने प्रवास करणाऱ्या इतर वाहनांना त्यांचा अंदाज येत नाही. त्यामुळे ब्रेकींग डिस्टन्स व स्टॉपिंग डिस्टन्स यांचा मेळ न बसल्यामुळे ट्रेलरला मागून धडक बसून अपघात होते. हे टाळण्यासाठी वाहन मालक चालकांनी काही महत्त्वपूर्ण उपाययोजना करणे आवश्यक आहे. सुरक्षिततेच्यादृष्टीने या वाहनांना पुढे व मागे रिफ्लेक्टिंग टेप लावावे. एकापेक्षा जास्त ट्रेलर जोडून उसाची वाहतूक करु नये. वाहनांचा वेग योग्य मर्यादेत ठेवणे, मागील वाहने पाहण्यासाठी आरसे लावणे, मोठ्या आवाजामध्ये वाहनामध्ये म्युझिक सिस्टिम लावू नये, चुकीच्या पद्धतीने ओव्हरटेक करु नये.  वाह...

जिल्हास्तरीय युवा गट कार्यशाळेचे १ डिसेंबर रोजी आयोजन

जनलोक वार्ता न्यूज नेटवर्क पुणे, दि. ३०: पुणे जिल्ह्यातील अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकातील युवा गटांसाठी सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण पुणे कार्यालय आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी) यांच्या संयुक्त विद्यमाने ‘जिल्हास्तरीय युवा गटांची कार्यशाळा’ तसेच स्टँड अप इंडिया योजनेंतर्गत ‘उद्योजकता विकास’ या कार्यक्रमांचे आयोजन १ डिसेंबर २०२२ रोजी सकाळी ११ वाजता आयोजन करण्यात आले आहे.    सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, पुणे कार्यालय डॉ. बाबासाहेब आंबेडकर, सामाजिक न्याय भवन, विश्रांतवाडी रोड, पोलिस स्टेशनसोर, येरवडा येथील सांस्कृतिक सभागृहामध्ये आयोजित  कार्यशाळेत जिल्हयातील अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकातील युवा गटांनी सहभागी होण्याचे आवाहन समाज कल्याण सहाय्यक आयुक्त श्रीमती संगीता डावखर यांनी केले आहे.

दिव्यांग सक्षमीकरणात राज्याला सात राष्ट्रीय पुरस्कार

जनलोक वार्ता न्यूज नेटवर्क               मुंबई, दि. 24 : दिव्यांग सक्षमीकरणात महाराष्ट्र राज्याने तब्बल सात पुरस्कार पटकावले आहेत. ‘सुगम्य भारत अभियान’ ची अंमलबजावणी करणारे सर्वश्रेष्ठ राज्य हा पुरस्कार दिव्यांग कल्याण आयुक्तालय, पुणे यांना घोषित झाला आहे. सन 2021 व 2022 या दोन वर्षांचे हे पुरस्कार असून केंद्र शासनाच्या सामाजिक न्याय व अधिकारिता मंत्रालय अंतर्गत दिव्यांगजन सशक्तीकरण विभागाच्या वतीने ऑनलाईन माध्यमातून अर्ज मागविले होते.             सन 2021 मध्ये श्री. अशोक तुकाराम भोईर, ठाणे (सर्वश्रेष्ठ दिव्यांग व्यक्ती), श्रीमती विमल पोपट गव्हाणे, पुणे (श्रेष्ठ दिव्यांग व्यक्ती), डॉ. शुभम रामनारायण धूत, पुणे (श्रेष्ठ दिव्यांग व्यक्ती), जिल्हा परिषद, अकोला (दिव्यांग अधिकार कायदा/ वैश्विक ओळखपत्र प्रणाली तथा दिव्यांग व्यक्तींसाठीच्या योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी करणारा जिल्हा) तसेच सन 2022 मध्ये श्री. जयसिंग कृष्णाराव चव्हाण, नागपूर (सर्वश्रेष्ठ दिव्यांग व्यक्ती) महात्मा गांधी सेवा संघ, औरंगाबाद (दिव्यांग व्यक्तीच्या सक्ष...