पोस्ट्स

महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत प्रोत्साहनपर लाभासाठी पात्र शेतकऱ्यांची यादी जाहीर- सहकार मंत्री अतुल सावे

जनलोक वार्ता न्यूज नेटवर्क             मुंबई, दि. 13 : सन २०१७ ते २०२० या कालावधीत पीक कर्जाची नियमीत परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजारांपर्यंत प्रोत्साहनपर लाभ देण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. पात्र शेतकऱ्यांची यादी आज जाहीर करण्यात आल्याची माहिती सहकार मंत्री अतुल सावे यांनी दिली.             ही यादी संबंधित बँक शाखा, विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था, ग्रामपंचायत कार्यालय इत्यादी ठिकाणी सूचना फलकावर प्रसिद्ध करण्यात आली आहे.              या यादीतील शेतकऱ्यांनी आपले आधार कार्ड, कर्जखाते पासबुक व बचतखाते पासबुक घेऊन नजीकच्या ‘आपले सरकार सेवा केंद्र’ किंवा बँकेच्या शाखेत जाऊन आधार प्रमाणीकरण करुन घ्यावे, असे आवाहन श्री. सावे यांनी केले.             सन २०१७ - १८, २०१८ - १९ व २०१९ - २० या तीन आर्थिक वर्षापैकी कोणत्याही दोन आर्थिक वर्षांमध्ये पीक कर्जाची उचल करुन शासन निर्णयामध्ये नमूद केलेल्या विहित कालावधीत परतफेड केलेली आहे. अशा शेतकऱ्यांना शासनाकडून 50...

महाराष्ट्र स्टार्टअप अंतर्गत जिल्हास्तरीय प्रशिक्षण शिबीराचे आयोजन

जनलोक वार्ता न्यूज नेटवर्क पुणे, दि. १३: जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्यावतीने शुक्रवार १४ ऑक्टोबर रोजी सकाळी ९ ते संध्याकाळी ६ वाजेपर्यंत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ येथे महाराष्ट्र स्टार्टअप यात्रेअंतर्गत दुसऱ्या टप्प्यातील जिल्हास्तरीय प्रशिक्षण शिबीर व सादरीकरण सत्राचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबीरात नाविन्यपूर्ण व्यवसाय संकल्पना असणाऱ्या आणि नवउद्योजक होवू इच्छिणाऱ्या नागरिकांनी प्रशिक्षण शिबीर व संकल्पना सादरीकरणासाठी उपस्थित रहावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी केले केले आहे. जिल्हास्तरीय प्रशिक्षण शिबीरात नाविन्यता तथा उद्योजकतेबाबतचे माहिती सत्र, स्थानिक उद्योजकांची व्याख्याने, तज्ज्ञ मार्गदर्शक व सल्लागारांची सत्रे, नोंदणी केलेल्या नवउद्योजकांच्या संकल्पनांचे सादरीकरण सत्र आयोजित करण्यात येणार आहे.  सादरीकरण सत्रात नोंदणी केलेल्या नागरिकांना स्थानिक समस्येसाठी उत्तम उपाय व कृषी, शिक्षण, आरोग्य, सस्टेनिबिलिटी (कचराव्यवस्थापन, पाणी, स्वच्छ उर्जा आदी), ई-प्रशासन, स्मार्ट पायाभुत सुविधा व गतिशीलता आणि अन्य या क्षेत्रातील आपल...

जल जीवन मिशन अंतर्गतची कामे वेळेत पूर्ण करा -जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख

  जनलोक वार्ता न्यूज नेटवर्क पुणे, दि. १३:  ग्रामीण भागात पाणी टंचाईवर मात करण्यासाठी व तेथील जीवनमान उंचावण्यासाठी जल जीवन मिशन राबविण्यात येत असून या मोहिमेअंतर्गत करण्यात येणारी कामे वेळेत व गुणवत्तापूर्ण करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी दिल्या. जिल्हाधिकारी कार्यालय येथे आयोजित जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन समितीच्या बैठकीच्या वेळी ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या संचालक शालिनी कडू, ग्रामीण पाणी पुरवठा बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता प्रकाश खताळ  उपस्थित होते. जिल्हाधिकारी डॉ. देशमुख म्हणाले, प्रत्येक गावामध्ये पेयजलाचा नियमित पुरवठा होण्यासाठी आराखड्यात नमूद केलेल्या उपाययोजनेची विहित वेळेत अंमलबजावणी करावी. जल जीवन मिशन (हर घर जल) अंतर्गत सुरु असलेली प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करावीत. कामाच्या प्रगतीबाबत आठवडानिहाय बैठकीचे आयोजन करावे. प्रलंबित शासकीय जागांबाबतचे प्रस्ताव जिल्हा परिषदेमार्फत जिल्हाधिकारी कार्यालयाकडे मंजूरीसाठी पाठवावे. कामे पूर्ण करताना पाणी व कामाच्या ग...

राज्यात सप्टेंबरमध्ये १३ हजार बेरोजगारांना रोजगार- कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा

  जनलोक वार्ता न्यूज नेटवर्क                मुंबई, दि. १३ : कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता विभागामार्फत राबविण्यात येत असलेल्या विविध उपक्रमांद्वारे राज्यात विविध कंपन्या, कॉर्पोरेट संस्था, उद्योग यांमध्ये सप्टेंबर २०२२  मध्ये १३ हजार ०२४ बेरोजगार उमेदवारांना रोजगार मिळवून देण्यात आला असल्याची माहिती कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी दिली. महास्वयं वेबपोर्टल, ऑनलाईन रोजगार मेळावे आदी विविध उपक्रमांद्वारे राज्यात नोकरीइच्छूक उमेदवार आणि विविध कंपन्या, कॉर्पोरेट संस्था, उद्योग यांची सांगड घालून रोजगार उपलब्ध करुन देण्यात येतो, असे त्यांनी सांगितले.             मंत्री श्री. लोढा म्हणाले, ‘बेरोजगार उमेदवार आणि उद्योजक यांच्यामध्ये सांगड घालण्यासाठी कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता विभागाने https://rojgar.mahaswayam.gov.in हे वेबपोर्टल सुरु केले आहे. या वेबपोर्टलवर बेरोजगार उमेदवार आपले शिक्षण, कौशल्ये, अनुभव आदी माहीतीसह नोंदणी करतात. त्याचबरोबर कुशल उमेदवारांच्या शोधात असलेल्या कंपन्या,...

कोविडमुळे अनाथ झालेल्या विद्यार्थ्यांच्या“पूर्णशुल्क माफी” निर्णयाची अंमलबजावणी करावी- उच्च व तंत्र शिक्षण मंत्री यांचे निर्देश

जनलोक वार्ता न्यूज नेटवर्क             मुंबई दि. 13 : कोविड काळात ज्या विद्यार्थ्यांचे आई, वडील, पालकांचा मृत्यू झाला आहे, अशा विद्यार्थ्यांचे पदवी/पदव्युत्तर शिक्षण अर्धवट राहू नये किंवा ते विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू नयेत, यासाठी त्यांचे शिक्षण पूर्ण होईपर्यंत त्यांची संपूर्ण फी माफ करण्याचा निर्णय शासनाने घेतला होता. त्या निर्णयाची यावर्षीही काटेकोरपणे अमलबजावणी करण्यात यावी, अशा सूचना शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिले.              विद्यार्थी हीत लक्षात घेता अशा विद्यार्थ्यांच्या शिक्षणामध्ये खंड पडू नये, किंवा त्याचे शैक्षणिक नुकसान होऊ नये, यासाठी  विद्यापीठ, अनुदानित महाविद्यालय यांनी याकडे विशेष लक्ष द्यावे, असेही उच्च शिक्षण मंत्री श्री. पाटील यांनी सांगितले.

मराठा समाजाच्या सामाजिक शैक्षणिक व आर्थिक विकासासाठी गठीत मंत्रिमंडळ उपसमितीची पहिली बैठक संपन्न

इमेज
जनलोक वार्ता न्यूज नेटवर्क प्रतिनिधी  / राजू शिंगाडे   मुंबई, दि. ११ : मराठा समाजाच्या सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक विकासासोबतच मराठा आरक्षण आणि सुविधांसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नियुक्त केलेल्या मंत्रिमंडळ उपसमितीची पहिली बैठक आज समितीचे अध्यक्ष उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झाली.  मंत्रालयात झालेल्या या बैठकीला महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, ग्रामविकास व वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन, बंदरे व खनिकर्म मंत्री दादा भुसे, उद्योग मंत्री उदय सामंत, राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई, महसूल विभागाचे अपर मुख्य सचिव नितीन करीर, गृह विभागाचे अपर मुख्य सचिव आनंद लिमये, उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे प्रधान सचिव विकास चंद्र रस्तोगी,सामान्य प्रशासन विभागाचे  सचिव सुमंत भांगे आदी उपस्थित होते.  मराठा आरक्षण आणि सुविधा याबाबत शासन सकारात्मक असून प्रत्येक जिल्ह्यात ५० मुले आणि ५० मुली असे १०० विद्यार्थ्यांचे वसतीगृह सुरू करण्यात येणार आहे. ज्या जिल्ह्यात ही वसतीगृह तयार आहेत किंवा जागा...

राज्यातील तासिका तत्त्वावरील अध्यापकांचे मानधन दिवाळीपूर्वी द्यावे- उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील

  जनलोक वार्ता न्यूज नेटवर्क             मुंबई, दि. 11 : राज्यातील अशासकीय अनुदानित महाविद्यालयातील तासिका तत्त्वावर कार्यरत असलेल्या अध्यापकांचे मानधन दिवाळी पूर्वीच करावे, असे निर्देश उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिले.             राज्यातील तासिका तत्वावर कार्यरत असलेल्या अध्यापकांचे मानधन वेळेत देणे आवश्यक आहे. परंतू काही महाविद्यालय त्यांचे मानधन वेळेत देत नाहीत अशा तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. या तक्रारीची तातडीने दखल घेऊन दिवाळीपूर्वी दि. २१ ऑक्टोबर २०२२ पर्यत त्यांच्या थकीत मानधन देण्यात यावे. याबाबत संबंधित उच्च व तंत्र शिक्षण विभागीय सह संचालक यांनी आढावा घेऊन अध्यापकांचे मानधन दिवाळीपूर्वी मिळेल याकडे लक्ष द्यावे, असेही मंत्री श्री. पाटील यांनी यावेळी सांगितले.