पोस्ट्स

एप्रिल, २०२३ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

पुण्यात जैन मंदिरातील दानपेट्या फोडून चोरट्यांनी केला लाखो रुपये लंपास

इमेज
  जनलोक वार्ता न्यूज नेटवर्क पुणे प्रतिनिधी,दि.२८,   पुण्यातील कोंढवा - कात्रज रस्त्यावर असलेल्या जैन मंदिरातील दानपेट्या फोडून चोरट्यांनी लाखो रुपये लंपास केल्याची घटना घडली आहे. मंदीरातील तब्बल चार दानपेट्या फोडून चोरट्यांनी चोरी केल्याचे सीसीटीव्ही फुटेजमधून समोर आले आहे.                  ही घटना २६ ते २७ एप्रिल रोजी घडली असून याप्रकरणी राजकुमार बन्सीलाल राजपूत यांनी कोंढवा पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. कोंढवा पोलिस तपास करीत आहेत.

महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या ६३ व्या वर्धापन दिनी ध्वजारोहणाचा मुख्य शासकीय समारंभ सकाळी ८ वाजता

जनलोक वार्ता न्यूज नेटवर्क                मुंबई ,  दि. २७ :- महाराष्ट्र राज्य स्थापनेला ६३ वर्ष पूर्ण होत आहेत. त्यानिमित्ताने दिनांक १ मे २०२३ रोजी ध्वजारोहणाचा मुख्य शासकीय समारंभ राज्यभर एकाच वेळी म्हणजे सकाळी ८ वाजता आयोजित करण्यात यावा. या मुख्य शासकीय समारंभात निमंत्रितांना सहभागी होता यावे, यासाठी या दिवशी सकाळी ७.१५ ते ९ वाजेदरम्यान ध्वजारोहणाचा किंवा इतर कोणताही शासकीय किंवा अर्धशासकीय समारंभ आयोजित करण्यात येऊ नये. जर एखाद्या कार्यालयास अथवा संस्थेला आपला स्वतःचा ध्वजारोहण समारंभ करावयाचा असल्यास त्यांनी तो समारंभ सकाळी ७.१५ वाजेपूर्वी किंवा ९ वाजेनंतर करावा ,  असे राजशिष्टाचार विभागाने परिपत्रकाद्वारे स्पष्ट केले आहे.             या परिपत्रकानुसार मुंबईत शिवाजी पार्क ,  दादर ,  मुंबई येथे राज्यपाल हे प्रमुख कार्यक्रमास उपस्थित राहून ध्वजारोहण करतील. तर विभागीय व जिल्हा मुख्यालयांच्या ठिकाणी संबंधित जिल्ह्याचे पालकमंत्री राष्ट्रध्वजारोहण करतील. ज्या ठिकाणी पालकमंत्री उपस्थित राहू शकणार नाहीत त्या विभागीय व जिल्हा मुख्यालयाच्या ठिकाणी अनुक्रमे संबधित विभागीय आयुक्त व जिल्हाधिक

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्त्री शक्ती समाधान शिबिरात १६० तक्रारींचे निराकरण

जनलोक वार्ता न्यूज नेटवर्क                 मुंबई ,  दि. २७ : जी उत्तर वॉर्ड येथे आज पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्त्री शक्ती समाधान शिबिरात दाखल झालेल्या तक्रारींपैकी १६० तक्रारींचे तत्काळ निराकरण महिला व बालविकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी केले. तसेच माहिम कापडबाजार ,  ढाणागल्ली येथील अंगणवाडीसाठी झोपडपट्टी पुनर्वसन प्राधीकरणमध्ये अंगणवाडीसाठी जागा उपलब्ध करून द्यावी अथवा कंटेनर अंगणवाडी उपलब्ध करून देण्याचे आदेश त्यांनी यंत्रणांना दिले.           दादर येथील मुंबई महापालिकेच्या जी उत्तर वॉर्ड येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्त्री शक्ती समाधान शिबिर (सरकार आपल्या दारी) कार्यक्रमात महिला व बालविकास मंत्री मंगलप्रभात लोढा बोलत होते. यावेळी मुंबई महानगपालिकेचे परिमंडळ २ चे उपायुक्त रमाकांत बिरादार ,  सहायक आयुक्त प्रशांत सपकाळे ,  मुंबई उपनगरचे निवासी उपजिल्हाधिकारी विकास नाईक यासह अधिकारी व स्थानिक लोकप्रतिनिधी  यावेळी उपस्थित होते.           मंत्री लोढा म्हणाले की ,  सन २००७ पासून माहिम येथील कापडबाजार ,  ढाणागल्ली येथे असलेल्या अंगणवाडीसाठी जागेची दीर्घ कालावधीपासूनची मागणी लक्षा

लिलाव बंद होवून आता डेपोतूनच प्रती ब्रास वाळू ६०० रुपयांत मिळणार ; महसूल विभागाच्या निर्णयावर मंत्रिमंडळाचे शिक्कामोर्तब- मंत्री राधाकृष्ण विखे पाटील

जनलोक वार्ता न्यूज नेटवर्क              मुंबई, दि. 5 : राज्यातील सर्वसामान्यांसाठी स्वस्त दरात वाळू उपलब्ध करून देण्याच्या महसूल विभागाने घेतलेल्या धोरणात्मक निर्णयावर मंत्रिमंडळाने आज शिक्कामोर्तब केल्याने ६०० रुपये प्रती ब्रास दरात वाळू उपलब्ध होणार आहे, तसेच यामुळे जनसामान्यांना दिलासा मिळणार असून घरांच्या किंमतीही आवाक्यात येतील. वाळू लिलाव बंद होणार असल्याने डेपोतूनच ६०० रुपयात वाळू उपलब्ध होईल, अशी माहिती महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी मंत्रालयात घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली.             राज्यातील वाळू लिलाव प्रक्रियेवरुन सातत्याने तक्रारी येण्याबरोबरच अनियमिततेला आळा घालण्यासाठी महसूल विभागाच्या माध्यमातून उपाययोजना करण्याचा महत्वपूर्ण निर्णय महसूल मंत्री श्री. विखे- पाटील यांनी राज्यात नवीन वाळू धोरण आणण्याचे निश्चित केले. याच वाळू धोरणावर मंत्रिमंडळाने आज शिक्कामोर्तब केले. या धोरणानुसार वाळू गटातून वाळूचे उत्खनन, उत्खननानंतर वाळूची डेपोपर्यंत वाहतूक, डेपो निर्मिती व व्यवस्थापनासाठी एक निविदा प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. प्रायोगिक तत्वावर 1 वर्षासाठी संपूर्ण राज्

पुणे जिल्ह्यात ६० हजार एकर पोटखराब क्षेत्र लागवडीखाली जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांच्या नियोजनाने जिल्हा राज्यात अग्रेसर

जनलोक वार्ता न्यूज नेटवर्क  पुणे, दि. ६: राज्य शासनाच्या निर्देशानुसार राज्यातील लागवडी अयोग्य असलेले क्षेत्र लागवडीखाली आणण्यासाठी राबविण्यात येत असलेल्या मोहिमेत पुणे जिल्ह्याने जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांच्या मार्गदर्शन व नियोजनाखाली राज्यात प्रथम क्रमांकाची कामगिरी केली असून आतापर्यंत ६० हजार एकर पोटखराब क्षेत्र लागवडीखाली आणले आहे. महाराष्ट्र शासनाने महसूल विभागास दिलेल्या ‘महत्वाची फलनिष्पत्ती क्षेत्रा’मधील एक क्षेत्र हे जिल्ह्यातील पोटखराब असलेले क्षेत्र लागवड योग्य करुन लागवडीखाली आणणे हे आहे. या अनुषंगाने २०२२ - २०२३ मध्ये या मोहिमेमध्ये जिल्ह्यात अतिशय काटेकोर नियोजन करण्यात आले होते. जिल्ह्यात पोटखराब ‘अ’ क्षेत्र म्हणजे केवळ कृषिकारणासाठी अयोग्य असलेली जमीन जवळ जवळ १ लाख ३७ हजार ९१७ हे. आर असून त्यापैकी डोंगराळ, तीव्र उताराचे, खडकाळ असे क्षेत्र वगळून उर्वरित पैकी किमान ५० हजार एकर क्षेत्र लागवडीखाली आणण्याचे नियोजन करण्यात आले. याबाबत जमाबंदी आयुक्तांनी ऑगस्ट २०१९ मध्ये सविस्तर सूचना निर्गमित केल्या गेल्या होत्या. या अनुषंगाने मोहिम परिणामकारक राबविता यावी व जास्तीत जा

मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम योजनेंतर्गत बारा हजारांहून अधिक उद्योजकांना कर्ज मंजूर

  जनलोक वार्ता न्यूज नेटवर्क              मुंबई, दि. 5 : उद्योग विभागाच्या महत्वाकांक्षी मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम योजनेच्या माध्यमातून बारा हजाराहून अधिक उद्योजकांना कर्ज मंजूर झाले असून यामधून सुमारे एक लाखाहून अधिक युवकांच्या हातांना काम मिळणार आहे. या योजनेअंतर्गत राज्याने मागील वर्षापेक्षा अडीचशे टक्के अधिक काम करून शासनाने भरीव कामगिरी केली आहे.             चालू आर्थिक वर्षात राज्याने एकूण 12 हजार 326 कर्ज प्रकरणे मंजूर केली असून यात रुपये 276 कोटी रुपये इतक्या अनुदान रकमेचा समावेश आहे. राज्याची ही कामगिरी मागील वर्षाच्या 250% पेक्षा अधिक आहे. यात 50% महिला व 20% मागासवर्गीय उद्योग घटकांचा समावेश आहे. मंजूर कर्ज प्रकरणांमध्ये 5 हजार 596 घटक हे उत्पादन क्षेत्रातील असून 6 हजार 731 घटक हे सेवा क्षेत्रातील आहेत.             वरील कर्जप्रकरणांमधून सुमारे 1 लाख रोजगार निर्मिती  होणार असून राज्यातील रोजगार निर्मितीला मोठ्या प्रमाणावर चालना मिळणार आहे. या योजनेअंतर्गत राज्यात 100% पेक्षा अधिकची लक्षांकपूर्ती करुन धाराशिव (108%), अकोला (107.87%), अमरावती (104.33%), यवतमाळ (104.

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषि स्वावलंबन योजनेत ८२ लाभार्थ्यांना ३४ लाख रुपयांचे अनुदान

  जनलोक वार्ता न्यूज नेटवर्क  पुणे, दि. ५: अनुसूचित जाती व नवबौद्ध संवर्गातील शेतकऱ्यांना सिंचनाची शाश्वत सुविधा उपलब्ध करुन देण्याच्या उद्देशाने राबविण्यात येत असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषि स्वावलंबन योजनेंतर्गत २०२२-२३ या वर्षी पुणे जिल्ह्यातील ८२ लाभार्थ्यांना लाभ दिला असून ३४ लाख रुपयांचे अनुदान देण्यात आले आहे, अशी माहिती जिल्हा परिषदेच्या कृषि विभागाने दिली आहे. या राज्य पुरस्कृत योजनेंतर्गत नवीन विहीरीसाठी २ लाख ५० हजार रुपये, शेततळ्याचे प्लास्टिक अस्तरीकरण १ लाख, जुनी विहिर दुरुस्ती ५० हजार, इनवेल बोअरींग व पंपसंचासाठी प्रत्येकी २० हजार रुपये, वीज जोडणी आकार १० हजार रुपये तसेच सूक्ष्म सिंचन संच अंतर्गत ठिबक सिंचन संचासाठी ५० हजार किंवा तुषार सिंचन संचासाठी २५ हजार रुपये या मर्यादेत अनुदान वितरीत करण्यात येते. योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थी अनुसूचीत जाती किंवा नवबौद्ध संवर्गातील असावा. शेतकऱ्याच्या नावे किमान ०.२० हेक्टर व कमाल ६ हेक्टर मर्यादेत जमीन असावी. नवीन विहिरीचा लाभ घेण्यासाठी किमान ०.४० हेक्टर स्वत:च्या नावे किंवा एकत्रित कुटुंबाची सामूहिक जमीन असावी. नवीन विहिर

आषाढी यात्रेच्या अनुषंगाने पालखी महामार्गाची पाहणी करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश

  जनलोक वार्ता न्यूज नेटवर्क  पुणे दि.5: आषाढी यात्रेच्या अनुषंगाने श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी महामार्ग आणि श्री संत तुकाराम महाराज पालखी महामार्गावर चालू असलेल्या प्रकल्पांच्या कामाची पाहणी करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख  यांनी  उपविभागीय अधिकाऱ्यांना दिले आहेत. दरवर्षी जुन महिन्यामध्ये आषाढी वारी पालखी सोहळ्यानिमित्त आळंदी येथून श्री संत ज्ञानेश्वर महाराज व देहू येथून श्री संत तुकाराम महाराज यांच्या पालखीचे प्रस्थान पंढरपूरकडे होत असते. पायी आषाढी वारीकरीता महाराष्ट्रातून हजारो वारकरी येत असतात. या वारकऱ्यांसाठी आवश्यक सुविधा देण्याचे काम प्रशासनामार्फत करण्यात येते. वारीचे आयोजन पावसाळ्याच्या सुरुवातीस होत असल्याने वारकऱ्यांसाठी पालखी मार्ग व पालखी तळावर आवश्यक व्यवस्था करण्याच्यादृष्टीने आतापासूनच सूक्ष्म नियोजन करण्याच्या सूचना डॉ.देशमुख यांनी दिल्या आहेत. श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी महामार्ग आणि श्री संत तुकाराम महाराज पालखी महामार्गाच्या प्रकल्पाची कामे ठिकठिकाणी सुरु आहेत. हवेली, खेड, दौंड-पुरंदर, बारामती-इंदापूर या तालुक्यांच्या उपविभागीय अधिकाऱ्यांन

अनुसूचित जातीतील विद्यार्थ्यांना अभियांत्रिकी आणि वैद्यकीय व्यावसायिक स्पर्धा परीक्षांचे पूर्व प्रशिक्षण

  जनलोक वार्ता न्यूज नेटवर्क  पुणे दि.5: डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी) पुणे मार्फत अनुसूचित जातीतील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील १ हजार ४०० गुणवत्ताधारक गरजू विद्यार्थ्यांना अभियांत्रिकी आणि वैद्यकीय पदवी अभ्यासक्रमासाठी १ वर्षाकरीता जेईई आणि नीट या स्पर्धा परीक्षांचे पूर्व प्रशिक्षण देण्यात येणार आहे.  राज्यातील अनुसूचित जातीमधल्या आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील विद्यार्थ्यांना अभियांत्रिकी आणि वैद्यकीय व्यावसायिक स्पर्धा परीक्षांचे पूर्व प्रशिक्षण मिळावे याकरिता सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचे सचिव सुमंत भांगे यांच्या निर्देशानुसार हे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. प्रशिक्षण उपक्रमांतर्गत सामाजिक न्याय विभागाच्या एकूण ७ विभागीय ठिकाणी प्रशिक्षण संस्थांची निवड करण्याकरिता ई-निविदा महाराष्ट्र शासनाच्या महाटेंडर व बार्टीच्या संकेतस्थळांवर प्रसिद्ध करण्यात आली होती. ऑनलाईन निविदा प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करून ७ विभागीय ठिकाणी प्रशिक्षण वर्ग सुरु व्हावी यासाठी  संबंधित विभागाला आवश्यक प्रक्रीया पूर्ण करण्याचे निर्देश बार्टीचे महासंचालक सुनिल वारे यांनी द

सततचा पाऊस आता नैसर्गिक आपत्ती म्हणून घोषित; शेतकऱ्यांना दिलासा

जनलोक वार्ता न्यूज नेटवर्क   मुंबई दि. 5,           "सततचा पाऊस" ही राज्य शासनामार्फत नैसर्गिक आपत्ती घोषित करुन शेती पिकांच्या नुकसानीकरिता मदत देण्यात यावी, असा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. त्यानुसार आता शेतकऱ्यांना मदत देण्यात येईल. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते.             ‘अतिवृष्टी’ ही राज्य शासनाने घोषित केलेली आपत्ती असून महसूल मंडळामध्ये उपलब्ध करुन देण्यात आलेल्या स्वयंचलित हवामान केंद्रामध्ये 24 तासांत 65 मि.मी. पेक्षा जास्त पाऊस झाल्यास मंडळातील सर्व गावांमध्ये शेती पिकांच्या नुकसानीचे पंचनामे केले जातात. शेती पिकांचे नुकसान 33 टक्क्यांपेक्षा जास्त असल्यास जेवढ्या क्षेत्राचे नुकसान झाले आहे, तेवढ्या क्षेत्राकरिता विहित दराने निविष्ठा अनुदान स्वरुपात शेतकऱ्यांना मदत देण्यात येते. मात्र, महसुली मंडळामध्ये अतिवृष्टीची नोंद नसतानाही मंडळातील गावांमध्ये अतिवृष्टी होऊ शकते आणि त्यामुळे शेती पिकांचे नुकसान होऊ शकते. तसेच काही गावांमध्ये सलग काही दिवस सतत पाऊस पडत असल्यामुळे देखील शेती पिकांचे नुकसान होऊ शकते. अशा प्रकरणी शेतकऱ